भारतीय संविधान निबंध मराठी | bhartiya samvidhan nibandh marathi

bhartiya samvidhan nibandh marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात भारतीय संविधान हा निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखामध्ये आपण भारतीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो? का व कशाप्रकारे साजरा केला जातो? याची माहिती पाहणार आहोत.

आम्ही या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

भारतीय संविधान निबंध मराठी | bhartiya samvidhan nibandh marathi

 

आपल्या भारत देशाला ब्रिटिश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ दिवशी स्वातंत्र मिळाले. आपला देश गुलामगिरीतून मुक्त झाला होता परंतु आपल्या देशाला आपले स्वतःचे संविधान न्हवते. देशाची प्रगती होण्यासाठी संविधान गरजेचे होते.

२९ ऑगस्ट १९४७ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली.

👉प्रजासत्ताक दिन निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

संविधान निर्माण करण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महत्वाची भूमिका होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत.bhartiya samvidhan nibandh marathi

मसुदा समिती ही खूप महत्वाची समिती होती. संविधान निर्मिती हे या समितीचे काम होते.

संविधान समितीला आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला. खूप मेहनती व बैठकानंतर आपल्या देशाचे संविधान तयार करण्यात आले.

संविधान नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते.

आपल्या देशाच्या संविधनामधे नागरिकांच्या विकासाचा तसेच आपल्या देशाची प्रगती कशी होईल याच्याशी संबधित विचार केलेला आहे. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी संविधान हे प्रत्येकासाठी महत्वपूर्ण आहे.

संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली. या पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २११ सदस्य उपस्थित होते.

सर्व सदस्यांच्या सहमतीने डॉ. राजेंद्रप्रसाद यांची अध्यक्षस्थानी तर आशुतोष मुखर्जी यांची ११ डिसेंबर रोजी उपाध्यक्ष स्थानी निवड करण्यात आली. आपल्या देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर अल्पकाळ या समितीने काम केले

भारतीय संविधान निबंध मराठी

मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणुन मोठ्या आनंदात आणि उस्ताहात साजरा केला जातो.

भारतीय संविधानाबाबत जनजागृती, माहिती होण्यासाठी व संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करण्यासाठी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

संपुर्ण भारतभर २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन साजरा केला जातो.”भारतीय संविधान निबंध मराठी”

२६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी संविधान समितीने आपल्या भारत देशाचे संविधान स्वीकृत केले आणि पुढे २६ जानेवारी १९५० पासून ते लागू करण्यात आले.

👉प्रजासत्ताक दिन निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

२६ जानेवारी १९५० रोजी संविधान संपुर्ण रूपाने लागू झाले म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.

आपला देश समृद्ध आणि विकसित करण्यासाठी संविधान खूप महत्वाचे आहे. आजचा दिवस संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदत आणि उस्ताहात साजरा केला जातो. संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना भारत सरकारने २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.

जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी भारतीय संविधान हे एक आहे.

संपुर्ण भारतभर, सरकारी कार्यालांमध्ये, शाळांमधे हा दिवस खूप आनंदात साजरा केला जातो. या दिवशी आपले संविधान तयार झाले होते आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी लहान मुलांना आपल्या संविधनाबद्दल अवगत करून दिले पाहिजे.

samvidhan divas/din nibandh marathi 

या दिवशी शाळा कॉलेजमध्ये मुलांना भारतीय संविधान बद्दलची माहिती सांगितली जाते. या दिवशी होत असलेल्या वेगवेगळया कार्यक्रमांमुळे आपल्याला आपल्या सांविधनाबद्दल अधिक माहिती मिळते.

विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण सुसंस्कृत नागरीक होण्यासाठी संविधानामधील मूलतत्वांचा अंगिकार करुन त्याद्वारे आपल्या देशाच्या संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता तसेच संविधानाविषयी जागृती होण्यासाठी २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर,२०२१ या कालावधीमध्ये भारतीय संविधान दिनाच्या निमत्ताने ‘माझे संविधान माझा अभिमान’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात येत आहे.

माझे संविधान माझा अभिमान यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यासाठी वेगवेगळे शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जावेत.(samvidhan divas/din nibandh marathi)

शालेय स्तरावर या कालावधीमध्ये निबंध लेखन, काव्य लेखन, चित्रकला व वकृत्व स्पर्धा, घोषवाक्य अशा वेगवेगळया उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरूपात आयोजन करण्यात यावे.

भारतीय राज्यघटनेतील मूलतत्त्वांची व्याप्ती आणि सर्वसमावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे

भारतीय संविधान दिनानिमित्त शाळा कॉलेजमध्ये भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.

आपल्या संविधानामधील नियमांचे आपण पालन केले तर आपला देश नवीन उंची गाठेल.

मित्रांनो तुम्हाला भारतीय संविधान हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ bhartiya samvidhan nibandh in marathi या संबंधित काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा.

वरील भारतीय संविधान दिवस या निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद

Leave a Comment

close button