ganesh utsav nibandh in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण गणेश उत्सव या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.
आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

गणेश उत्सव मराठी निबंध
आपल्या देशात प्रत्येक सण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला जातो. प्राचीन काळापासून हे सण साजरे करण्याची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे.
आपल्या संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवांना विशेष महत्व आहे. आपल्या देशात दिवाळी, होळी, रक्षाबंधन, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, दसरा असे अनेक सण मोठ्या आनंदात साजरे केले जातात.
आपण सर्वजण या सणांची आतुरतेने वाट पाहत असतो. प्रत्येकाला कोणता न कोणता सण खूप आवडतो. या सणांपैकी माझा आवडता सण गणेश उत्सव आहे.
लोकमान्य टिळक यांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव हा उस्तव सुरू केला.’ganesh utsav nibandh in marathi’
संपूर्ण भारतभर गणेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. महाराष्ट्रासह इतर ठिकाणीसुद्धा लोक खूप आतुरतेने या सणाची वाट पाहत असतात.
गणेश चतुर्थी या दिवशी गणेश उस्तव साजरा केला जातो.
गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी असेही म्हंटले जाते.
गणेशांना विद्देचे दैवत मानले जाते. गणेशोत्सव हा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला साजरा केला जातो.
Ganesh utsav nibandh in marathi
गणेश उत्सव येण्याच्या काही दिवस आधीच आपल्याला गणेशांच्या मूर्ती दुकानांमध्ये पाहायला मिळतात.
लहान मुले खूप दिवस आधीपासूनच गणेशांच्या आगमनाची तयारी करण्यासाठी सुरुवात करतात.
हा निबंध सुद्धा जरूर वाचा – गुढीपाडवा निबंध मराठी
बघता बघता गणेश चतुर्थीचा दिवस आलेला सजतच नाही. सर्वत्र गणपती बाप्पा मोरया हे शब्द कानावर पडत असतात. ढोल ताश्यांच्या गजरात गणेशांचे स्वागत केले जाते.
गणेश चतुर्थीला वाजत गाजत घरोघरी गणेशांची मूर्ती आणली जाते.
गणेश चतुर्थीला गणेशांच्या मूर्तीची पूजा अर्चना करून गणेशांच्या मुर्तीची स्थापना केली जाते व तिथून पुढे मोठ्या भक्तिभावाने गणेशांची पूजा केली जाते.
रोज सकाळी आणि संध्याकाळी गणेशांची आरती म्हंटली जाते. टाळ्यांचा आणि घंटीचा आवाज हे संपूर्ण वातावरण पाहून मन प्रसन्न होऊन जाते.
गणपतीची आरती झाली की सर्वाना प्रसाद दिला जातो.
घरोघरी प्रसादासाठी मोदक, पेढे, लाडू बनवले जातात. या दिवसात लहान मुलांची खूप मज्जा होते. प्रत्येक घरातील लोक प्रसाद म्हणून मोदक पेढे देतात.”गणेश उत्सव मराठी निबंध”
गणेशोत्सव हा लहान मोठ्या सगळयांच्या आवडीचा सण असल्यामुळे सर्वत्र खूप उत्साहाचे वातावरण असते.
गणेश उत्सवामध्ये बाजारपेठांमध्ये सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळते.
गणेश चतुर्थी मराठी निबंध
शाळांमध्ये, कंपन्यांमध्ये, कार्यालयांमध्ये अशा अनके ठिकाणीसुद्धा हा सण साजरा केला जातो.
गावातील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये भव्य आकर्षक देखावे केले जातात ते पाहण्यासाठी लोकांची भरपूर गर्दी होते.
या काळात अनेक भक्तीगीते आपल्या कानावर पडतात.
अनके ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. काही ठिकाणी नाटकांचे आयोजन केले जाते त्यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण असते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात,विचारांची देवाणघेवाण होते म्हणून हे सण साजरे करतात.
अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेशांच्या मूर्तीची पूजा करून त्यांचे विसर्जन केले जाते. गणपती विसर्जनाच्या वेळी सर्वांच्या मुखात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या हे उद्गार असतात.
आपण जे सण साजरे करतो त्यातून पर्यावरणाचे रक्षण होणे गरजेचे आहे.(ganesh utsav nibandh in marathi)
आपल्या अजीबाजूला प्रदूषण नसेन, आपल्या अजीबाजूच्या निसर्ग छान असेल तर आपल्याला व्यवस्थितपणे राहता येईल.
उत्सवांमध्ये आपण पारंपरिक वाद्यांचा उपयोग केला तर मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण कमी होऊ शकते.
प्रदूषण मुक्त उस्तव कसे साजरे करता येतील याचा विचार आपण केला पाहिजे.
आपण आधीच खूप प्रदूषणांच्या समस्यांना सामोरे जात आहे. त्यामुळे आपल्या जेवढे शक्य होईल तेवढे ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण व वायुप्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करू आणि आनंदात गणेशोत्सव साजरा करू.
असा हा गणेशोत्सव आपल्या सर्वांनाच खूप आवडतो.
तर मित्रांनो तुम्हाला “ganesh utsav nibandh in marathi” हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ या गणेश उत्सव या निबंधा संबंधीत काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.