मला आवडणारा कवी / माझा आवडता कवी मराठी निबंध | Majha Avadta Kavi Marathi Nibandh

Majha Avadta Kavi Marathi Nibandh: नमस्कार मित्रांनो आज या लेखात माझा आवडता कवी मराठी निबंध या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.

 

मला आवडणारा कवी निबंध / माझा आवडता कवी मराठी निबंध | Majha Avadta Kavi Marathi Nibandh

 

साहित्य क्षेत्रातील सर्वात मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कवी विष्णू वामन शिरवाडकर हे माझे आवडते कवी आहेत. विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. जीवन लहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल, विशाखा हे त्यांचे काही नावाजलेले साहित्य काव्य संग्रह आहेत.

विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज या नावाने आपले कवितालेखन करत. कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते.maza avadta kavi kusumagraj

लहान असतांनाच त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतले ज्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णु वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. कुसुमाग्रज यांचे वडील वकील होते. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती.

ती सर्वांची लाडकी होती. कवी वि. वा. शिरवाडकर यांनी अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ हे नाव धारण केले आहे. तेव्हापासून कवी विष्णु वामन शिरवाडकर हे कवी ‘कुसुमाग्रज’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

👉स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

त्यांच्या अनेक कविता आजही आपल्याला स्पूर्ती देतात. कुसुमाग्रज यांनी विपुल प्रमणात लेखन करून मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. २० वर्षाच्या वयात त्यांनी ‘जीवनलहरी’ हा पहिला मराठी कवितासंग्रह प्रकाशित केला.

मला आवडणारा कवी निबंध / माझा आवडता कवी मराठी निबंध

त्यांनी बी.ए. पर्यंतचे शिक्षण नाशिक येथील हं. प्रा. ठा. कला महाविद्यालयातून पूर्ण केले. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम त्यांनी घेतले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे काही काळ अशी कामे केली.

यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.

अक्षरबाग, मराठी माती, प्रवासी पक्षी, किनारा, श्रावण, जीवन लहरी इ. त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह आहेत.maza avadta kavi nibandh

कुसुमाग्रज हे आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. १९३३ साली जीवनलहरी’ हा कुसुमाग्रजांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांनी सन १९३३ साली ‘ध्रुव मंडळ’ ची स्थापना केली. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.

मला आवडणारा कवी निबंध

कुसुमाग्रज यांनी आपल्या बोलीभाषेत रचलेले कविता संग्रह खूप सुंदर आहेत. कुसुमाग्रज हे महान कवी होते त्याबरोबर एक समाजसुधारक देखील होते.

कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविले. अनेक सामाजिक चळवळीमधे त्यांनी सहभाग घेतला. कुसुमाग्रज यांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत.

👉स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

२७ फेब्रुवारी हा दिवस कवी विष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, लेखक, नाटककार कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.२७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

कविश्रेष्ठ कसुमाग्रज यांचे मराठी भाषेवर नितांत प्रेम होते. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे आहे.(maza avadta kavi short nibandh)

आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनादिवशी अनेक शाळांमध्ये भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा कार्यक्रमाचे आयोजन करून मराठी भाषेचे महत्व मुलांना सांगितले जाते.

कुसुमाग्रज यांचे 10 मार्च 1999 रोजी निधन झाले. कुसुमाग्रज यांच्या यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.

तर मित्रांनो तुम्हाला “मला आवडणारा कवी निबंध / माझा आवडता कवी मराठी निबंध | Majha Avadta Kavi Marathi Nibandh” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ मला आवडणारा कवी निबंध सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button