Indian navy day information in marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात भारतीय नौदल दिन याबद्दल माहिती पाहणार आहोत.
दरवर्षीप्रमाणे आज ४ डिसेंबर रोजी आपण सर्व मोठ्या आनंदात भारतीय नौदल दिन साजरा करतो.
भारतीय नौदल दिन कधी साजरा कधी साजरा केला जातो? का साजरा केला जातो? अशा प्रश्नांची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
भारतीय नौदल दिन माहिती मराठी | Indian navy day information in marathi
४ डिसेंबर इंडियन नेव्ही डे म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो. भारतीय नौदलाने १९७१ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती.
ऑपरेशन ट्रायडंट हे या कामगिरीचे नाव होते. नौदलाच्या कामगिरीमुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले.
👉१ जून वाढदिवसानिम्मित हार्दिक शुभेच्छा वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
४ डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाल्यामुळे भारतीय नौदल हा दिवस( नौदल दिन) Indian navy day म्हणून साजरा करण्यात येतो. सागरी किनाऱ्यांचे रक्षण करण्यामध्ये नौदलाचे मोठे योगदान आहे.
भारतीय सागरी क्षेत्रात सुरक्षा व संतुलन राखण्यासाठी भारतीय नौदल नेहमी प्रयत्नशील असते.“Indian navy day information in marathi”
आपल्या भारत देशाच्या काही सीमा ह्या समुद्राने वेढलेल्या आहेत. भारतीय नौदल सागरी मार्गाने होणाऱ्या हल्ल्यांपासून आपल्या देशाचे रक्षण करीत आहे. आपले रक्षण करण्यासाठी आर्मी, वायू दल आणि नौदल नेहमीच मेहनत घेत असतात.
सागरी किनारे सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच शत्रूंपासून आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी व त्यांना अटकाव करण्यामध्ये नौदलाची महत्वाची भूमिका असते.
छत्रपती शिवाजी महाराज यांना “भारतीय नौदलाचे जनक” मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरमार बळकट करण्याकडे नेहमी भर दिला. त्यांनी आपल्या राज्याचे संरक्षण आणि बळकट करण्यासाठी एक मजबूत नौदल तयार करण्याकडे भर दिला.
भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. आपल्या देशाचे नौदलामध्ये १५५ युद्धनौकांच्या तोफा आहे. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत.
Indian navy day information in marathi
नौदलाच्या हवाई शाखेमध्ये ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.
भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट, डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.
स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत ही आपल्या भारतीय नौदलामध्ये सामील आहे.
भारतीय नौदल’ आणि ‘संरक्षण संशाधक आणि विकास ऑर्गनायझेशन’ने एकत्रित प्रयत्नांतून आयएनएस अरिहंतची निर्मिती करण्यात आली आहे.
निर्भयपणे भारतीय नौदल आपल्या सागरी किनाऱ्यांचे रक्षण करत असते. आपल्या देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलातील सर्वांना सलाम.
Indian navy day कधी साजरा केला जातो?
- दरवर्षी ४ डिसेंबर या तारखेला Indian navy day साजरा केला जातो.
तर मित्रांनो तुम्हाला “Indian navy day information in marathi / भारतीय नौदल दिन माहिती मराठी”हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की पाठवा.
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
धन्यवाद