खो खो खेळाची माहिती मराठी | kho kho information in marathi | kho kho mahiti

kho kho information in marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता खेळ खो खो या विषयावर माहिती पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल.

खो खो खेळाची माहिती मराठी | kho kho mahiti

 

आपल्या देशातील लोकप्रिय खेळांपैकी खो खो हा एक खेळ आहे. हा खेळ इतर देशातही  खेळला जातो. आपण जे खेळ खेळत असतो त्यातून आपल्यामध्ये सांघिक भावना निर्माण होण्यास मदत होत असते. आपण जे खेळ खेळतो त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. आपले आरोग्य नीट राहण्यास मदत होते.

आपल्या देशात हॉकी, फुटबॉल, बैडमिंटन, क्रिकेट, कब्बडी, खो खो असे अनेक खेळ खेळले जातात. खो खो खेळामध्ये एक एक गुण मिळवण्यासाठी खेळाडूला खूप मेहनत करावी लागते. खो खो हा अतिशय लोकप्रिय खेळ आहे व हा खेळ खूप जण आवडीने व उत्सुकतेने खेळतात. भारतातील मैदानी खेळांपैकी खो खो हा खेळ आहे.

हा खेळ खेळण्यासाठी कोणत्याही विशेष साहित्याची गरज पडत नाही त्यामुळे कोणीही हा खेळ खेळू शकतो. या खेळामुळे शरीर तंदरुस्त व चपळ होते.

👉 2023 संविधान दिन निबंध भाषण मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

खो खो हा खेळ गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश याठिकाणी मोठ्या प्रमाणात खेळला जातो. यामध्ये शारीरिक कसरत असल्यामुळे खेळाडू शारीरिकदृष्ट्या अतिशय तंदुरूस्त, चपळ असतात.

अतिशय कमी खर्चाचा व खूप आनंद देऊन जाणाऱ्या खेळांपैकी खो खो हा एक खेळ आहे. खो खो खेळ खेळल्यानंतर शरीरातील आळस पूर्णपणे निघून जातो. हा खेळ खेळत असताना खेळाडू खूप मेहनत घेत असतात.

खो खो हा खेळ खेळण्यासाठी १११ फूट लांब व ५१ फूट रुंद मैदानाची आवश्यकता असते.खो खो खेळाची माहिती मराठी दोन संघांमध्ये हा खेळ खेळला जातो. प्रत्येक संघात १२ खेळाडूंचा समावेश असतो.

प्रत्यक्ष मैदानात ९ खेळाडू खेळतात. उर्वरित तीन खेळाडू राखीव असतात. खेळताना एखाद्या खेळाडूस दुखापत झाल्यास राखीव खेळाडूस खेळवले जाते. संपूर्ण खेळ हा साधारणतः ३७ मिनिटे खेळला जातो. दोन भागांमध्ये खेळाचे विभाजन केले जाते. दोन विभागांमध्ये ५ मिनिटे विश्रांतीसाठी वेळ असतो.

या दोन विभागांमध्ये आणखी दोन उपभाग केले जातात. पहिल्या उपभागात पहिल्या संघातील खेळाडू दुसऱ्या संघातील खेळाडूंचा पाठलाग करतात व दुसऱ्या संघातील खळाडू आपला बचाव करतात.

खो खो खेळाची माहिती मराठी | kho kho information in marathi

दुसऱ्या उपभागात पहिला संघ बचाव करताना व दुसरा संघ पहिल्या संघातील खेळाडूंचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन उपभागांमध्ये २ मिनिटांचा विश्रांतीसाठी वेळ असतो.

सुरुवातीला पंचांच्या समोर नाणेफेक केली जाते. नाणेफेक जिंकणारा संघ पळती किंवा पाठलाग याची निवड करतो. पुढील संघाने पाठलाग करण्याचा निर्णय घेतला तर त्या संघातील ८ खेळाडू दोन खांबांमध्ये असलेल्या चौकोनात आळीपाळीने एकमेकांपासून विरुद्ध दिशेला तोंड करून बसतात.

