{bhashan} जागतिक महिला दिन निबंध भाषण मराठी | Jagtik mahila din nibandh bhashan marathi | Mahila din speech in marathi

Jagtik mahila din nibandh marathi नमस्कार मित्रांनो आज आपण जागतिक महिला दिन निबंध मराठी
या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून आनंदात साजरा केला जातो. सर्वप्रथम स्त्रीशक्तीला माझा माझा मनाचा मुजरा आणि आपणा सर्वांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा. या लेखामध्ये आम्ही जागतिक महिला दिन निबंध भाषण मराठी | jagtik mahila din nibandh bhashan marathi |mahila din speech in marathi घेऊन आलो आहोत.

संपूर्ण जगभरात महिला दिन कधी व कशा प्रकारे साजरा केला जातो? या दिवसाचे महत्व काय आहे?  याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. Also Read – माझी आजी निबंध मराठी

जागतिक महिला दिन निबंध भाषण मराठी | Jagtik mahila din nibandh bhashan marathi

 

अनेक संकटांचा सामना करत आपल्या देशाच्या प्रगतीसाठी ज्यांनी मोलाचे योगदान दिले त्या सर्वांना मी सर्वप्रथम वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरवात करतो. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून आनंदात साजरा केला जातो.

दरवर्षी 8 मार्च या दिवशी संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. महिलांबद्दल आदर, अभिमान, सन्मान व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो.

या दिवसाला आंतराष्ट्रीय महिला दिन, जागतिक महिला दिन असेही म्हटले जाते. महिलांनी देशाच्या प्रगतीसाठी अनेक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. अनके यशस्वी व्यक्तींच्या जीवनामध्ये स्त्रियांचा मोलाचा वाटा असतो.

शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ, माता जिजाऊ यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत देशाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले. महिलांचे हक्क, शिक्षण याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्रत्येक महिलांसाठी हा दिवस आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असतो.

28 फेब्रुवारी 1909 या दिवशी न्यू यार्क पहिला महिला दिवस येथे साजरा करण्यात आला असला तरीही आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार जागतिक महिला दिन हा 8 मार्च या दिवशी निश्चित करण्यात आला. १९०७ साली पहिली आंतरराष्ट्रीय महिला परिषद स्टुटगार्ड या ठिकाणी भरली.(जागतिक महिला दिन निबंध मराठी)

👉 माझी आजी निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

पुढे ८ मार्च १९०८ रोजी न्यू यार्क मध्ये वस्त्रोद्योगातील अनेक स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात मिळून ऐतिहासिक निदर्शने करून दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता अशा मागण्या केल्या.

mahila din speech in marathi

या मागण्यांबरोबर लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष प्रौढ स्त्री-पुरुषां अशा सर्वांना मतदानाचा हक्क मिळावा अशीही मागणी करण्यात आली. स्त्रियांच्या या कृतीमुळे व स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ  १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या महिला परिषदेत ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा असा जो ठराव क्लारा ने मांडला, तो पास झाला.

बल्गेरिया आणि रोमानिया या देशांमध्ये हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो.(jagtik mahila din nibandh marathi)

आपल्या भारत देशात मुंबई येथे  ८ मार्च १९४३ रोजी पहिला महिला दिवस साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ मध्ये पुण्यामध्ये एक मोर्चा काढण्यात आला. पुढे युनोने १९७५ हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. आता ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात साजरा होऊ लागला आहे.

जागतिक महिला दिन २०२२ थीम 

 

Gender Equality Today for a Sustainable Tomorrow (सस्टेनेबल उद्यासाठी आज लैंगिक समानता) म्हणजेच “येणाऱ्या उज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता” ही आतंरराष्ट्रीय महिला दिन २०२२ या वर्षासाठी थीम आहे.

महिला दिन साजरा करत असताना एक थीम बनवली जाते. महिला दिन साजरा करत असताना पहिली थीम ही सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लानिंग फॉर द फ्युचर अशी ठेवण्यात आली होती. स्त्री कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत असते. देशाच्या प्रगतीमध्येही स्त्रियांचे योगदान फार मोलाचे आहे.हा दिवस अभिमानाचा दिवस असतो.

विविध क्षेत्रात महिला प्रगतीपथावर आहेत. अनेक क्षेत्रात महिलांनी उल्लेखनीय व  मोलाची कामगिरी बजावली आहे.

👉 माझी आजी निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

महिला दिनाचे महत्व समजण्यासाठी भाषण, निबंध स्पर्धा,  आयोजित करण्यात येतात. जागतिक महिला दिनानिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोरोना काळात स्त्रियांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. कोरोना संकटकाळात केलेले कार्य गौरवास्पद आहे. या दिवशी महिलांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना पुरस्कार दिले जातात.

असा हा महिला दिवस संपूर्ण जगभरात मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जातो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.

Jagtik mahila din nibandh marathi | Mahila din speech in marathi

तर मित्रांनो तुम्हाला जागतिक महिला दिन निबंध मराठी हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ jagtik mahila din nibandh marathi निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

आजच्या जागतिक महिला दिन निबंध भाषण मराठी | jagtik mahila din nibandh bhashan marathi |mahila din speech in marathi…. या लेखा मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍 आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button