Badalte Stri Jivan Nibandh Marathi- नमस्कार मित्रांनो आज या लेखात ‘बदलते स्त्री जीवन निबंध मराठी’ या विषयावर निबंध पाहणार आहोत.
या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे की हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.
बदलते स्त्री जीवन निबंध मराठी | Badalte Stri Jivan Nibandh Marathi
स्त्री समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. विकसित समाजासाठी महिलांचे योगदानही आवश्यक आहे. महिलांचा आदर आणि संरक्षण ही भारताची प्राचीन संस्कृती आहे.
राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, मदर टेरेसा, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, पी. टी. उषा आणि इतरही अनेक कर्तृत्ववान महिलांनी या देशाचा नावलैकिक वाढविला आहे.
भूतकाळात, स्त्रीची प्राथमिक भूमिका गृहिणी आणि काळजीवाहक म्हणून पाहिली जात असे. अलीकडील इतिहासात स्त्रीच्या जीवनात लक्षणीय बदल झाले आहेत. संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या.’बदलते स्त्री जीवन निबंध मराठी’
👉निसर्ग आणि आम्ही निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
पहिली आंतरराष्ट्रीय महिला परिषद ही १९०७ साली स्टुटगार्ड या ठिकाणी भरली. पुढे न्यू यार्क मध्ये ८ मार्च १९०८ रोजी वस्त्रोद्योगातील अनेक स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात मिळून ऐतिहासिक निदर्शने करून दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता अशा मागण्या केल्या.
या मागण्यांबरोबर लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष प्रौढ स्त्री-पुरुषां अशा सर्वांना मतदानाचा हक्क मिळावा अशीही मागणी करण्यात आली.
बदलते स्त्री जीवन निबंध मराठी
दरवर्षी 8 मार्च या दिवशी संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. महिलांबद्दल आदर, अभिमान, सन्मान व्यक्त करण्यासाठी, महिलांचे हक्क, शिक्षण याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आपल्या भारत देशात मुंबई येथे ८ मार्च १९४३ रोजी पहिला महिला दिवस साजरा करण्यात आला.
गेल्या शतकात, महिलांच्या स्थितीत लक्षणीय प्रगती आणि बदल झाले आहेत. आजच्या युगातील स्त्री ही विचारी आहे. विविध क्षेत्रात महिला प्रगतीपथावर आहेत. अनेक क्षेत्रात महिलां उल्लेखनीय व मोलाची कामगिरी बजावत आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला अनेक महत्त्वाच्या पदांवर विराजमान आहेत, सन्मानाने काम करत आहेत.
कामाप्रमाणे स्त्री ने आपल्या राहणीत, आपल्या पोशाखात बदल केला आहे. शिक्षणाच्या प्रसारामुळे महिलांची प्रगती होण्यास सुरुवात झाली. अभियांत्रिकी, नागरी सेवा, बँक, पोलीस, विज्ञान, व्यवसाय, आरोग्य अशा विविध क्षेत्रात महिलांचे योगदान दिसून येते.
👉निसर्ग आणि आम्ही निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
देशाच्या प्रगतीमध्येही स्त्रियांचे योगदान फार मोलाचे आहे. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाला पुढे नेत आहेत. देशातील स्त्रियांच्या प्रगती शिवाय देशाची प्रगती शक्य नाही. भारत सरकार शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी कार्य करत आहे त्यामुळे मुलींचे शिक्षण आणि महिला सक्षमीकरणात लोकांमध्ये जागरुकता वाढत आहे. आज महिला शिक्षित आहेत आणि प्रत्येक निर्णय स्वतः घेऊ शकतात.(Badalte Stri Jivan Nibandh Marathi)
मात्र, या प्रगतीनंतरही महिलांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या आव्हानांना तोंड देण्यासाठी, समाजाने महिलांना पाठिंबा देणे आणि सशक्त करणे महत्त्वाचे आहे. अलिकडच्या दशकांमध्ये महिलांनी समानता मिळविण्यासाठी आणखी प्रगती केली आहे.
Badalte Stri Jivan Nibandh Marathi
आपल्या देशात हुंडा, अशिक्षा, लैंगिक अत्याचार, असमानता, स्त्रीभ्रूणहत्या आणि घरेलू हिंसा इत्यादींना बंदी घालण्यात आली आहे. वेगवेगळ्या वाईट प्रथा दूर करण्यासाठी आता सरकारने अनेक अधिकार तयार केले आहेत आणि त्यांची अंमलबजावणी सुद्धा केली आहे.
आजही अनेक मागास भागात निरक्षरता, असुरक्षितता अशा अनेक गोष्टी पहायला मिळतात. भारत सरकार शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी कार्य करत आहे. महिला आणि बाल विकास कल्याण मंत्रालय आणि भारत शासनाद्वारे अनेक योजना राबवल्या जात आहेत.
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, उज्ज्वला योजना अशा विविध योजनांची कामे शासनाकडून केली जात आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांना सहभागी करून घेण्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
राष्ट्राच्या विकासात महिलांचे महत्त्व आणि अधिकार संपूर्ण समाजाला कळावे यासाठी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि मातृ दिवस यासारखे स्त्रियांचे दिवस साजरा करून त्यांना सक्षम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
महिलांचा विकास झाला नाही तर देशाच्या प्रगतीवर नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. महिला या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे आणि त्यामुळे ही शक्ती सुदृढ व सक्षम बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे.
तर मित्रांनो तुम्हाला “बदलते स्त्री जीवन निबंध मराठी | Badalte Stri Jivan Nibandh Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ बदलते स्त्री जीवन निबंध मराठी सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.
या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
धन्यवाद