माझी माय निबंध मराठी । Majhi Maay Marathi Nibandh

Majhi Maay Marathi Nibandh: नमस्कार मित्रांनो आज या लेखात माझी माय निबंध मराठी या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया

माझी माय निबंध मराठी । Majhi Maay Marathi Nibandh

 

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

आपल्याला चांगले विचार चांगली शिकवण आपली आई देत असते. ‘आ’ म्हणजे आत्मा, ‘ई’ म्हणजे ईश्वर. आपले आई वडील कोणतीही अपेक्षा न ठेवता नेहमी आपल्यासाठी मेहनत घेत असतात. आपल्याला चांगले शिक्षण मिळावे त्यासाठी प्रयत्न करत असतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात आई खूप महत्वाची भूमिका बजावत असते. आईकडून खूप गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात ज्यांचा उपयोग आपल्याला नेहमी होतो.

👉माझे आवडते शिक्षक निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

माझी माय खूप प्रेमळ, कष्टाळू आहे. माझ्या आईचे नाव हे नंदा आहे. आईचा जन्म हा…..या खेडेगावात गावात झाला. कुटुंबातील लोकांची आईला फार काळजी असते.

पहाटेपासून आईच्या दिवसाची सुरुवात होते. माझी आई गृहिणी आहे. देवपूजा, सर्व जणांचे जेवण बनवून, बाकीची सर्व कामे माझी आई न थकता करत असते.

माझी माय निबंध मराठी

माझी आई माझी खूप काळजी घेते. आई कोणत्याही परिस्थितीत असो, पण माझ्या सुख-सुविधांची तिला नेहमीच काळजी असते. आई स्वचछतेकडे खूप जास्त लक्ष देत असते. घरातील व घरच्या आजुबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवत असते.

आईचे माझ्या अभ्यासाकडे नेहमी लक्ष असते. माझी माय माझी प्रेरणा आहे. माझ्या आईने माझ्यावर जीव लावता लावता मला शिस्तही लावली. माझ्या मनातील सर्व गोष्टी तिला सांगायला मला खूप आवडतात. ती संपूर्ण कुटुंबाची काळजी घेते.(माझी माय निबंध मराठी)

माझी आई माझी पहिली गुरू आहे कारण मी माझ्या आयुष्यात जे काही सुरुवातीच्या काळात शिकलो ते माझ्या आईने मला शिकवले आहे. आज मी माझ्या आयुष्यात जो काही आहे तो फक्त माझ्या आईमुळे आहे कारण माझी आई नेहमी माझ्या सोबत असते.

काय चांगले काय वाईट हे वेळोवेळी समजावून सांगत असते. आईने सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टींनी माझ्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला आहे. जीवन कसे जगायचे हे शिकवले, समाजात कसे वागायचे हे शिकवले.

👉माझे आवडते शिक्षक निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

माझ्या आईने माझी खूप काळजी घेतली आहे. मला नेहमी प्रेमाने वाढवले आहे. मला चांगले शिक्षण मिळावे यासाठी आईने खूप मेहनत घेतली आहे. आजही आईकडून मला काही ना काही शिकायला मिळत असते.

Majhi Maay Marathi Nibandh

मला माझ्या आईचा खूप अभिमान वाटतो. माझी आई माझ्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावते, ती माझी शिक्षिका आणि मार्गदर्शक तसेच माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे.Majhi Maay Marathi Nibandh

मी नेहमी माझ्या आईच्या आरोग्याची काळजी घेईल आणि आईला दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करेन. माझ्या आईने आणि वडिलांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले आहेत म्हणून ते माझ्यासाठी आदर्श माझा आहेत.

आई आपल्याला चांगल्या वाईटाचे ज्ञान देते. आई आपल्यासाठी पूजनीय आहे. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो आणि तिला चांगले आरोग्य आणि आनंदी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

तर मित्रांनो तुम्हाला “माझी माय निबंध मराठी । Majhi Maay Marathi Nibandh” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ माझी माय निबंध मराठी सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button