ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी | Granth Hech Guru Nibandh Marathi

Granth Hech Guru Nibandh Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी | Granth Hech Guru Nibandh Marathi

 

आपल्याला आयुष्यात यश आणि उंची गाठण्यासाठी गुरु आणि मार्गदर्शकाची गरज असते. आपले ग्रंथच आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरतात.

गुरूब्रम्हा गुरर्विष्णु, गुरू र्देवो महेश्वर:
गुरू साक्षात परब्रम्हः, तस्मै श्री गुरूवे नम:

आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये गुरूंचे स्थान खूप महत्वाचे आहे. चांगले संस्कार लावण्यासाठी आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते.

व्‍यक्‍ती, समाज आणि राष्‍ट्र यांच्या उभारणीत ग्रंथांचे योगदान महत्‍त्‍वाचे आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात मार्गदर्शन मिळणे खूप गरजेचे असते. आपल्या गुरूकडून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात.

त्याप्रमणेच ग्रंथ हे आपले जिवलग मित्र आहेत, गुरू आहेत फक्त आपण त्या ग्रंथातील ज्ञान मिळविण्यासाठी त्यांचे वाचन केले पाहिजे.(ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी)

आपल्या जीवनाला दिशा देण्याचे काम ग्रंथ करत करत असतात. आपल्या संस्कृतीचे खरे वारसदार हे ग्रंथ आहेत. आपल्याला गुरूप्रमाणे मार्गदर्शन करण्याचे काम ग्रंथ करतात. बौध्‍दीक विकासासाठी ग्रंथांचे महत्‍त्‍व आहे.

ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी

ग्रंथ आपल्याला चांगल्या आणि वाईटात यातील फरक शिकवतात आणि आपल्याला योग्य मार्गावर चालण्यास शिकवतात.

ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामाची गाथा , एकनाथ गाथा असे विविध ग्रंथ आपल्याला मार्गदर्शक ठरतात. ग्रंथ हे आपल्याला भरपूर ज्ञान देतात. ग्रंथ हा असा खजिना आहे त्याचा उपयोग करून आपण समृद्ध होत जाऊ.

ग्रंथ आपल्याला जीवनाचा अर्थ समजण्यास मदत करतात. ग्रंथ आपल्याला खूप काही शिकवतात. ग्रंथाच्या वाचनातून आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते. अनेक महान लोकांनी ग्रंथाचे महत्व सांगितले आहे.

वाचन करण्याच्या सवयीमुळे आपल्याला ग्रंथांची, कवितांची, इतिहासाची माहिती आपल्याला मिळते. ग्रंथांमुळे आपण सुसंस्‍कृत होत असतो.

वेगवेगळ्या विषयांवरील ग्रंथ एकत्रित पाहिले तर ग्रंथांचे स्वतंत्र व वेगळे विश्व आपल्यासमोर उभे राहिल्यासारखे वाटते. ग्रंथांमध्ये लिहिलेले ज्ञान हे आपल्याला कधीही उपयोगी पडू शकते.

ग्रंथ एकाकीपणात आपल्याला वैचारिक बळ व विवेकाचा आधार देतात, धीर देतात. ग्रंथ हे ज्ञानदाते आहेत याचा अनुभव ग्रंथालयात येतो. गुरुप्रमाणेच ग्रंथाच्या अंगी लीनता असते. कळत न कळत त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्यास विनम्र बनवतात.

यशस्‍वी व्‍यक्‍तींच्‍या जीवनात ग्रंथालयांनी, पुस्‍तकांनी मोलाची भूमिका बजावली आहे. मला ग्रंथ, पुस्तके वाचण्याची आवड आहे. वाचनामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. ज्ञान कधीही वाया जात नाही असे म्हणतात ते अगदी बरोबर आहे.

दिसामाजी काही तरी ते लिहावे ।

प्रसंगी अखंडित वाचित जावे ।।

समर्थ रामदास स्वामी यांच्या या ओळींमधून वाचनाचे महत्व आपल्याला समजते.Granth Hech Guru Nibandh Marathi

ज्ञानेश्वरी हा सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने अनेक भाषांमध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे.

Granth Hech Guru Nibandh Marathi

ग्रंथ हेच आपले गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत. या ग्रंथांमधून असीम ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपविले जाते.

ग्रंथ किंवा पुस्तकांमधून आपल्याला ज्ञान मिळते. सदैव मानवाच्या कल्याणाची काळजी करणारे व मार्गदर्शन करणारे गुरू ग्रंथावाचून कोणीच नाही.

👉पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

आपल्याला वाचन करण्याची सवय लागली तर आपल्याकडे ज्ञानसामग्री वाढते. आपण वाचनाचा छंद जोपासायला हवा व रिकाम्या वेळत वाचन केले पाहिजे

तर मित्रांनो तुम्हाला “ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी | Granth Hech Guru Nibandh Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button