मी पाहिलेला महापूर निबंध मराठी | me pahilela mahapur marathi nibandh

me pahilela mahapur marathi nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण मी पाहिलेला महापूर या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

हा निबंध लिहीत असताना आपण महापूर येण्यामुळे काय नुकसान होऊ शकते? अशा कठीण प्रसंगी या संकटातून कसे बाहेर पडू शकतो? या विषयावर आपण माहिती मिळणार आहोत .

चला तर मग निबंधाला सुरुवात करूयात,

me pahilela mahapur marathi nibandh
me pahilela mahapur marathi nibandh

मी पाहिलेला महापूर निबंध मराठी

 

पावसाळ्याचे दिवस होते. आज सकाळपासूनच बातम्यांमधून जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात होती.

आमचे गाव नदीच्या शेजारीच वसलेले आहे. नदीमुळे आमचे सर्वांचे जीवन एकदम सुखकर झाले आहे. या सुंदर नदीमुळे आमच्या गावाची शोभा वाढते.  भरपूर लोकांचे उदरनिर्वाह याच नदीमुळे होतात.

पावसाळ्यात नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असते. एका गावातून दुसऱ्या गावात जाणारा पूल पूर्णपणे पाण्याखाली बुडून जातो. नदीकाठचे मंदिर सुद्धा दिसेनासे होते.

दरवर्षी पावसाळ्यात नदीचे रूप पाहण्यासारखे असते. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढले की घरातील आम्ही सर्व जण तसेच गावातील लोक आवडीने नदीचे पाणी पाहायला जातो.

दरवर्षी नदीला पावसाळ्यात भरपूर पाणी येते. परंतु या वर्षी पाऊस खूप जास्त प्रमाणात झाला.

या वर्षी नदीने वेगळेच रूप धारण केले होते. नेहमी शांत वाहणाऱ्या नदीने आज रौद्ररूप धारण केले होते. आम्हाला सर्वाना थोडीशी भीत वाटली.

हा निबंध सुद्धा जरूर वाचा- पाणी हेच जीवन निबंध मराठी

आम्ही सर्व जण लवकरात लवकर घराच्या दिशेने निघालो. जोरदार पावसाळा सुरुवात झाली होती. पावसाचा वेग आणखीनच वाढत होता.me pahilela mahapur marathi nibandh

सकाळी बातम्यांमधून सांगितल्याप्रमाणे पाऊस थांबण्याचे नाव घेत न्हवता. दरवर्षी पडणाऱ्या पाऊसाच्या तुलनेत या वर्षी पाऊस खूप पडत होता.

पाऊस जास्त झाल्यामुळे नदीला महापूर आला. पुराचे पाणी गावात प्रवेश करू लागले. महापुराने गावात थैमान घातले.

आमचे सर्व लक्ष्य नदीकडे होते.

पावसाचे वाढते प्रमाण पाहून सकाळीच गावाच्या सरांच्यानी छोटी सभा घेऊन गावकऱ्यांना काळजी घेण्यासाठी सांगितले होते.

गावातील झोपड्या वाहून चालल्या होत्या. नदीकाठावर असलेली घरे पाण्याखाली जाऊ लागली होती.

पाण्याची पातळी वाढतच होती. आम्ही हाच विचार करत होतो की हे संकट कधी टळणार. संपूर्ण गावात पाणी पाणी झाले होते.

गावातील सर्व लोकांनी या कठीण प्रसंगी एकत्र येऊन या संकटापासून कसे सुटायचे यावर विचार करू लागलो. महापुराच्या या संकटाशी सामना करण्यासाठी आम्ही सर्व जण सज्ज झालो.

आम्ही सर्वांनी इतरांना मदत करण्याचे ठरवले. सर्वाना एकमेकांचे काम वाटून दिले.

me pahilela mahapur marathi nibandh
me pahilela mahapur marathi nibandh

कोणी काय करायचे हे प्रत्येकाला माहीत होते. सर्वत्र पाणी असल्यामुळे वाट सापडणे अवघड झाले होते.

अनुभवी लोकांच्या सांगण्यावरून आम्ही सर्वप्रथम शेतातील व गोठ्यातील प्राण्यांना मोकळे सोडले. त्यामुळे खूप प्राण्यांचे प्राण वाचले.

Me Pahilela Mahapur Marathi Nibandh

सर्वात महत्वाची गोष्टी म्हणजे नदीकाठी राहत असलेल्या लोकांना काही लोक सुखरूप गावशेजारील टेकडीवर घेऊन गेले.

गावातील लहान लहान मुलांना, महिलांना सुखरूप जागी पोहचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

आम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे साहित्य घेऊन आम्ही गावाजवळील टेकडीवर जाऊन थांबलो. पाऊस अजूनही थांबला न्हवता.

आम्ही सर्व जण ओलेचिंब झालो होतो. लहान मुलांना भूक लागली होती परंतु खाण्यासाठी काहीच न्हवते.

पाऊस थांबण्याची व गावातील पाणी कमी होण्याची आम्ही वाट पाहत होतो. सर्वजण हीच प्रार्थना करत होते शेवटी पाऊसाने ऐकले. भरपूर वेळाने पावसाने विश्रांती घेतली.

गावात शिरलेले पुराचे पाणी कमी झाल्यानंतर आम्ही सर्व गावकरी गावामध्ये आलो. थोड्याच वेळाने आम्हाला शासनामार्फत अन्न, औषधे व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली.(मी पाहिलेला महापूर निबंध)

भरपूर नुकसान झाल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. शेतीचे भरपूर नुकसान झाले होते. पिकांची नासाडी झालेली होती.

घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे खूप महत्वपूर्ण गोष्टींचे नुकसान झाले. महत्वाचे कागदपत्रे वाहून गेली. अनेक अडचणींचा सामना आम्हाला करावा लागला.

पाऊसाच्या पाण्यामुळे सर्वत्र चिखल झाला होता. पुरामुळे आजूबाजूला कचरा पसरलेला  होता.

महापुराच्या सामना आम्ही केला परंतु महापुरामुळे झालेल्या नुकसानाचा सामना आम्हाला करावा लागणार होता.

हळूहळू सर्व परिस्थिती ठीक झाली. महापूराचे संकट टळून खूप दिवस झाले परंतु आजही ते संकट आठवले की थोडीशी भीती वाटते.

तर मित्रांनो तुम्हाला “me pahilela mahapur marathi nibandh” (मी पाहिलेला महापूर)हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ या निबंधा संबंधीत काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment

close button