लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी निबंध | labhale amhas bhagya bolato marathi nibandh

labhale amhas bhagya bolato marathi nibandh: नमस्कार मित्रांनो आज या लेखात लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.

 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी निबंध | labhale amhas bhagya bolato marathi nibandh

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

कवी सुरेश भट यांनी लिहिलेल्या या सुंदर ओळ्या ऐकल्या की मराठी भाषा किती सुंदर आहे हे आपल्याला समजते. मराठी ही एक सुंदर आणि प्राचीन भाषा आहे. आपण सगळे खरच किती भाग्यवान आहोत कारण आपली मराठी ही मातृभाषा आहे.

आपल्या भारत देशात अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. मराठी भाषा मुख्यत: महाराष्ट्रात आणि गोवा याठिकाणी थोड्या प्रमाणात बोलली जाते.

मराठी भाषेची महान परंपरा आहे कारण ती अतिशय जुनी भाषा आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची मायबोली आहे. मराठी भाषा ही प्राचीन भाषा आहे. आपल्या भारत देशातील २२ अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी निबंध

मराठी भाषा ही आपल्याला आपल्या पूर्वजांकडून प्राप्त झाली आहे. थोड्या थोड्या फरकाने ती वेगळी भासते.

👉विद्युत सुरक्षा निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

मराठी भाषेला खूप प्राचीन इतिहास लाभलेला आहे. उत्तर कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू या राज्यातसुद्धा मराठी भाषा बोलली जाते.

दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात मराठी भाषेचा वापर केला जातो. मराठी भाषा ही फिजी, इस्रायल, मॉरिशस या देशातही बोलली जाते.

मराठी भाषा खूपच गोड आणि सुंदर आहे. संत ज्ञानेश्वर हे १३ शतकातील महान वारकरी संत होते. त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. संतांनी मराठी भाषेचा वापर आपल्या जीवनामध्ये केला. अनेक ग्रंथ, भारुडे ही मराठी भाषेमधून लिहिली गेली आहेत.

संत एकनाथांनी भारुडे सुद्धा लिहिले जी आजच्या काळातही प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मातीचे रक्षण केले. आज मराठी भाषा ज्या रुपात जिवंत आहे, ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. अनेक खेड्यांमध्ये रोज बोलली जाणारी मराठी भाषा ही जरी रांगडी असली, तरीदेखील त्यामध्ये कुठेतरी एक आपलेपण जाणवते.

कुसुमाग्रज यांनी विपुल प्रमणात लेखन करून मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. २० वर्षाच्या वयात त्यांनी ‘जीवनलहरी’ हा पहिला मराठी कवितासंग्रह प्रकाशित केला. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम त्यांनी घेतले.

कुसुमाग्रज हे आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. १९३३ साली जीवनलहरी’ हा कुसुमाग्रजांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. कुसुमाग्रज यांनी आपल्या बोलीभाषेत रचलेले कविता संग्रह खूप सुंदर आहेत.

labhale amhas bhagya bolato marathi nibandh

२७ फेब्रुवारी हा दिवस कवी विष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, लेखक, नाटककार कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. मराठी साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले.

👉विद्युत सुरक्षा निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान अवर्णनीय आहे. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.

आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. या दिवशी मराठी गायन ,वादन, वक्तृत्व स्पर्धा, मराठी निबंध स्पर्धा अशा यांचे आयोजन केले जाते.

अलीकडे अनेक संवाद हे जागतिक स्तरावर होत असल्या कारणाने लोक इंग्रजी भाषेचा वापर करत चालले आहेत . तरुण पिढी परदेशांत उच्च शिक्षणासाठी जाते, तिथे जाऊन त्यांनी तिथली बोलीभाषा जरूर शिकून घ्यावी परंतु आपली मायबोली मराठी भाषा ही बोलावी. जेणेकरून ती समृद्ध होईल.

आपल्या महाराष्ट्राला, मराठी साहित्याला खूप मोठा इतिहास आहे. आपण मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे. म्हणूनच मराठी भाषेचा जागर करून, तिला समाजामध्ये प्रतिष्ठित भाषेचा दर्जा मिळवून देण्याची जबाबदारी आता आपली आहे.

माझा मराठीची बोलू कौतुके।

परि अमृतातेहि पैजासी जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

तर मित्रांनो तुम्हाला “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी निबंध | labhale amhas bhagya bolato marathi nibandh” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी निबंध सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button