Guru purnima speech in marathi | गुरुपौर्णिमा मराठी भाषण

Guru Purnima Speech in Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण गुरुपौर्णिमा या विषयावर भाषण मराठी मध्ये पाहणार आहोत.

आम्ही या लेखातून विद्यार्थ्यांना सरावासाठी गुरुपौर्णिमा या भाषणसंबंधीत काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने विद्यार्थ्यांना निबंध व भाषणे उपलब्ध करून देत आहोत.

आम्हाला आशा आहे की हे भाषण तुम्हाला नक्की आवडेल.

 

Guru Purnima Speech in Marathi

 

भाषणाला सुरवात करण्यापूर्वी या आनंदमयी प्रसंगी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.

सर्वप्रथम सर्वांना गुरू पौर्णिमेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या व आकार देणाऱ्या प्रत्येक गुरूला माझ्याकडून प्रणाम.

माझे नाव शुभम. आज आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमा निमित्ताने एकत्र जमलेलो आहे. आपल्या सर्वांच्याच जीवनात गुरूंचे स्थान खूप महत्वाचे आहे.

दरवर्षीप्रमाणे या वर्षी ‘23 जुलै’ या दिवशी गुरूपौर्णिमा आहे व अनेक ठिकाणी  गुरूपौर्णिमा खूप आनंदात साजरी केली जाते.

आपल्याला चांगले संस्कार लावण्यासाठी व आपली प्रगती होण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते.

गुरूब्रम्हा गुरर्विष्णु, गुरू र्देवो महेश्वर:

गुरू साक्षात परब्रम्हः, तस्मै श्री गुरूवे नम:

Guru purnima speech in marathi
Guru purnima speech in marathi

आपल्या देशात सर्व सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते.“Guru Purnima Bhashan in Marathi”

कृष्ण-अर्जुन, द्रोणाचार्य-एकलव्य, रामकृष्ण, परमहंस, विवेकानंद अशा काही गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. गुरू या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.

आपल्याला योग्य मार्ग दाखवणाऱ्या व आपल्याला ज्ञान देणाऱ्या गुरूंचे पूजन करण्याचा हा दिवस आपल्या देशात मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

गुरु म्हणजे ईश्वराचे दुसरे रूप. आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरू पौर्णिमा.

गुरुपौर्णिमा या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हंटले जाते. शाळां-कॉलेजमध्ये व इतर क्षेत्रांमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या आनंदात साजरी केली जाते.

Guru Purnima Bhashan in Marathi

आपल्याला आपल्या आयुष्यात नेहमी कोणाचे ना कोणाचे मार्गदर्शन मिळतच असते.

आपण लहान असतो तेव्हा आपल्या आईवडिलांन कडून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळत असतात व आपले आईवडील आपल्याला चांगले संस्कार लावत असतात.

आपल्या शालेय जीवनामध्ये शाळेतील शिक्षक आपल्याला  योग्य मार्गदर्शन करून आपल्याला या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी हवे असलेले ज्ञान देतात.

आपले गुरू हे ईश्वराचे दुसरे रूपच आहेत. आपल्याला आपल्या जीवनप्रवासात मार्गदर्शन करणाऱ्या व आपले व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या आपल्या गुरुबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.

guru purnima speech in marathi for students

संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहित असताना ‘व्यासांचा मागोवा घेतो’ असे व्यास ऋषींबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून एक  सुंदर मडके घडवत असतो. त्याचप्रमाणे गुरु शिष्याला त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञान देत असतात.

आपल्याला आपल्या गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे आपण आयुष्यात यश मिळवत असतो. आपल्याला आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी चांगला गुरू लाभणे खूप गरजेचे असते.

गुरू त्यांच्या शिष्यांना त्यांच्याजवळ असलेल्या विचारातून व ज्ञानातून हुशार बनवतात. आपल्याला आपल्या जीवनात गुरू वेगवेगळ्या रूपात भेटतात.

आपण लहान असताना आपले आईवडील आपली काळजी घेतात व आपल्याला संस्कार लावतात. आपले आईवडील हे आपले पाहिले गुरू असतात.

जीवन जगत असताना आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला व शिकायला मिळत असतात. आपल्याला एक चांगला गुरू मिळणे खूप महत्वाचे असते. चांगल्या वाईट गोष्टींची माहिती आपल्या गुरूकडून आपल्याला मिळत असते.

गुरू पौर्णिमेला शाळा, मठ , मंदिर, आश्रम, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी गुरूंचे पूजन केले जाते.

आपल्या गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे आपण आपल्या आयुष्यात यश मिळवत असतो. आपले आईवडील हे आपले पाहिले गुरू असतात.

ते आपल्याला लहानपणापासून खूप गोष्टींचे ज्ञान देत असतात. आपल्याला येत असलेल्या अडचणींवर आपण कशा प्रकारे मात करू शकतो हे आपल्याला आपल्या आईवडिलांनकडून शिकायला मिळते.

आपले आईवडील आपल्याला चांगले संस्कार लावतात. आपण ज्ञान संपादन करणे का गरजेचे आहे हेही आपले आईवडील आपल्याला सांगत असतात.

जो सपना से नही मिलता है, वो किसी गुरु की दस्तक से मिलता हे, जीवन सूर्य से प्रकाशित होता है, जब साथ एक सच्चे गुरु का मिलता है जब साथ सच्चे गुरु का मिलता है.

जे आपल्याला नेहमी चांगले संस्कार देतात आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात ते आपले गुरूच आहेत.Guru Purnima Speech in Marathi

आपण आपल्या गुरूंचा आदर करायला हवा व नेहमी त्यांच्या आज्ञेचे पालन करायला हवे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडून आपल्याला काही न काही शिकायला मिळत असते.

ज्यांच्याकडून आपल्याला काही न काही शिकायला मिळते तसेच आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत असते ते आपले गुरुच.

गुरुपूर्णिमा मराठी भाषण | guru purnima speech in marathi

‘Guru Purnima Speech in Marathi’:-
गुरू त्यांच्या जवळ असलेले ज्ञान व त्यांचा अनुभव आपल्या शिष्याला देत असतो. त्या ज्ञानाचा वापर करून शिष्य आयुष्यात प्रगती करत असतो. . गुरु आणि शिष्य यांचे नाते आजही पवित्र मानले जाते.

गुरूचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे प्रगती होते त्यामुळे आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदर करावा

शिष्याला त्याच्या आयुष्यात मिळणारे यश हीच गुरुसाठी आनंदाची गोष्ट असते. आपण जर प्रामाणिकपणे व नम्रपणे आपले गुरू देत असलेले ज्ञान संपादन केले तर ते आपल्याला व्यवस्थितपणे समजू शकते.

गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.Guru Purnima Speech in Marathi

आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदर केला पाहिजे व त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा वापर करून जीवनामध्ये  आपल्या देशाचा विकास केला पाहिजे.

मला इथे बोलण्याची संधी दिली व माझे भाषण तुम्ही शांतपणे आणि काळजीपूर्वक ऐकले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो.
धन्यवाद

तर मित्रांनो तुम्हाला guru purnima speech in marathiगुरुपौर्णिमा मराठी भाषण ) भाषण आवडले असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल- pravinsankpal158@gmail.com

वरील लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

आम्ही देत असलली माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना share करा.

हे निबंध सुद्धा जरूर वाचा –

● जागतिक पर्यावरण दिन 

◆ वृक्षवल्ली आम्हा सोयरे 

● पर्यावरण संवर्धन काळाची गरज 

◆ मराठी भाषेचे महत्व

● वाचाल तर वाचाल

Leave a Comment

close button