डॉ. पंजाबराव देशमुख निबंध मराठी | Dr Panjabrao Deshmukh Nibandh Mahiti Marathi

Dr Panjabrao Deshmukh Nibandh Mahiti Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात डॉ. पंजाबराव देशमुख निबंध मराठी या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

डॉ. पंजाबराव देशमुख निबंध मराठी | Dr Panjabrao Deshmukh Nibandh Marathi

 

‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’

हे डॉ. पंजाबराव देशमुख यांचे ब्रीदवाक्य होते.

डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव शामराव आणि आईचे नाव राधाबाई असे आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण पापळ येथेच झाले व हायस्कूलचे शिक्षण अमरावती येथे झाले. १९२८ मध्ये ते मेट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात गेले. पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांना लंडनला जावे लागले.

👉वृत्तपत्राचे मनोगत निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

त्यांनी एडिंबरो विद्यापीठाची एम. ए. व ऑक्सफर्ड विद्यापीठाची डी. फिल्. या पदव्या मिळवल्या. तेथे त्यांना वैदिक वाङ्‌मयातील धर्माचा उद्‌गम आणि विकास’ प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट मिळाली.

डॉ. पंजाबराव देशमुख निबंध मराठी

त्यांनी त्यांचे उच्च शिक्षण हे एडिनबर्ग व आक्सफर्ड विद्यापीठ येथून पूर्ण केले. तसेच त्यांनी डॉक्टरेट ब्रिटेन येथून केले. त्यांच्या संशोधनाचा ‘धर्म पहाट आणि त्याची वाढ’ असा विषय होता.(डॉ. पंजाबराव देशमुख निबंध मराठी)

तेथील शिक्षण पुर्ण झाल्यानंतर व ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृतचे संशोधक म्हणूनही काही दिवस काम करून ते भारतात परत आले. त्यांनी अमरावती येथे परत येवून कायदा शिक्षणाची तयारी सुरु केली. सुरवातीस काही काळ वकिली केल्यानंतर त्यांनी सामजिक कार्याला सुरुवात केली. पंजाबरावांनी वकिली बरोबरच समाजकार्यास प्रारंभ केला.

त्यांनी प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकरिता ‘भारतीय प्राथमिक शिक्षक संघ’ स्थापन केला. शेतकरी वर्गाची परिस्थिती सुधाण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १९२७ मधे शेतकरी संघ या शेतकरी संघटनेची स्थापना केली.

शेतकरी संघाच्या प्रचारासाठी व शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ हे वर्तमानपत्र चालवले.

गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केली. अमरावतीमधील अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून त्यांनी सत्याग्रह केला होता.

१९३० मध्ये ते प्रांतीय लॉ बोर्डाचे सदस्य म्हणून निवड होऊन ते शिक्षण मंत्री, कृषी व सहकारी विभागाचे मंत्री बनले होते. शिक्षणाला त्यांनी खूप महत्व दिले होते. शिक्षण क्षेत्राचा विकास होण्यासाठी तसेच विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली.

Dr Panjabrao Deshmukh Nibandh Marathi

स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या विकास समितीचे ते सदस्यि झाले. भारताचे पहिले कृषीमंत्रीपद त्यांनी भूषविले. १९५२ ते १९६२ पर्यंत ते कृषी मंत्री होते. कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांच्या कार्याला नवीन दिशा मिळाली.

👉वृत्तपत्राचे मनोगत निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, हितासाठी खूप प्रयत्न केले. १९६० मध्ये दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले होते. हे प्रतिष्ठा मिळवणारे स्वतंत्र भारतातील पहिले कृषी प्रदर्शन होते.

शेतकरी स्थिती सुधारणा करण्यासाठी त्यांनी ” भारत कृषक समाज” स्थापन केले. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद वसतिगृह सुरू केले.Dr Panjabrao Deshmukh Nibandh Mahiti Marath

अशा महान व्यक्तीचे १० एप्रिल १९६५ रोजी मध्ये निधन झाले. कृषी व शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य हे आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मरणार्थ अकोल्यास पंजाबराव कृषी विद्यापीठ स्थापण्यात आलेले आहे. अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एक मोठे कृषी विद्यापीठ आहे.

तर मित्रांनो तुम्हाला “डॉ. पंजाबराव देशमुख निबंध मराठी | Dr Panjabrao Deshmukh Nibandh Mahiti Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ डॉ. पंजाबराव देशमुख निबंध मराठी सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button