मराठी असे आमुची मायबोली निबंध | Marathi ase Amchi Maayboli Nibandh

Marathi ase Amchi Maayboli Nibandh: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात मराठी असे आमुची मायबोली हा निबंध मराठीमध्ये पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

मराठी असे आमुची मायबोली निबंध | Marathi ase Amchi Maayboli Nibandh

 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

 

मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते. दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील काही भागात मराठी भाषा बोलली जाते. आपल्या भारत देशातील २२ अधिकृत भाषांपैकी  मराठीभाषा ही एक भाषा आहे.

👉कुष्ठरोग निर्मूलन निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

फिजी, मॉरिशस व इस्रायल या देशातही मराठी भाषा बोलली जाते. आपण लहानपापासून जी भाषा बोलतो ती भाषा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो.”मराठी असे आमुची मायबोली निबंध”

प्रत्येकाला आपली मातृभाषा प्रिय असते. आधुनिक काळात मराठीने अनेक जागतिक कीर्तीचे विचारवंत निर्माण केले. काळाप्रमाणे मराठी भाषेमध्येही अनेक बदल झाले आहेत.

आपल्या मायबोलीची थोरवी सामर्थ्य खूप मोठे आहे. मराठी, भाषा, साहित्य, संस्कृती यांत इतरांना देण्यासारख्या खुप गोष्टी आहेत. अनेक थोर कवींनी, संतांनी मराठीचा गौरव केला आहे.

फादर स्टीफन्स म्हणतो

पखिआंमध्ये कल्पतरू ।

भासांमध्ये मानु थोरू। मराठियेसी ।।

पक्ष्यांमध्ये मोराला आणि वृक्षांमध्ये कल्पतरूला जो मान आहे तोच सर्व भाषांमध्ये मराठीला आहे. असा मराठी भाषेचा केलेला गौरव अभिमान वाटणारा आहे.

भारतीय राज्यघटनेतील २२ अधिकृत भाषांच्या यादीत मराठी भाषेचा समावेश केला आहे.

मराठी असे आमुची मायबोली निबंध

आपल्या देशातील कवी, लेखक यांनी आपल्या लेखणीतून तसेच कवितांमधून मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले.

अनेकदा अडचणीच्या काळातही आपल्या मायबोलीचे तेज नष्ट होवू दिले नाही. मराठी ही एक प्राचीन आणि सुंदर भाषा आहे . मराठी भाषेचा गोडवा आपण जपला पाहिजे. आपल्या मराठी मातीत अनेक संत होऊन गेले संत रामदास ,संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम यांनी अनेक ग्रंथ, स्तोत्र, श्लोक मराठी भाषे मधूनच लिहिली.

👉कुष्ठरोग निर्मूलन निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मातीचे रक्षण केल्यामुळे मराठी भाषा सुद्धा सुरक्षित झाली. अनेक संतांनी ग्रंथांची रचना करून मराठीमध्ये भर घातली. संतांनी त्यांच्या साहित्यातून मराठी भाषेचा गौरव केला आहे.

संत एकनाथ महाराज यांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली व ग्रंथांची भर मराठी साहित्यात घातली. अनेक प्रसिद्ध कलाकार या मराठी मातीतच घडले. अनेक संतांनी त्यांच्या जीवनामध्ये मराठी भाषेचा उपयोग केला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला. मराठी भाषेचा गौरव करताना, संत ज्ञानेश्वर लिहितात की,

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

दुसऱ्या भाषा शिकत असताना आपल्या मराठी भाषेचे महत्वसुद्धा टिकून राहणे गरजेचे आहे. आपल्या देशात अनेक संतांनी, कवींनी भरपूर ज्ञान आपल्याला दिले आहे तेही आपण वाचले पाहिजे.

मुलांना आपल्या मराठी साहित्याची ओळख करून दिली पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. आपण आपल्या भाषेच्या समृध्दीसाठी झटले पाहिजे. मराठी भाषेचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

Marathi ase Amchi Maayboli Nibandh

मराठी भाषेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने कामे केले पाहिजे. २७ फेब्रुवारी हा दिवस कवी विष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, लेखक, नाटककार कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.

२७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी भाषा दिन ,मराठी राजभाषा दिन, गौरव दिन अशा अनेक नावाने साजरा केला जातो . आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. आपण मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे.

माझ्या मराठी मातीचा,

लावा ललाटास टिळा,

हिच्या संगाने जागल्या,

दरयाखोर्यांतील शिळा.

कवी कुसुमाग्रज यांच्या या ओळी मनामध्ये ठेवूया आणि आपल्या मराठी भाषेच्या विकासासाठी आपल्यापासून सुरवात करूया. आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे मराठी बोलण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. अशी ही मराठी मायबोली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.

तर मित्रांनो तुम्हाला मराठी असे आमुची मायबोली निबंध | Marathi ase Amchi Maayboli Nibandh” हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा.

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद

Leave a Comment

close button