majhi aaji nibandh in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण माझी आजी मराठी निबंध या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.
आम्ही या लेखातून विद्यार्थ्यांना सरावासाठी माझी आजी या निबंधासंबंधीत काही मुद्दे या निबंधामधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आजीचे महत्व हे प्रत्येकाच्या जीवनात खूप आहे. ज्या घरात आजी आजोबा असतात त्या घरात नेहमी आनंद व प्रेम असते.
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने विद्यार्थ्यांना निबंध उपलब्ध करून देत आहोत.
आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
माझी आजी मराठी निबंध | majhi aaji nibandh in marathi
आई बाबा जसे माझे लाड करतात तसेच माझी आजीही माझे खूप लाड करते. माझी आजी अतिशय प्रेमळ, साधी व खूप कष्टाळू आहे. आजी सर्वांची काळजी घेत असते त्यामुळे मला माझी आजी खूप आवडते.
माझ्या आजीचे नाव सुवर्णा आहे. आजी आम्हाला नेहमी त्यांच्या बालपणातील गोष्टी सांगत असते. त्याकाळी शिक्षणाच्या जास्त सोयी उपलब्ध न्हवता.
शाळेत जाण्यासाठी वाहने मिळत नसल्यामुळे शाळेत जाण्यासाठी चालत जावे लागत असे.
अशा परिस्थितीत आजीने शिक्षण घेतले. आजी रोज पहाटे सगळ्यांच्या आधी उठते. सर्व आवरून देवपूजा करते त्यामुळे सर्व घर अगदी प्रसन्न होऊन जाते.
आजी नियमितपणे रोज सकाळी चालायला जाते. त्यामुळे आजी नेहमी निरोगी असते.

घरातील लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी आजी तयार करते. माझी आजी खूप अनुभवी आहे व भरपूर ठिकाणी त्यांचा अनुभव आम्हाला मदत करत असतो.
त्यामुळे घरातील सर्वजण महत्वाच्या गोष्टीमध्ये त्यांचा सल्ला घेणे योग्य समजतात
आजीच्या हातचे जेवण तर खूप स्वादिष्ट असते. आजी खूप छान जेवण बनवते. घरातील सर्व कामांकडे आजीचे लक्ष असते. आजीचे स्वच्छतेकडे खूप लक्ष असते.
माझी आजी मराठी निबंध | mazi aaji nibandh in marathi
आईला आजी कामात खूप मदत करत असते. घरातील सर्व काम आवरून शेतातील कामातही आजी लक्ष देते. शेतीमध्ये तर आजीचा अनुभव नेहमी उपयोगी पडतो.
आजीच्या प्रेमळ स्वभावामुळे आम्ही सर्वजण खुओ आनंदात व एकत्रित राहतो.
हा निबंध सुद्धा जरूर वाचा – जागतिक पर्यावरण दिन
माझी आजी खूप दयाळू व विचारशील आहे. आजीला लहानपणापासून वाचन करण्याची खूप आवड होती. आताही आजीला कामातून वेळ मिळाला की ती वाचन करत असते.
आजी नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असते. आजीच्या मार्गदर्शनामुळे आमच्या परिवाराची प्रगती होत असते. माझे आईबाबा नेहमी आजीचा सल्ला घेत असतात.
Majhi aaji nibandh in marathi
आजी मधून मधून घरातील समस्यांबद्दल सर्वांशी चर्चा करते व त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करते.घरातील सर्वजण आजीच्या निर्णयांचा सन्मान करतात.
मला जसे माझ्या आईबाबा यांच्याकडून शिकायला मिळाले तसेच खूप गोष्टी मला अजीकडूनही शिकायला मिळाल्या.
आजीने मला खप गोष्टी शिकवल्या व मला चांगले संस्कार लावले. आजीने दिलेले चांगले संस्कार आणि शिकवण मी कधीही विसरत नाही.
हे निबंध सुद्धा जरूर वाचा – वृक्षवल्ली आम्हा सोयरे
महत्वाचे म्हणजे मी कधी आजारी पडलो तर आजी काही घरघुती उपाय करून माझी काळजी घेते. गावामध्ये कोणता कार्यक्रम असेन तर आजी मला घेऊन जाते.
आजी मला नेहमी चांगले वाईट यामधील फरक समजावत असते. त्यांच्या जीवनातील संघर्ष आजी मला नेहमी सांगत असते.
त्यांना जीवनामध्ये कोणत्या अडचणी आल्या हेही सांगत असते.
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर आजी वेगवेगळे पदार्थ बनवते. माझा शाळेचा अभ्यास करण्यात आजी मला खूप मदत करते. मला माझी आजी सकाळी भल्या पहाटे अभ्यासासाठी उठवते.
माझी आजी मराठी निबंध
आजी वेळेला खूप महत्व देते. कोणतेही काम आळस सोडून कसे करावे हे मला माझ्या आजीकडून शिकायला मिळाले.
आजीला झाडे लावायला व ती सांभाळायला खूप आवडते. आजी मला नेहमी वृक्षांचे महत्व काय आहे याची महती देत असते.
माणसाने नेहमी आळस झटकून त्यांच्या क्षेत्रात कार्य करत राहावे असे आजी नेहमी सांगत असते.
आजी घरातील खूप महत्वाची व्यक्ती आहे. अजीमुळे खूप समस्यांपासून घर दूर राहते. आजी संपूर्ण घर एकत्रित ठेवते.
आजीची तब्बेत आजही खूप चांगली आहे. आमच्या परिवारासाठी आजी खूप महत्वाची आहे म्हणून आम्ही सर्वजण आजीची खूप काळजी घेत असतो.
मला तर माझ्या आजीचा खूप अभिमान वाटतो. मला नेहमीच्या माझ्या आजीचे प्रेम व मार्गदर्शन मिळत असते.
तर मित्रांनो तुम्हाला “majhi aaji nibandh in marathi” ( माझी आजी मराठी निबंध
)हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल- sankpal7729@gmail.com
वरील लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
आम्ही देत असलली माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना share करा.
Thanks for useful
Thanks