2023 छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | Chhatrapati Shivaji Maharaj Nibandh In Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Nibandh In Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात “छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी”  या विषयावर निबंध पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे की हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.

 

2023 छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | Chhatrapati Shivaji Maharaj Nibandh In Marathi

 

निश्चयाचा महामेरू । बहुतजनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ||
-समर्थ रामदास स्वामी

छत्रपती शिवाजी महाराज हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शिवराय, शिवबा राजे अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले असे आहे.

शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी गडावर झाला. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे आणि आईचे नाव जिजाबाई असे होते. शहाजीराजे भोसले हे एक शूर योद्धा होते.

राजमाता जिजाऊ या महान देशभक्त होत्या. त्यांच्या हृदयात देशप्रेमाची भावना धगधगत होती. छत्रपती शिवाजी महाराजांना एक शूर, महान, कुशल प्रशासक बनण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.

👉महिला सक्षमीकरण निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लोकांच्या कल्याणासाठी समर्पित राहण्याची शिकवण दिली. त्या अतिशय हुशार होत्या. राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवरायांच्या आई तशाच त्यांच्या मार्गदर्शक होत्या. संयम, शौर्य या गुणांचा विकास होण्यासाठी रामायण आणि महाभारताच्या गोष्टी त्यांना सांगितल्या.

बालपणी जिजाबाईंनी शिवरायांना शूर वीर पुरुषांच्या गोष्टी सांगून शूर केले. त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली.  लहानपणीच शिवरायांना लष्करी शिक्षण, दानपट्टा तलवारबाजी, भाला यांचे प्रशिक्षण मिळाले. जिजाऊंनी शिवरायांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगून संस्कार घडवले .

वयाच्या दहाव्या वर्षी शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई यांच्याशी झाला. छत्रपती शिवाजी महाराज १४ वर्षाचे असताना शहाजी राजांनी पुण्याची जहागीर राजमाता जिजाऊ यांच्या स्वाधीन केली.

लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाऊ पुण्याला रहायला आल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत राजमाता जिजाऊ यांनी पुण्याचा पुनर्विकास करण्यास सुरुवात केली. शिवरायांची संपूर्ण जबाबदारी राजमाता जिजाऊ यांच्यावर होती.

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी

पुढे शिवाजी महाराजांनी काही मावळ्यांसमवेत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली.

स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा, प्रजेवर अन्याय होऊ नये, त्यांच्या तक्रारीचे निवारण लगेच व्हावे यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले.

अष्टप्रधान मंडळाच्या मदतीने राज्यकारभार सुरळीत चालवला. १६ वर्षीय शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला. पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले घेतले. यामध्ये पुरंदर, कोंढाणा आणि चाकण असे किल्ले होते. गुलामगिरीत विस्कळीत झालेला समाज स्वाभिमानी व स्वराज्यनिष्ठ व्हावा यासाठी महाराज कष्ट घेत असत.

गनिमी काव्याचा उपयोग करून शिवरायांनी अनेक लढायांमध्ये विजय मिळवला. अफजलखानाचा वध व शाहिस्तेखानाची फजिती गनिमी काव्याने व धाडसाने केली. किल्ले पन्हाळा यांसारखे अनेक किल्ले त्यांनी ताब्यात घेतले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांना मुक्त करण्यासाठी बंगळूरचा किल्ला आणि कोंढाणा विजापूरच्या सुलतानाला परत देऊन तह केला. स्वराज्य स्थापन झाले तरी स्वराज्याभोवती शत्रूचा सुळसुळाट होता.

शिवाजी महाराजांनी नवीन किल्ले जिंकण्याबरोबरच, जिंकलेल्या किल्ल्यांची डागडुजी करणे तसेच अनेक नवे किल्लेही उभारले.

गनिमी काव्याचे युद्धतंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी कमीत कमी सैनिकांच्या सहाय्याने बलाढ्य अशा फौजांचा यशस्वीपणे सामना त्यांनी केला. प्रतापगडावरचा पराक्रम आग्राहून सुटका, सुरतेची लूट, शाहिस्तेखानाची फजिती या सर्व रोमांचकारी गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत गेल्या.

स्वराज्य निर्मितीच्या काळात शिवाजी महाराजांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले परंतु न डगमगता त्यांनी संघर्ष चालूच ठेवला. अनेक मोहीमा काढून शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार केला. शिवाजी महाराजांना अन्यायाची चीड होती.

स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा, प्रजेवर अन्याय होऊ नये, त्यांच्या तक्रारीचे निवारण लगेच व्हावे यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले.

Chhatrapati Shivaji Maharaj Nibandh In Marathi

तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर यांसारखे कितीतरी जिवास जीव देणारे शूरवीर त्यांना सामील झाले व त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता शिवरायांना साथ दिली. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज हे रयतेचा राजा होते.

शिवरायांजवळ आत्मविश्वास, प्रसंगावधान असल्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचा विजय झाला. शिवाजी महाराज हे रयतेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे राजे होते. आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही अशा अनेकांशी संघर्ष केला.

६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. पंडित गागाभट्टांनी राज्याभिषेकाचा विधी पार पाडला. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून आदर्श राज्य कसे असावे हे दाखवून दिले.

शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. दरवर्षी 19 फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणून संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

शाळा, महाविद्यालय सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी भाषण, निबंध स्पर्धा इत्यादींचे आयोजन केले जाते.

तर मित्रांनो तुम्हाला “छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | Chhatrapati Shivaji Maharaj Nibandh In Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ “छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी” सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button