मला पडलेले स्वप्न मराठी निबंध | Mala padlele swapna marathi nibandh

mala padlele swapna marathi nibandh: नमस्कार मित्रांनो आज आपण मला पडलेले स्वप्न निबंध मराठी या विषयावर निबंध पाहणार आहोत.

स्वप्न म्हणजे काय हे तर सर्वांनाच माहिती असते. स्वप्न प्रत्येकालाच पडतात. स्वप्न कोणाला पडत नाही असे नाही.

स्वप्न कधी चांगले असते तर कधी भयावह आणि काही वेळा कायमस्वरूपी आठवण म्हणून सुद्धा ही स्वप्न राहतात.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

मला पडलेले स्वप्न निबंध मराठी | Mala padlele swapna marathi nibandh

 

दुसऱ्या दिवशी शाळेत कार्यक्रम असल्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून शाळेची स्वच्छता केली. इतरत्र पडलेला कचरा गोळा करून कचरापेटी मध्ये टाकला.

आम्ही सर्वजण स्वछता झाल्यावर घरी निघालो. शाळेतील स्वच्छता व शाळा घरापासून खूप अंतरावर असल्यामुळे सर्वच जण खूप थकलो होतो.

👉वृक्षवल्ली आम्हा सोयरे मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

खूप काम काम झाल्यामुळे जेवण केल्यावर मी लगेच गाढ झोपी गेलो व मला एक स्वप्न पडले. मला लहानपणापासून ऐतिहासिक, नैसर्गिक ठिकाणांना भेटी देण्याची खूप आवड.

मी स्वप्नात एका जंगलामध्ये गेलो होतो. जंगलातील हिरवीगार झाडे व आजूबाजूचा सुंदर निसर्ग पाहून मी जंगलामध्ये पुढे पुढे जात होतो. पहिल्यांदा मनामध्ये भीती वाटत होती. मी एकटाच जर कोणत्या प्राण्याने माल पकडले तर? मी परत माझ्या घरी कसे जाऊ? असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये येत होते.

परंतु अशा खूप गोष्टी माझ्या नजरेस पडत होत्या त्या पाहून माझे परत जाण्याचे मन होत न्हवते. काही वेळ चालत राहिल्यावर  मला एक नदी पाहायला मिळाली. मी नदीच्या जवळ येऊन पोहोचलो.

नदीतील पाणी खूपच स्वछ होते. खूप वेळ मी तिथेच बसून राहिलो.’mala padlele swapna marathi nibandh’

नदीच्या शेजारीच एक छोटीशी बाग होती. मी कधीही न पाहिलेले फुले मला त्या बागेत पाहायला मिळाली. मला अनेक छान पक्षी प्राणी खूप जवळून पाहायला मिळाले.

खूप वेळ तिथे बसल्यावर माझ्या मनात विचार आला की जर एखादा वाघ सिंह तिथे पाणी पिण्यासाठी आला व त्याने आपल्याला पाहिले तर तो आपल्याला खाऊन टाकेन य भीतीने मी तिथून लगेच निघालो व सुरक्षित जागी येऊन बसलो.

मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध | me pahilele swapna Marathi nibandh

खूप चालल्यामुळे मी खूप थकलो होतो व मला भूकही लागली होती. मला आजूबाजूला काही फळांची झाडे दिसली. त्या झाडांची फळे खाऊन मी त्याच झाडाखाली थोडा वेळ विश्रांती केली व नंतर पुढे चालत राहिलो.

👉वृक्षवल्ली आम्हा सोयरे मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

पुढे मला एक गुहा दिसली. मला पहिल्यांदा ती गुहा कोणत्यातरी प्राण्याची वाटली. गुहेत प्रवेश करण्यासाठी मन मानत न्हवते. परंतु थोडेशे धाडस करून मी गुहेत काय  आहे हे पाहण्यासाठी गुहेत प्रवेश केला. “मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध”

गुहेत पहिल्यांदा अंधार होता परंतु जसे जसे मी पुढे जाऊ लागलो तास तास उजेड दिसू लागला. मी पुढे चालत होतो. थोडा वेळाने गुहा संपली व एक सुंदर बाग मला पाहायला मिळाली.

त्या बागेत खूप सुंदर सुंदर फुले मला खूप जवळून पहायला मिळाली. पक्ष्यांचे छान छान आवाज माझ्या कानावर पडत होते. मी खूप वेळ बागेत घालवला. आता अंधार होऊ लागला होता.

मला पडलेले स्वप्न निबंध मराठी

मी घराकडे परत जाण्यासाठी निघालो परंतु मी ज्या मार्गाने आलो होतो तो मार्गच मला सापडत न्हवता. खूप प्रयत्न केला परंतु मला यश मिळाले नाही. मी निराश होऊन एका झाडाखाली बसलो.

तेवढ्यात मला काही लोक तिथून जाताना दिसले. परंतु त्यांना मी विचारले व त्यांनी मला पकडून ठेवले तर काय होईल या विचाराने माझ्या मनात शंका आली. मी धाडस करून त्यांना सर्व सांगितले.(mala padlele swapna marathi nibandh)

मी इथे कसा आलो आणि मला आता परत जाण्यासाठी मार्गच सापडत नाहीये हे सर्व मी त्यांना सांगितले. ते लोक खूप चांगले होते. त्यांनी मला त्यांच्या जवळच असलेल्या त्यांच्या घरी घेऊन गेले व माझा चांगला पाहुणचार केला.

सर्व झाल्यावर त्यांनी मला घरी परतण्याचा मार्ग सांगितला. मी त्यांचा निरोप घेऊन परतीच्या मार्गाने निघालो.  माझी घरी यायची अजिबात इच्छा न्हवती परंतु अंधार झाल्यामुळे मला घरी परतावे लागले. तेवढ्यात आईने आवाज दिला व माझे स्वप्न तिथेच संपले.

तर मित्रांनो तुम्हाला “मला पडलेले स्वप्न निबंध मराठी हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ वरील निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

आजच्या मला पडलेले स्वप्न निबंध मराठी …. या लेखा मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button