holi nibandh mahiti in marathi: नमस्कार आज आपण होळी निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.
हा निबंध लिहीत असताना होळी हा सण कधी व कशा प्रकारे साजरा केला जातो याची माहिती आपण पाहणार आहोत.
आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. Also Read- जागतिक महिला दिन निबंध मराठी
होळी निबंध मराठी | holi nibandh mahiti in marathi
आपल्या देशात अनेक सण मोठ्या आनंदात साजरे केले जातात. या सणांमुळे लोक एकत्रित येतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणांना खूप महत्वाचे स्थान आहे.
होळी हा आपल्या देशातील प्रमुख आणि अनेकांच्या आवडीचा सण आहे.
होळी हा भारतातील प्राचीन सण आहे. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी हा सण खूप आनंदाने व उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळ्या भागांमध्ये होळी या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
होळी या सणाला होलिकादहन, होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव या नावाने ओळखले जाते. होळीला रंगांचा सण असेही म्हटले जाते.
फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या उस्तवाला फाल्गुनोत्सव असेही म्हंटले जाते.
कोकणामध्ये या सणाला शिमगो असे म्हणतात. कोकणामध्ये होळी हा सण खूप महत्वाचा मानला जातो.
लहान मुले होळी रंगपंचमी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. या सणाच्या काही दिवस आधीपासूनच लहान मुले तयारीला लागतात.”holi nibandh mahiti in marathi”
महाराष्ट्र राज्यात होळीची तयारी म्हणून समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात व होळीभोबती लोक प्रदक्षिणा घालतात.
या दिवशी घराच्या आसपासच्या परिसरात स्वच्छता केली जाते.
माझा आवडता सण होळी निबंध मराठी | maza avadta san holi nibandh
होळीला रंगांचा सण असेही म्हणतात. होळीच्या दिवशी घरोघरी पुरणपोळ्या बनवल्या जातात. महाराष्ट्र राज्यात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची रीत आहे.
होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवला जातो व नंतर सर्वजण सुख समृद्धी साठी प्रार्थना करतात.
या दिवशी आनंदाचे वातावरण पसरलेले असते. अशा प्रकारे गावांमध्ये, शहरांमध्ये लोक एकत्रित येऊन होळीचे पूजन करतात. या सणाचा महत्वाचा भाग म्हणजे होलिकादहन.
होळी हा दोन दिवसांचा सण आहे. होळीच्या पहिल्या दिवशी होलिकादहन केले जाते. होलिकादहनामागे पौराणिक कथा आहे.
एका पौराणिक कथेनुसार प्रल्हाद हे भगवान विष्णूंचे भक्त होते. प्रल्हाद याना मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा भगवान श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकादेवतेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही.
प्रल्हाद याना मारण्यासाठी होलिकादेवतेने त्यांना मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. त्यामध्ये प्रल्हाद बचावले व होलिका देवतेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
होळीवर निबंध मराठी | holi nibandh mahiti in marathi
आपल्या जीवनातील तसेच समाजातील वाईट गोष्टींचा नाश व्हावा म्हणून होळी हा सण साजरा केला जातो.(होळी निबंध मराठी)
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते. या दिवशी एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण केली जाते.
धुलीवंदनाच्या सणाला धुलवड असेही म्हणतात. लोक एकमेकांना रंग लावून या सणाचा आनंद घेतात.
धुलीवंदनाच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून आनंद साजरा करतात. होळीदिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. सर्वत्र आनंदाचे वातावरण पहायला मिळते.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी लोक एकत्रित येतात त्यामुळे एकता निर्माण होते. लहान मुलांना हा सण फार आवडतो.एकमेकांना रंग लावून हा सण साजरा केला जातो.
शेतकरी वर्गामध्येही
या सणाचे फार महत्व आहे. होळी हा सण फाल्गुन महिन्यात येतो. या काळात शेतकरी बांधवांची शेतीची बरीच कामे संपलेली असतात. त्यामुळे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
प्रत्येकजण या सणामध्ये आवडीने सहभागी होतात. होळी हा सण एकमेकांमध्ये आपुलकी व जवळीक निर्माण करतो. असा हा होळीचा सण खूप आनंदात व उत्साहाने साजरा केला जातो.
तर मित्रांनो तुम्हाला “होळी निबंध मराठी” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ holi nibandh mahiti in marathi निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments किंवा email करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू. ई-मेल-pravinsankpal158@gmail.com
आजच्या होळी निबंध मराठी …. या लेखा मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
धन्यवाद
1 thought on “होळी निबंध मराठी २०२२ | holi nibandh mahiti in marathi”