बैल पोळा निबंध मराठी | bail pola nibandh in marathi

bail pola nibandh in marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण बैल पोळा निबंध या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

आपला भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे.

देशभरात अनेक सण मोठ्या आनंदात साजरे केले जातात.

शेतकरी राजा बैलपोळा सणाची आतुरतेने वाट पाहत असतो.

मात्रांनो आपण या लेखातून बैलपोळा तुम्हाला बैलपोळा सणाविषयी आम्ही माहिती देणार आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

bail pola nibandh in marathi
               bail pola nibandh in marathi

बैल पोळा निबंध मराठी

 

आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठा,
हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा,
आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार 

खूप सुंदर शब्दात बहिणाबाई चौधरी यांनी बैलपोळा सणाचे वर्णन केले आहे.

श्रावण महिना म्हणजे सणांची भली मोठी रांगच. श्रावण महिन्यामध्ये आपण नारळी पौर्णिमा, नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी असे अनेक सण मोठ्या आनंदात साजरे करतो.

श्रावण महिन्यातील सणांबरोबर सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळा हा सण साजरा केला जातो.

बैलपोळा हा शेतकऱ्यांना शेतीमध्ये मदत करणाऱ्या सर्जा-राजाचा सण.

विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात बैलपोळा हा सण आनंदात साजरा केला जातो.

शेतकऱ्यासोबत मेहनत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे.

बैलपोळा या सणाला दक्षिण महाराष्ट्रात बेंदूर असेही म्हणतात.

bail pola nibandh in marathi

बैलपोळा या सणादिवशी बैलांना विश्रांती दिली जाते. या दिवशी बैलांकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही. या दिवशी सर्जा राजाला भल्या पहाटे ओढ्यात नेऊन अंघोळ घातली जाते. बैलांना जेवढे छान सजवता येईल तेवढे सजवण्यात येते.

बैलांच्या डोक्याला बाशिंग बांधले जाते. पाठीवर सुंदर नक्षीकाम असलेली झूल टाकली जाते. अंगावर रंगबेरंगी ठिपके काढले जातात. या दिवशी बैलांना नांगराला जुंपले जात नाही.

बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने शेकले जाते. यालाच खांद शेकने म्हणतात.

बैल पोळा सणाला सर्वांच्या घराला आंब्याच्या पानाचे तोरण आपल्याला पाहायला मिळते. सायंकाळच्या वेळी शेतकरी आपल्या बैलजोडयाना ढोल, ताशा, सनईच्या आवाजात गावातील मंदिराजवळ घेऊन येतात. त्या ठिकाणी बैलांचे पूजन केले जाते.

या वेळी झाडत्या म्हणजेच पोळ्याची गीते म्हंटली जातात.

bail pola essay in marathi

बैल पोळा या सणाला  प्रत्येक घरांमध्ये पुरणपोळ्या बनवल्या जातात. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.

या दिवस सर्जा राजाचे रूप खूप रुबाबदार व छान दिसते.

खूप लोकांजवळ शेती नसल्यामुळे त्यांच्या घरी बैल नसतात. असे लोक मातीच्या बैलांची पूजा करतात आणि हा सण खूप आनंदात साजरा करतात.

आपला भारत देश कृषिप्रधान देश आहे. शेती करून खूप कुटुंब आपला उदरनिर्वाह करत असतात.

सर्जा राजा हा शेतकऱ्यासोबत शेतात राबत असतो. बैलांची शेतकऱ्याला खूप मदत होते. ‘bail pola essay in marathi’

पूर्वीपासून बैल शेतकऱ्याला खूप मदत करत आलेले आहेत. शेतीमध्ये तर खूपच मोलाचा वाटा बैलांचा असतो. काही वर्षे आधी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाड्यांच्या उपयोग केला जात होता.

आता आपल्याकडे गाड्या आल्यामुळे बैलगाड्यांच्या उपयोग खूप कमी झाला आहे.

अलीकडच्या काळात आधुनिक पद्धतीने शेती केली जात असली तरीही शेतीमध्ये सर्जा राजाचे महत्त्व कमी होत नाही.

आजही खूप कुटुंबाचा उदरनिर्वाह सर्जराजामुळे होत आहे.

आपल्या आजूबाजूला असलेले मुके प्राणी हे आपल्याला नेहमी मदत करत असतात. या सर्व प्राण्यांची आपण काळजी घेऊया आणि त्यांना नेहमी आनंदत ठेवूया.

मित्रांनो, आम्ही आशा करतो की “bail pola nibandh in marathi” हा निबंध तुम्हाला नक्की आवडला असेल.

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment

close button