माझे आवडते शिक्षक निबंध मराठी | Majhe Avadte Shikshak Nibandh in Marathi

Majhe Avadte Shikshak Nibandh in Marathi : नमस्कार मित्रांनो आज या लेखात माझे आवडते शिक्षक निबंध मराठी या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी | Majhe Avadte Shikshak Nibandh in Marathi

 

गुरूब्रम्हा गुरर्विष्णु, गुरू र्देवो महेश्वर:
गुरू साक्षात परब्रम्हः, तस्मै श्री गुरूवे नम:

चांगले संस्कार लावण्यासाठी आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आपले आईवडील आपल्याला चांगले संस्कार लावतात तसेच शाळेतील शिक्षक ज्ञान देत असतात.

शिक्षक ही आपल्या जीवनातील ती व्यक्ती आहे, जी आपल्याला चांगल्या शिक्षणासोबतच इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकवते. शिक्षक आपल्या जीवनात सर्वात महत्वाची भूमिका बजावतात.

आपल्याला आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी उत्तम मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. आपले आईवडील आपल्याला चांगले संस्कार लावतात. आपल्याला चांगले शिक्षण आणि संस्कार मिळणे महत्वाचे असते.

👉पाणी अडवा पाणी जिरवा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

भरपूर गोष्टी आपल्याला शालेय जीवनात आपल्या शिक्षकांकडून शिकायला मिळतात.

माझ्या शाळेतील सर्वच शिक्षक खूप छान आहेत, सर्व शिक्षक आम्हाला भरपूर ज्ञान देतात पण त्या सर्व शिक्षकांमध्ये माझे सर्वात आवडते शिक्षक म्हणजे रणपिसे सर आहेत. शाळेत गेल्यावर माझ्यासाठी सर्व काही नवे होते.

मी इयत्ता सातवीमध्ये असताना सर दुसऱ्या शाळेतून बदली होऊन आमच्या शाळेमध्ये आले.

पहिल्यांदा आम्हाला सर कडक स्वभावाचे वाटले परंतु तसे न्हवते. रणपिसे सर स्वभावाने अतिशय प्रेमळ आहेत. त्यांचा आवाज खोल, स्पष्ट आणि प्रभावी आहे. ते विनाकारण रागावत नाहीत. ती नेहमी प्रसन्न व हसतमुख असतात.

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी

शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सरांचे नेहमी प्रयत्न चालू असतात.

मला माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीकडून काही शिकायला मिळते त्यांना मी माझे गुरू मानतो. जसे माझे आईवडिल माझे गुरू आहेत तसेच रणपिसे सरांना मी माझे गुरू मानतो.“माझे आवडते शिक्षक निबंध मराठी”

रणपिसे सर आम्हाला गणित विषय शिकवतात. सरांची शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी असल्यामुळे आम्हाला समजून घेण्यास सोपे जाते. ते प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे उदाहरणांसह समजावून सांगतात.

सर शिकवत असताना आम्हा मुलांची मनस्थिती जाणून घेतात. सर कधी वेळ मिळाला की प्रेरणादायी गोष्टी सांगून आमचा आत्मविश्वास वाढवतात. सर कधी कधी आम्हाला गोष्टीही सांगतात.

सर जसे प्रेमळ आहेत तसेच शिस्तप्रिय सुद्धा आहेत. ते आम्हाला आदर्श जीवन जगण्याचा सल्ला ते सर्व विद्यार्थ्यांना देत असतात.

सर वेळेला खूप महत्व देणारे असल्यामुळे आम्हालासुद्धा वेळेचे महत्व समजले. शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक देखील त्यांचा आदर आणि कौतुक करतात.

आपण जीवनाकडे नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे आणि वाटेत येणाऱ्या कोणत्याही आव्हानाचा सामना केला पाहिजे तसेच कोणत्याही कठीण परिस्थितीत हार मानू नये ,आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी झगडत राहिले पाहिजे हे सांगून आमचा आत्मविश्वास वाढवत असत.

मला तर सरांचा तास कधी येतोय असे वाटते. सर शिकवताना आमच्या मनातील शंकासुद्धा दूर करत असतात. परीक्षेची तयारी करण्यासाठी सर सर्व सराव परीक्षा घेतात.

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी | Majhe Avadte Shikshak Nibandh in Marathi

शिक्षणासोबत सर आम्हाला आमच्या भवितव्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत हे सुद्धा सांगत असतात. शाळेला एक कुटुंब मानतात.

👉पाणी अडवा पाणी जिरवा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

ते वेळेला आणि शिस्तीला खूप महत्त्व आहे. आयुष्यात कधीही वेळ वाया घालवू नये यासोबतच माणसाचे जीवन शिस्तबद्ध असावे असे त्यांना वाटते.Majhe Avadte Shikshak Nibandh in Marathi

वर्गामध्ये गणित विषय शिकवत असताना सर आम्हाला अनेक यशस्वी लोकांनी त्यांच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी घेतलेले श्रम सांगत असतात.

सर आमच्यासोबत एकदम मित्रासारखे वागतात. एखादी गोष्ट समजली नसेन तर ती गोष्ट वर्गामध्ये सरांना विचारायला भीती वाटत नाही.

शाळेतील सर्व कार्यक्रमात सरांचा खूप मोलाचा वाटा असतो. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट हे कार्यक्रम जवळ आले की सर ५ ते ६ दिवस आधीच आमची तयारी करून घेत असतात.

सर अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष आहेत. शाळेतील सर्व कामे सर अतिशय जबाबदारीने करत असतात.

त्यांनी आम्हाला चांगल्या सवयी लावल्या आहेत. गणित विषयासोबत सर क्रीडाशिक्षक सुद्धा आहेत. सर नेहमी खेळांचे महत्व आम्हाला सांगत असतात. खेळ आपल्या जीवनात का गरजेचे आहेत हे नेहमी पटवून देत असतात.

सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यंदाच्या वर्षी शालेय क्रिकेट स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. सर मुलांना नेहमी खेळांसाठी प्रेरित करतात.

सरांचे शाळेतील स्वछतेकडे खूप लक्ष असते. सर स्वतः आमच्यासोबत शाळेची स्वछता करतात. स्वच्छतेसाठी सर छोटे छोटे उपक्रम घेत असतात. सर्व मुलांची ते काळजी घेतात.

शिक्षक जगात ज्ञानाचा प्रकाश पसरवतात, शिक्षक आपल्या सर्व सर्वांना मार्गदर्शन करतात. आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखतात व योग्य मार्गदर्शन करतात.

त्यांच्यासारखे अफाट ज्ञान, आपुलकी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले शिक्षक मला मिळाले आहेत. माझ्या प्रिय सरांनी मला नेहमीच शिस्तबद्ध राहायला शिकवले आहे त्यामुळे नेहमीच शिस्तीचे पालन करतो.

तर मित्रांनो तुम्हाला “माझे आवडते शिक्षक निबंध मराठी | Majhe Avadte Shikshak Nibandh in Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ माझे आवडते शिक्षक निबंध मराठी आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button