hartalika puja vidhi in marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही मराठी मध्ये शोधत असाल तर आम्ही या लेखात hartalika puja vidhi, Hartalika puja sahitya in marathi तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
If you like Hartalika Puja Vidhi in Marathi then this is the right place for you.
hartalika puja vidhi in marathi | हरतालिका पूजा विधी मराठी
आपल्या देशातील अनेक राज्यांत हरितालिका व्रत साजरे केले जाते. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला दरवर्षी हरितालिकेचे व्रत केले जाते.
आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी स्त्रिया हे व्रत करत असतात. गणेशाच्या आगमनामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले असते. सर्वजण गणेशाच्या आगमनाची तयारी करताना दिसतात. यामध्येच महिला हरतालिका व्रताचीही तयारी करत असतात.
या वर्षी ३० ऑगस्ट २०२२ या दिवशी हरतालिका व्रत केले जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हा उत्सव साजरा केला जातो. अनेक महिला हरतालिका हे व्रत आवर्जून करतात.
हरतालिका हे व्रत आपल्या पतीला दिर्घायुष्य लाभावे यासाठी केले जाते त्यामुळे या सणाला एक विशेष महत्त्व आहे. महिला या दवशी उपवास पकडतात व आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभले यासाठी प्रार्थना करतात. हे व्रत केल्याने कौटुंबिक चिंता, संकटे दूर होतात असे म्हंटले जाते.
👉वटपौर्णिमेच्या शुभेच्छा वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
अनेक राज्यांत हरतालिका व्रताला तीज असेही म्हंटले जाते. कथा/आख्यायिकानुसार पार्वती देवीने शिवलिंगाची पूजा केली व कडकडीत उपवास केला. त्यांच्या तापाने भगवान शंकर प्रसन्न झाले व देवी पार्वती यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला.
मोठ्या आवडीने महिला या व्रताचे पालन करतात. विवाहित महिलाच नाही तर कुमारिकाही या दिवशी उपवास पकडून हे व्रत करू शकतात.
Hartalika Puja Vidhi in Marathi
- सर्वप्रथम ओल्या मातीने भगवान शंकर व देवी पार्वती यांची मूर्ती बनवून घ्यावी किंवा वाळूपासून शिवलिंग बनवून घ्या.
- जिथे पूजा करायची आहे ती जागा स्वछ करून घ्यावी.
- स्वच्छ केलेल्या जागेवर चौरंग ठेवावे व चौरंगावर स्वछ कापड ठेवून त्यावर एका प्लेटमध्ये मूर्ती स्थापित करून पूजेची तयारी करावी.”hartalika puja samagri in marathi”
- चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढू शकतो.
- त्यांनतर चौरंगावर तांदळापासून एक अष्टकमल तयार करावे व त्यावर कळस ठेवावा.
- तो कलश पाण्याने भरून घ्या व त्यामध्ये सुपारी, नाणे व हळद घाला. हे सर्व केल्यानंतर कलशवर वर स्वस्तिक बनवा.
- समोर सुपारी, खारीक, फळे ठेवावीत. पाच सुपारीच्या पानांवर तांदूळ घाला आणि त्यावर गौरी आणि गणेश मूर्ती स्थापित करा.
- देवासमोर दिवा लावावा. त्यांनतर देवाला अक्षता, हळद कुंकू, फुले वाहून पूजा सुरू करावी.
- घरातील वडीलधारऱ्यांचा आशिर्वाद घ्यावा व पूजेला सुरवात करावी.’Hartalika Sahitya in Marathi’
- त्यांनतर फुले परमेश्वराच्या चरणीअर्पण करावीत. पूजा झाल्यावर हरतालिकेची आरती म्हणतात व कथा वाचावी.
- सर्वांसाठी निरोगी आरोग्यासाठी व समृद्धीसाठी प्रार्थना करावी
hartalika puja samagri in marathi / Hartalika Sahitya in Marathi
या दिवशी देवी पार्वती व भगवान शंकर यांचे पूजन केले जाते. हरतालिका व्रत सर्व पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहे.
आपणही हे व्रत करत असाल आम्ही हे व्रत करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी खाली दिलेली आहे. हरतालिका व्रताच्या एक दिवस आधीच पूजेची ही सर्व सामग्री गोळा करावी जी खाली आम्ही देत आहे.
- भगवान शंकर व देवी पार्वतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी वाळू व मूर्ती ठेवण्यासाठी एक प्लेट.
- देवतांच्या मूर्ती ठेवण्यासाठी चौरंग
- चौरंग झाकण्यासाठी एक स्वछ वस्त्र.
- एक कलश,ताम्हण
- रांगोळी
- समई, आरतीसाठी घंटी
- हळदकुंकू, अष्टगंध, कापूर
- खडीसाखर, गुळखोबरे, पंचामृत
- गुलाल, बुक्का, सुपारी,
- विड्याची पाने, बदाम, खारका, गुलाल
- दूध, मध, दही
- श्रीफळ
- पूजेसाठी फळे-फुले, दुर्वा, तुळशीपत्रे बेलपत्र,आंब्याची पाने
- निरंजन, तूप, अगरबत्ती आणि धूप, दिवा लावण्यासाठी वाती इत्यादी.
तर मित्रांनो तुम्हाला हरतालिका पूजा विधी मराठी हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्याजवळ आणखी hartalika puja vidhi in in marathi, status, messages, images …….असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.
आजच्या या लेखात काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू…👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
धन्यवाद
“I found this article to be incredibly insightful and well-researched. The points you made about Hartalika Puja in Bangalore really opened my eyes to a new perspective. I’ve actually mentioned your post in my recent blog article about Hartalika Puja, you can check it out https://manshikpuja.com/index.php/2023/07/18/hartalika-puja-in-bangalore/. Keep up the great work!”