भारतीय संविधान निबंध माहिती मराठी | Bharatiy Samvidhan Nibandh Mahiti Marathi

Bharatiy Samvidhan Nibandh Mahiti Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात भारतीय संविधान मराठी निबंध या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.

 

भारतीय संविधान निबंध माहिती मराठी | Bharatiy Samvidhan Nibandh Mahiti Marathi

 

आपल्या भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ दिवशी स्वातंत्र मिळाले. आपला देश गुलामगिरीतून मुक्त झाला होता परंतु आपल्या देशाला आपले स्वतःचे संविधान न्हवते. आपले संविधान नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत.

आपल्या भारत देशाचे संविधान निर्माण करण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महत्वाची भूमिका होती. सर्वांना एकता, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांच्या तत्वांवर जोडणारे असे आपले भारतीय संविधान आहे. एक चांगले राष्ट्र तेव्हाच ओळखले जाते जेव्हा त्याचे स्वतःचे नियम आणि कायदे असातात.

         👉मला आवडणारा कवी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

आपल्या देशाच्या राज्यघटनेची प्रस्तावना संविधानाच्या महानतेचे वर्णन करते. संविधान निर्माण करण्यासाठी २९ ऑगस्ट १९४७ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली.

देशाच्या बांधणीसाठी संविधान खुप महत्वाचे असते. खूप मेहनतीनंतर आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी संविधान समितीला २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला.(भारतीय संविधान मराठी निबंध)

संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. या पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २११ सदस्य उपस्थित होते.

सर्व सदस्यांच्या सहमतीने डॉ. राजेंद्रप्रसाद यांची अध्यक्षस्थानी तर आशुतोष मुखर्जी यांची ११ डिसेंबर रोजी उपाध्यक्ष स्थानी निवड करण्यात आली. आपल्या देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर अल्पकाळ या समितीने काम केले.

भारतीय संविधान दिवस निबंध मराठी

मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणुन मोठ्या आनंदात आणि उस्ताहात साजरा केला जातो.

भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. त्यात 448 लेख, 12 वेळापत्रक आणि 94 सुधारणा आहेत.
भारतीय राज्यघटनेतील सर्व नियम आणि कायदे वेगवेगळ्या देशांच्या संविधानांमधून घेतले गेले आहेत.

आपले भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान मानले जाते. जगभरातील संविधानांचा अभ्यास करून ते तयार करण्यात आले आहे. त्या सर्व देशांच्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या आहेत. संविधानाच्या दृष्टीने सर्वजण समान आहेत. प्रत्येकाला समान अधिकार आणि कर्तव्ये आहेत.

        👉मला आवडणारा कवी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

भारतीय संविधान दिलेल्या अधिकारांपैकी मूलभूत अधिकार रशियन राज्यघटनेतून आणि प्रजासत्ताक फ्रेंच राज्यघटनेतून घेण्यात आला आहे. तर राष्ट्रपतींचे कार्य आणि अधिकार अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतले गेले आहेत. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार हे अमेरिकन संविधानातून घेण्यात आले आहेत,आणि मूलभूत कर्तव्ये रशियन संविधानातून तर स्वातंत्र्य, समता,बंधुता ही तत्वे फ्रेंच राज्यक्रातीतून घेण्यात आली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे.Bharatiy Samvidhan Nibandh Mahiti Marathi

Bharatiy Samvidhan Nibandh Mahiti Marathi

देशाच्या विकास तसेच अनेक गोष्टींचा याच्याशी संबधित विचार संविधान निर्माण करताना केलेला आहे. भारतीय संविधानातील तत्वे, कर्तव्य, अधिकार हे आपल्या सर्वांसाठीच महत्वपूर्ण आहेत.

भारतीय संविधानाबाबत जनजागृती, माहिती होण्यासाठी व संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करण्यासाठी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो खुप आनंदात साजरा केला जातो.

भारतीय राज्यघटनेची निर्मिती ही एका दिवसाची गोष्ट नाही. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाचे ते एकत्रित रूप आहे. आपल्या देशाची प्रगती विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या देशाचा संविधानाबद्दल माहिती होणे गरजेचे आहे. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी लहान मुलांना आपल्या संविधनाबद्दल अवगत करून दिले पाहिजे. आपल्या संविधानामधील नियमांचे आपण पालन केले तर आपला देश नवीन उंची गाठेल.

तर मित्रांनो तुम्हाला “भारतीय संविधान निबंध माहिती मराठी | Bharatiy Samvidhan Nibandh Mahiti Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ भारतीय संविधान मराठी निबंध सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू. या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button