26 January Nibandh In Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात 26 जानेवारी 2023 वर निबंध मराठी या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.
आपल्या भारत देशामध्ये २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आनंदमयी वातावरणात प्रजासत्ताक दिन भारतभर साजरा केला जातो.
या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.
26 जानेवारी 2023 वर निबंध मराठी | 26 January Nibandh In Marathi
भारताच्या इतिहासात २६ जानेवारी या दिवसाला विशेष महत्त्व आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. त्यानंतर दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.
२६ जानेवारी १९५० रोजी संविधान संपुर्ण रूपाने लागू झाले म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे.
👉स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
२६ जानेवारीचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी आणि भारताचे प्रजासत्ताक स्वरूप ओळखण्यासाठी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशातील विरपुरुषांनी, स्वातंत्रसैनिकांनी आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी खूप मोठे योगदान देऊन आपल्याला स्वातंत्र मिळवून दिले.”26 जानेवारी 2023 वर निबंध मराठी”
आपल्या भारत देशाला ब्रिटिश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ दिवशी स्वातंत्र मिळाले. आपला देश गुलामगिरीतून मुक्त झाला होतो परंतु आपल्या देशाला आपले स्वतःचे संविधान न्हवते.
१९५० मध्ये या दिवशी देशात कायदा आणि भारतीय राजवट लागू झाली. या दिवशी आपली राज्यघटना लागू झाली. या दिवशी आपण ब्रिटीशांचे कायदे काढून आपली स्वतःची राज्यघटना स्वीकारली होती.
भारतीय संविधान संसदेतून लागू झाल्यानंतर भारत हा लोकशाही प्रजासत्ताक देश बनला होता, म्हणूनच आपण सर्वजण हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. प्रजासत्ताक दिन हा आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचा दिवस आहे.
26 जानेवारी 2023 वर निबंध मराठी
२९ ऑगस्ट १९४७ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. संविधान समितीला आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला.
२६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी संविधान समितीने आपल्या भारत देशाचे संविधान स्वीकृत केले आणि पुढे २६ जानेवारी १९५० पासून ते लागू करण्यात आले. भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे आणि त्यामध्ये नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये यांची रूपरेषा दिली आहे. संपुर्ण भारतभर २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन साजरा केला जातो.
२६ जानेवारी रोजी नवी दिल्लीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. आपल्या देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते व मोठे संचलन आयोजित केले जाते. देशात सर्वत्र ध्वजवंदन करून राष्ट्रगीत म्हंटले जाते.
👉स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
इंडिया गेटवर विशेष परेडचे आयोजन करण्यात येते. हा महान कार्यक्रम पाहण्यासाठी पहाटेपासूनच राजपथावर लोकांची गर्दी होऊ लागते. आपल्या देशाचे रक्षण करणारे, आपल्या देशासाठी कर्तृत्व गाजवणाऱ्या सैनिकांना पुरस्कार देण्यात येतात.
26 January Nibandh In Marathi
आपल्या देशातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यातील प्रजासत्ताक दिवस हा एक आहे. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी संस्थांमध्ये तिरंगा फडकावला जातो, रॅली काढून घोषणाबाजी केली जाते आणि शूर पुत्रांचे स्मरण केले जाते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.
आजचा दिवस संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदत आणि उस्ताहात साजरा केला जातो. संपूर्ण दिवशभारत आनंदाचे वातावरण असते. आपला तिरंगा आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
लोक त्यांच्या प्रदेशातील लोकनृत्ये सादर करतात, तसेच गाणी, नृत्य आणि विविध वाद्ये देखील वाजवली जातात. भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विविधतेचा उत्सव साजरा करण्याचा आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याचा हा एक प्रसंग आहे. आपणही देशातील स्वच्छतेकडे लक्ष्य देऊन आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे. आपल्या देशातील ऐतिहासिक वस्तूंची काळजी घेतली पाहिजे.
तर मित्रांनो तुम्हाला “26 जानेवारी 2023 वर निबंध मराठी | 26 January Nibandh In Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ 26 जानेवारी 2023 वर निबंध मराठी सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.
या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो?
>२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी किती वेळ लागला?
>भारतीय संविधान बनवण्यासाठी 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले.
धन्यवाद