Bhartiya Swatantrata Ladha In Marathi Nibandh: नमस्कार मित्रांनो आज या लेखात “भारतीय स्वातंत्र्य लढा निबंध मराठी” या विषयावर निबंध पाहणार आहोत.
या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे की हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.
भारतीय स्वातंत्र्य लढा निबंध मराठी | Bhartiya Swatantrata Ladha In Marathi Nibandh
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस आपण मोठ्या अभिमानाने आपला राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो पण आपल्या देशाला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही यासाठी अनेकांना बलिदान आणि संघर्ष करावा लागला.
भारत भूमीला ब्रिटिशांनी बेचिराख करून टाकले होते. सामान्य माणसांचा हक्क हिरावून घेऊन गुलामगिरी लादली होती. भारतीय माणूस कधी आपण या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ याची वाट पाहत होता. इथला माणूस ब्रिटिशांच्या गुलामगिरीत गुदमरून गेला होता.
१५ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी सर्वस्वाचा त्याग करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
👉माझी मुंबई निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
भारतीयांचे स्वतःच्या देशात अस्तित्वच नव्हते, भारतीय फक्त त्यांचे गुलाम म्हणून राहिले. यातूनच भारत मातेच्या कुशीतून एक एक रत्न जन्माला येऊ लागले. ब्रिटिशांच्या विरुद्ध सामान्य माणसाच्या मनात आग धगधगत होती. Bhartiya Swatantrata Ladha In Marathi Nibandh
भारतीय स्वातंत्र्य लढा निबंध मराठी
याची पहिली ठिणगी पडली ती बराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या झाडून ठार केले आणि तेथूनच 1857 च्या उठावाला सुरुवात झाल, तिथून जी स्वातंत्र्य लढ्यासाठी क्रांतिकारकांनी मशाल पेटवली ती 1947 पर्यंत कधीच विझली नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून येथील महात्म्यांनी, क्रांतिकारकांनी खूप संघर्ष केला. त्यामध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच असे ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक, तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा असे गर्जून सांगणारे सुभाष चंद्र बोस, करा किंवा मला असा टोकाचा संदेश देणारे महात्मा गांधी असे कितीतरी नेते भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ब्रिटिशांविरुद्ध लढले.
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा विरांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. कमला नेहरू, सरोजिनी नायडू आणि विजय लक्ष्मी पंडित यांसारख्या महिलांनीही स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
बिपिन चंद्र पाल, लाला लचपतराय, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, गो. ग. आगरकर, रासबिहारी बोस, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू अशी शेकडो नावे आहेत ज्यांचे स्वातंत्र लढ्यात योगदान अतुलनीय आहे. अशा अनेक महात्म्यांनी संघर्ष केला तेव्हा आपला भारत देश स्वातंत्र झाला.
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळणारच !”ही सिंह गर्जना करणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेकदा तुरुंगातही जावे लागले. जनजागृतीसाठी त्यांनी केशरी व मराठा अशी वृत्तपत्रे काढली. इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देऊन भारत मातेसाठी फासावर जाणारे भगतसिंग राजगुरू सुखदेव अशा कितीतरी क्रांतिकारकाचे योगदान स्वातंत्र लढ्यात अमूल्य आहे.
आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान व्यक्तींपैकी एक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे एक महान पुरुष होते. महात्मा गांधींनी चंपारण चळवळ, खेडा चळवळ, खिलाफत चळवळ, नमक चळवळ आणि भारत छोडो आंदोलन यासह अनेक चळवळी केल्या. या आंदोलनांनी भारतातील ब्रिटीश साम्राज्याचा पाया हादरला आणि आपल्या देशातील लोकांना स्वातंत्र्य चळवळीत एकत्र केले.
👉 माझी मुंबई निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
९ ऑगस्ट १९४२ मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलन केले. या आंदोलनाचा भारतीय जनतेवर खूप मोठा परिणाम झाला.सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा उपयोग करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली.”भारतीय स्वातंत्र्य लढा निबंध मराठी”
सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांचे पालन करून गांधीजींनी भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली. 1918 मध्ये अहमदाबाद येथे गिरणी कामगारांचा संप केला. त्यांनी १९३० मध्ये मीठ सत्याग्रह आणि नंतर १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ चळवळीने ब्रिटिशांना चोख प्रत्युत्तर दिले. गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले.
Bhartiya Swatantrata Ladha In Marathi Nibandh
इ.स.१९४२ साली ब्रिटिशांकडे भारताच्या स्वातंत्र्याची जोरदार मागणी करायला सुरुवात केली. छोडो भारत असे या आंदोलनाचे नाव होते. यामध्ये संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणावर उत्सफूरतपणे लोकांनी सहभाग नोंदविला. अनेक भारतमातेच्या थोर क्रांतिकारकाच्या कार्यामुळेच भारतीय स्वातंत्र्य लढा हा इतिहासामध्ये अविस्मरणीय झाला.
या दिवशी भारतातील त्या महान व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली जाते ज्यांच्यामूळे ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो. 15 ऑगस्ट हा दिवस लोक आपापल्या शैलीत साजरा करतात, काहीजण देशभक्तीपर गाणी आणि चित्रपट पाहून साजरा करतात, तसेच या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते .स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची तयारी मोठ्या धूमधडाक्यात केली जाते.
अनेक क्रांतिकारकांना तुरुंगवास भोगवा लागला कितीतरी क्रांतिकारक ब्रिटिशांच्या बंदुकीच्या गोळीचे बळी ठरले तेव्हा आपली भारत माता स्वतंत्र झाली. आज आपण मोठ्या अभिमानाने भारतीय तिरंगा फडकवतो ते केवळ या महापुरुषांच्या कार्यामुळेच.
प्यारा रे प्यारा देश माझा प्यारा
चमके हा ध्रुवाचा तारा……
ऋषी मुनी वाणी जन्मली येथे गंगा
गोदा कृष्णा वाहाती येथे
अति पवित्र पावन ही भूमी
वाहाते ममता तुषार रे….
तर मित्रांनो तुम्हाला “भारतीय स्वातंत्र्य लढा निबंध मराठी | Bhartiya Swatantrata Ladha In Marathi Nibandh” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ भारतीय स्वातंत्र्य लढा निबंध मराठी सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.
या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
धन्यवाद