जय जवान जवान जय किसान जय विज्ञान मराठी निबंध | Jay jawan Jay kisan jay vidnyan nibandh in marathi

Jay jawan Jay kisan jay vidnyan nibandh in marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात जय जवान जवान जय किसान जय विज्ञान मराठी निबंध या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

जय जवान जवान जय किसान जय विज्ञान मराठी निबंध | Jay jawan Jay kisan jay vidnyan nibandh in marathi

 

जय जवान जय किसान ही घोषणा आपल्या सर्वांनाच माहीत आहे. श्री लाल बहादूर शास्त्री हे या घोषणेचे निर्माते होते. रामलीला मैदानावर आयोजित सभेमध्ये शास्त्रीजींनी ही घोषणा दिली होती.

जय जवान जय किसान ही आपल्या देशाची एक अतिशय लोकप्रिय घोषणा आहे. या घोषवाक्यातून आपल्या सुरक्षिततेसाठी सीमेवर उभा असलेले सैनिक आणि शेतात मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाचे दर्शन घडते.

👉पाणी अडवा पाणी जिरवा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ या वाक्यावरूनच अटलबिहारी वाजपेयी यांचे औदार्य समजून घेण्याचा प्रयत्न आपण करु शकतो. मे १९९८ मध्ये पोखरण अणुचाचण्या घेतल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी “जय जवान, जय किसान, जय विज्ञान” असे म्हटले.

ही घोषणा शास्त्रीजींनी रामलीला मैदानावर आयोजित सभेत दिली होती. या घोषणेला देशाची राष्ट्रीय घोषणा असेही म्हणतात. शास्त्रीजींनी तत्कालीन पंतप्रधान असताना १९६५ भारत आणि पाकिस्तानच्या युद्धादरम्यान हा नारा दिला होता.(जय जवान, जय किसान जय विज्ञान मराठी निबंध)

त्यावेळी लाल बहादूर शास्त्रीजी हे देशाचे पंतप्रधान होते. अशा संकटा दरम्यान राष्ट्रीय एकता मजबूत करण्यासाठी शास्त्रीजींनी ‘जय जवान, जय किसान’ हि घोषणा दिली.(जय जवान, जय किसान, जय विज्ञान मराठी निबंध)

कितीही ऊन,वारा,थंडी असली तरीही आपल्या देशात सैनिक आणि शेतकरी खूप मेहनत करून आपले काम पूर्ण समर्पणाने करतात परंतू त्या काळात आपले सैनिक आणि शेतकरी कमजोर होऊ लागले.

हे सर्व पाहून शास्त्रीजींनी त्यांच्यात उत्साह आणि जोश निर्माण होण्यासाठी जय जवान जय किसान चा नारा दिला. देशाच्या सुरक्षेसाठी तसेच देशाला संपत्तीने समृद्ध करण्यासाठी ‘जय जवान, जय किसान’ हि घोषणा महत्वाची आहे.

सैनिक आणि शेतकरी यांचे समाजातील योगदान, कर्तृत्व खूप मोठे आहे. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशाचा शेतकरी हे आपल्यासाठी अन्नदाता आहे. देशातील नागरिक उपाशी राहू नये यासाठी शेतकरीही आपल्या सर्वांसाठी शेतात कष्ट करतो.

Jay jawan Jay kisan jay vidnyan nibandh in marathi

शेती हीच आपल्या देशाची ताकद आहे. शेतकरी खूप कष्ट करून वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेऊन अन्न धान्याचा पुरवठा करण्यात मदत करतात. कधी उष्ण तापमानात तर कधी कडाक्याची थंडी सहन करत सैनिक देशाच्या सीमेवर तैनात असतात.

सीमेवर उभा असलेला सैनिक त्यांचा जीव धोक्यात घालून आपल्या देशाचे रक्षण करत असतो. आपला देश सुरक्षित रहावा यासाठी सैनिक सीमेवर उभे असतात. पुढील अडचणींना तोंड देऊ शकतील असा उत्साह आणि आत्मविश्वास या घोषणेच्या शब्दांनी देशभरातील लोकांमध्ये निर्माण केला.Jay jawan Jay kisan jay vidnyan nibandh in marathi

शास्त्रीजींनी जय जवान जय किसान हा नारा सैनिकांना देशाचे रक्षणासाठी प्रेरित करण्यासाठी व देशवासियांना प्रोत्साहन देण्यासाठी दिला होता.

अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान झाल्यावर जय जवान जय किसान मध्ये ‘जय विज्ञान’ आणखी एक शब्द जोडला.

लष्करी दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून याचे खूप महत्व आहे. यांनी दिलेला ‘जय जवान, जय किसान’ हा नारा आपल्याला सदैव मार्गदर्शन करत राहील.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी ध्वजारोहण झाल्यानंतर केलेल्या भाषणामध्ये देशाला “जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान” चा नारा दिला.

तर मित्रांनो तुम्हाला “जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान मराठी निबंध | Jay jawan Jay kisan jay vidnyan nibandh in marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान मराठी निबंध आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button