Gudi padwa nibandh in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण गुढीपाडवा या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

गुढीपाडवा निबंध मराठी
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक सणांमध्ये सर्वजण आनंदाने सहभागी होतात. दरवर्षी येणारे सण साजरे करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे.
सण हे आपल्यात एकोपा निर्माण करण्यास मदत करतात.
सणांचा देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे. आपण सर्व जण या सणांमुळे एकत्रित येतो. आपण सर्व गोष्टी बाजूला ठेवून या सणांमध्ये एकत्रित येऊन हे सण साजरे करतो.
आपल्या देशात खूप सण मोठ्या आनंदात साजरे केले जातात. आपल्या देशातील प्रमुख सणांपैकी गुढीपाडवा हा एक सण आहे.
गुढी या शब्दाचा तेलगू भाषेत ‘लाकूड अथवा काठी’ असा अर्थ आहे तसाच तो तोरण असाही आहे.’Gudi padwa nibandh in marathi’
गुढीपाडवा हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तसेच अनेक ठिकाणी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो.
पाडवा हा सण आपल्या भारत देशामध्ये खूप आनंदात साजरा केला जातो.
गुढीपाडवा हा सण वेगवेगळ्या नावाने व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
महाराष्ट्र राज्यात या सणाला गुढीपाडवा नावाने ओळखले जाते. गुढीपाडवा या सणाला पाडवो वा उगादी या नावाने सुद्धा ओळखले जाते.
हा निबंध सुद्धा जरूर वाचा- माझा आवडता सण दसरा
या दिवशी नवीन वर्ष सुरू होते त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्व आहे.
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मनाला जातो. या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते.
वसंत ऋतूचे आगमन सुद्धा याच दिवसापासून होते.
Gudi padwa nibandh in marathi
गुढीपाडवा निबंध मराठी – गुढीपाडवा या सनादिवशी भरपूर लोक महत्वाच्या कामांची सुरुवात करतात.
या दिवशी वस्तूंची खरेदी, सोने खरेदी, नवीन वास्तूंमध्ये प्रवेश, नवीन गाड्या , नवीन व्यवसायास सुरुवात करतात.
गुढीपाडवा या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठतात. घराच्या दारात छान रांगोळी काढली जाते. सूर्योदयानंतर गुडी उभारली जाते.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी उंच गुढी उभारली जाते. गुढी उभारण्याची परंपरा खूप प्राचीन आहे.
गुढीपाडवा सणाला उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
गुढी उभारण्यासाठी वेळूची लांब काठी स्वछ धुवून एका टोकाशी तांब्याचा कलश, एक वस्त्र नेसवून, फुलांचा हार, कडुलिंबाची पाने, साखरेचे बत्ताशे लावून अशी सुंदर गुढी घराजवळ उभारली जाते व आनंद साजरा केला जातो.
गुढीभोवती छान रांगोळी काढली जाते. गुढीची पूजा केली जाते. निरंजन व उदबत्ती लावली जाते. दुपारच्या वेळी गुढीला गोड नैवेद्य दाखवला जातो.
गुढीपाडवा या सणाचा इतिहास पुराणातून, आख्यायिका आणि कथांवरून माहिती करून घेतला जाऊ शकतो.
एका आख्यायिके नुसार ब्रह्म देवाने याच दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले आहे.
एका कथेनुसार श्रीराम चौदा वर्षांचा वनवास भोगून व लंकाधिपती रावण यांचा पराभव करून अयोध्येत परत आले होते.
अयोध्येतील जनतेने गुढ्या उभारून, तोरणे बांधून श्रीराम यांचे स्वागत केले.
गुढीपाडवा या सणाची अशी एक आख्यायिका प्रचलित आहे की, शकांचा पराभव करण्यासाठी शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने सहा हजार मातीचे पुतळे तयार करून त्यात प्राण घातले व त्यांच्या मदतीने याच गुढीपाडवा सनादिवशी शकांचा पराभव केला .
Essay on gudi padwa in marathi
या सनादिवशी सर्वांच्या घरी गोडधोड बनवले जाते. गुडीची पूजा करून झाली की कडुलिंबाची पाने आणि गूळ एकत्र करून सर्वाना खायला देतात.
कडुलिंब देण्यामागे कारण असे आहे की कडुलिंब खाल्ल्यामुळे आरोग्य नीट राहण्यास मदत होते व पचनास मदत होते.
कडुलिंबाची पाने ही मानवी शरीरासाठी खूप लाभदायक असतात. गुढीपाडवा हा दिवस अतिशय शुभ मनाला जातो.
पाडव्याच्या दिवशी सर्व जण एकत्रित येतात त्यामुळे घरातील वातावरण अगदी प्रफुल्लित होते.(गुढीपाडवा निबंध मराठी)
सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी गुढीची पूजा केली जाते त्यानंतर गुढी खाली घेतली जाते. गुढीला असलेल्या बत्ताश्या व कडुलिंब तसेच खोबरे प्रसाद म्हणून सर्वांना दिला जातो.
गुढीपाडवा या सणादिवशी आपण अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात व सर्वजण या कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतात.
असा हा आपल्या सर्वांच्या आवडीचा सण आनंदासोबतच नवचैतन्य देऊन जातो. या शुभदिनी आपण सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा देऊ व हा सण आनंदात साजरा करू.
तर मित्रांनो तुम्हाला “Gudi padwa nibandh in marathi” (गुढीपाडवा)हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ या निबंधा संबंधीत काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.