बचाव करणाऱ्या संघातील ३ खेळाडू मैदानात असतात व पाठलाग करणाऱ्या संघातील एक खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा असतो. खेळ सुरू होताच पाठलाग करणाऱ्या संघातील ९ वा खेळाडू वाचाव करणाऱ्या संघातील ३ खेळाडूंना बाद करण्यासाठी प्रयत्न करतो.

पाठलाग करत असताना खेळाडू एकमेकांना खो देतात. बचाव करण्याऱ्या खेळाडूला बाद करत असताना खेळाडूंमधील चपळाईचे दर्शन आपल्याला पाहायला मिळते. पाठलाग करणारा  ९ वा खेळाडू  आपली दिशा बदलू शकत नाही.

बचाव करणारा खेळाडू ज्या बाजूस आहे त्या बाजूस तोंड असेल त्या खेळाडूलाच पाठलाग करणारा खेळाडू खो देऊ शकतो. ज्या खेळाडूने खो दिलेला आहे तो खेळाडू ज्याला खो दिला आहे त्याची जागा घेतो.

जर एखाद्या खेळाडूने नियमांचे पालन केले नाही तर त्या खेळाडूस बाद केले जाते. बचाव करणारा खेळाडू मैदानाबाहेर गेल्यास तो खेळाडू बाद होतो. बचाव करणाऱ्या संघातील तीनही खेळाडू बाद झाल्यानंतर  पुढील तीन खेळाडू मैदानात येतात.

एक खेळाडू बाद केल्यानंतर पुढील विरुद्ध संघाला १ गुण दिला जातो. दोन्ही भागात जो संघ गुणांमध्ये आघाडीवर असतो तो संघ विजयी होतो. खो खो हा खेळ अतिशय चांगला आहे. अलीकडे भरपूर ठिकाणी खो खोचे सामने भरवले जातात.

शाळांमध्ये हा खेळ खेळण्यास मुलांना प्रोत्साहन दिले जाते. शाळांमध्ये खो खोच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.

राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धा भरवल्या जातात. खो खो या खेळाचे फायदे भरपूर आहेत त्यामुळे अनेकजण हा खेळ खेळतात. आपल्या देशात खो खोच्या राष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय कुमार स्पर्धा, आंतरशालेय स्पर्धा, राष्ट्रीय महिला स्पर्धा या स्पर्धा आयोजित केल्या जातात.

खो खो या खेळातील महत्वाचे नियम

  • हा खेळ दोन भागांमध्ये विभागाला जातो. या दोन भागांमध्ये विश्रांतीचा कालावधी ५ मिनिटे असतो.
  • पाठलाग करणाऱ्या खेळाडूने एका खांबाकडील दिशा पकडल्यावर तो आपली दिशा बदलू शकत नाही.
  • बचाव करणारा खेळाडू दोन खांबांना जोडणारी रेषा ओलांडू शकतो परंतू पाठलाग करणारा खेळाडू दोन खांबाना जोडणारी रेषा ओलांडू शकत नाही.
  • बचाव करणाऱ्या गटातील तीनही खेळाडू बाद झाल्यावर पुढचे तीन खेळाडू मैदानात येतात.
  • खो देण्यासाठी पाठलाग करणारा खेळाडू ज्या दिशेला आहे त्या दिशेला पाठ करुन बसलेल्या खेळाडूला खो देऊ शकतो. खो देताना पाठीवर थाप मारून खो असे म्हणणे गरजेचे आहे.

 

खो खो खेळाडूंची नावे
  • सारिका काळे
  • पंकज मल्होत्रा
  • मंदाकिनी माझी
  • प्रवीण कुमार

तर मित्रांनो तुम्हाला “खो खो खेळाची माहिती मराठी | kho kho information in marathi” ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की पाठवा. वरील लेखात काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद

Leave a Comment

close button