Dr Babasaheb Ambedkar Yanche kary Nibandh : नमस्कार मित्रांनो आज या लेखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हा निबंध पाहणार आहोत.
या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध | Dr Babasaheb Ambedkar Yanche kary Nibandh
भारतीय घटनेचे शिल्पकार, दलितांचे नेते व युगपुरुष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जगभरात ख्याती आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी समाजात परिवर्तन घडून आण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण नाव ‘भीमराव रामजी आबेडकर’ असे होते. १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला.
👉ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈
त्यांचे वडील हे भारतीय सैन्यात होते, देशाची सेवा करत होते. आई-वडिलांनी डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्यावर चांगले संस्कार केले.
त्यांनी ने संयमाने आणि धैर्याने आपले शालेय आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.(डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हा निबंध)
साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये त्यांचे नाव दाखल केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थी जीवनात खूप अभ्यास करत असत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध
1907 मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन शाळेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर ३ जानेवारी १९०८ रोजी त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली.
बडोद्याच्या महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केलेल्या योजनेअंतर्गत त्यांना बडोदा राज्य शिष्यवृत्ती मिळाली व त्यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला.
👉ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈
परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे पहिले भारतीय होते.
त्यांनी मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. अनेक अडचणींचा सामना करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले.
२९ ऑगस्ट १९४७ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली.
संविधान निर्माण करण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महत्वाची भूमिका होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० साली मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले. संविधानाच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले.
संविधान समितीला आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला. खूप मेहनती व बैठकानंतर आपल्या देशाचे संविधान तयार करण्यात आले.
मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणुन मोठ्या आनंदात आणि उस्ताहात साजरा केला जातो.
भारतीय संविधानाबाबत जनजागृती, माहिती होण्यासाठी व संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
Dr Babasaheb Ambedkar Yanche kary Nibandh
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात सुधारणा घडवून आणण्याचे ठरवले होते. त्यांना समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणायचे होते.
डॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळे अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास निर्माण झाला.
समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांचा कायद्याचा सखोल अभ्यास होता. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. .Dr Babasaheb Ambedkar Yanche kary Nibandh
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्याच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, औद्योगिक, घटनात्मक इत्यादी विविध क्षेत्रात कार्य करून राष्ट्र उभारणीत खूप मोठे योगदान दिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.
अनेक अडचणी, समस्या असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रयत्नांनी आणि समर्पणाने आपल्या पिढीला सुशिक्षित बनविण्याचे कार्य करत राहिले. हे कार्य करत असताना त्यांना बराच विरोध सहन करावा लागला आणि त्यांच्या या कार्याला हळूहळू यश मिळाले.
कर्तृत्वाने व कार्याने माणूस किती मोठा होऊ शकतो हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दाखवून दिले.
त्यांनी शिक्षणासाठी तसेच समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांनी देशातील प्रत्येकाच्या कल्याणासाठी कार्य केले.
तर मित्रांनो तुम्हाला “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध | Dr Babasaheb Ambedkar Yanche kary Nibandh” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.
या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
धन्यवाद