जागतिक पर्यावरण दिन मराठी निबंध | jagtik paryavaran diwas marathi nibandh

jagtik paryavaran diwas marathi nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण जागतिक पर्यावरण दिन मराठी निबंध या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

आम्ही या लेखातून विद्यार्थ्यांना सरावासाठी जागतिक पर्यावरण दिन या निबंधासंबंधीत काही मुद्दे या निबंधामधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने विद्यार्थ्यांना निबंध उपलब्ध करून देत आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

जागतिक पर्यावरण दिन मराठी निबंध

 

पर्यावरण आणि मनुष्य यांचे अतूट नाते आहे. पर्यावरणाशिवाय आपले अस्तित्व शक्य नाही.

आपल्या आजूबाजूला असलेल्या पर्यावरणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी तसेच पर्यावरणामध्ये काही सकारात्मक बदल घडवण्यासाठी सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.

जागतिक तापमानवाढ, वृक्षतोड, प्रदूषण अशा समस्या आपल्यासमोर असल्यामुळे पर्यावरण संतुलन टिकवून ठेवणे खूप गरजेचे आहे.”jagtik paryavaran diwas marathi nibandh”

दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.

jagtik paryavaran diwas marathi nibandh
jagtik paryavaran diwas marathi nibandh

संयुक्त राष्ट्राने आपल्या आजूबाजूला असलेल्या पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यासाठी १९७२ पासून  ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.

प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिवशी एक थीम ठरवली जात असते व त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

पर्यावरण दिवस 2021 साठी Ecosystem Restoration  म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणं ही खास थीम आहे.

पर्यावरणाविषयी जनजागृती होण्यासाठी व पृथ्वीवर स्वच्छता ठेवण्यासाठी लोकांना प्रेरीत करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो.

Jagtik paryavaran diwas marathi nibandh

पर्यावरणाचा समतोल व्यवस्थित राहिला तरच आपले जीवन व्यवस्थित चालू शकते त्यामुळे आपले अस्तित्व टिकून राहण्यासाठी पर्यावरण समतोल व्यवस्थित राहणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला असणारी झाडे झुडपे ही आपल्यासाठी खूप उपयुक्त असतात.

निसर्गामधून मनुष्याला खूप गोष्टी मिळत असतात. निसर्ग हा मनुष्य जीवनाचा अविभाज्य भाग आहे.“जागतिक पर्यावरण दिन मराठी निबंध”

आपल्या आजूबाजूला असणारे हे वृक्ष वातावरणातील कार्बन डाइऑक्साइड  शोषून घेतात व आपल्याला जीवनावश्यक असलेला अक्सिजन प्रदान करतात.

वातावरणातील हवा स्वछ करण्यात वृक्ष खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. झाडे पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतात.

खूप गोष्टी आपल्याला या वृक्षांपासून मिळत असतात तरीही वृक्षांची संख्या कमी होताना आपल्याला दिसते.

पर्यावरणाची काळजी घेणे, पर्यावरण संवर्धन करणे का गरजेचे आहे त्याबद्दल जनजागृती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे.

पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करू शकतो. आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा पर्यावरण हित साधू शकतो.

पर्यावरण दिन साजरा करत असताना लोकांचा सहभाग असणे खूप गरजेचे आहे.

जागतिक पर्यावरण दिवस

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन अनेक शाळांमध्ये, कॉलेज मध्ये तसेच अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो

या दिवशी शाळांमध्ये निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते त्यामुळे मुलांना पर्यावरण संतुलन का गरजेचे आहे समजण्यास मदत होते.

आपण जर स्वतः पर्यावरणाची काळजी घेतली व पर्यावरणाचे महत्व पटवून सांगितले तर इतर लोकही त्यामध्ये सहभागी होतील.

हा दिवस साजरा करून इतरांनाही पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्रेरीत करत असतो.

जागतिक तापमानवाढ, वाढते प्रदूषण, पाऊसाची कमी अशा समस्या कमी करण्यासाठी व भविष्यात अशा समस्या पुन्हा आपल्या समोर येऊ नये यासाठी आपल्याला   पर्यावरणाचा विकास करण्यासाठी पाऊले उचलावी लागतील.

जागतिक पर्यावरण दिन मराठी निबंध – पर्यावरणामुळेचे आपल्या सर्वांचे जीवन शक्य आहे

आपल्यासमोर असलेल्या समस्या

 

  • जागतिक तापमान वाढ
  • जलप्रदूषण
  • वायुप्रदूषण
  • हवाप्रदूषण
  • वाढती लोकसंख्या
पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो ?

 

  • आपण घरी राहून छोट्या छोट्या गोष्टी करून पर्यावरण संवर्धनामध्ये आपले योगदान देऊ शकतो.
  • आपल्याला शक्य होईल तेवढी झाडे आपण लावली पाहिजेत.
  • नदीपात्रात व इतर ठिकाणी कचरा न टाकता तो कचरापेटी मध्ये टाकावा त्यामुळे जलप्रदूषण होणार नाही.
  • प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्‍या कापडी पिशव्यांचा वापर जास्त करू.
  • शक्य होईल तेवढी इंधन बचत करावी.
  • इतरांना पर्यावरणाचे महत्व सांगावे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यात वृक्ष खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. आपल्या आजूबाजूला असणारी झाडे राहिली तर पर्यावरण राहील. त्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करण्याकडे लक्ष द्यावे लागेल.

आपल्याला शक्य होईल तेवढे वृक्ष आपण लावले पाहिजेत.

पर्यावरणाचे संवर्धन होण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो.

आपल्या पुढील पिढीला स्वछ हवा मिळण्यासाठी, अनेक पर्यावरणीय समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी आपण पर्यावरणाची आतापासूनच काळजी घेऊया.

तर मित्रांनो तुम्हाला Jagatik paryavaran diwas marathi nibandhजागतिक पर्यावरण दिन मराठी निबंध )हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल- sankpal7729@gmail.com

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

हे निबंध सुद्धा जरूर वाचा –

Leave a Comment

close button