matadan janjagruti nibandh in marathi:-नमस्कार मित्रांनो आज आपण मतदान जनजागृती निबंध मराठी या विषयावर निबंध मराठीमध्ये पाहणार आहोत.
आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
मतदान जनजागृती निबंध मराठी | matadan janjagruti nibandh in marathi
मतदान हा आपल्या सर्वांचा महत्वाचा हक्क आहे. आपल्याला मिळालेल्या या हक्काचा, अधिकाराचा आपण योग्य वापर करून प्रत्येकाने आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे.
आपल्या देशाने वयाची १८ वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क दिलेला आहे.
👉झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈
मतदान करणे का गरजेचे आहे ? आपण मतदान केल्याने आपल्या देशाची कशी प्रगती होऊ शकते? मतदान करण्याला प्राधान्य का दिले पाहिजे ? हे आपण समजून घेणे गरजेचे आहे
वयाची १८ वर्ष पूर्ण असणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या भारत देशात मतदान करण्यासाठी स्वतंत्र आहे. देशातील प्रत्येकाने मतदानाचे महत्व समजून घेऊन मतदान केले तर एक चांगला प्रतिनिधी आपल्या देशाला मिळू शकतो.
आपल्या देशातील लोकशाही आणखी भक्कम व यशस्वी करण्यासाठी आपल्याला मतदानाचे कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे.(मतदान जनजागृती निबंध मराठी)
आपल्या देशाचा विकास होण्यासाठी आपण मतदान केले पाहिजे. लोकशाही सुदृढ करण्यासाठी आपला सर्वांचा सहभाग असणे गरजेचे असते.
२५ जानेवारी १९५० या दिवशी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली म्हणून २५ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर
राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्येकाला मतदानाचे महत्व समजावे हा या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश असतो. सरकार बनण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य असते.
आपण जे मतदान करतो त्यावर आपल्या देशाचा सामाजिक विकास अवलंबून असतो.
मतदान जागृती निबंध मराठी | Matdan Jagruti Nibandh Marathi
सरकार बनण्यासाठी प्रत्येकाची भूमिका महत्वाची असते.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवमतदारांना निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
यादिवशी मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी देशभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. आपल्या देशाची लोकशाही आणखी बळकट करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
👉झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈
आपल्या देशाचा विकास करण्यासाठी मतदानाचे असाधारण महत्व आहे.
आपल्यासमोर असलेल्या शैक्षणिक, आरोग्यविषयक, प्रदूषण यासंबंधी समस्या दूर करण्यासाठी एक योग्य प्रतिनिधीची निवड करून देणे गरजेचे असते.
आपण आपल्या देशाच्या विकासासाठी आणि आपल्या पुढील पिढीला सुखसुविधा मिळण्यासाठी मतदान करून एक चांगला प्रतिनिधी निवडणून देणे गरजेचे आहे.
लोकशाही बळकट करण्याच्या हेतूने आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.
मतदान करण्यापूर्वी आपण काही गोष्टींची माहिती करून घेणे गरजेचे आहे. आपण मागील निवडणुकीत निवडून दिलेल्या प्रतिनिधीने लोकउपयोगी कामे केली आहेत का? वाहतुकीसाठी रस्ते व्यवस्थित आहेत का? अशा अनेक गोष्टींची माहिती आपण मिळवली पाहिजे.
मतदान जनजागृती निबंध मराठी
आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आपण आपले नाव मतदार यादीत आहे का याची खात्री करून घ्यावी. आपले नाव जर मतदार यादीत नसेल तर ते कसे करावे याची माहिती मिळवून नोंदणी करून घ्यावी.
मतदान करायला जात असताना आपण आपले ओळखपत्र व मतदार स्लिप जवळ ठेवावी. आपल्या देशाचा विकास तेव्हाच होईल ज्यावेळी आपण मतदान करून एक योग्य प्रतिनिधीची निवड करू.
देशाचे भवितव्य घडवण्यासाठी निवडणुकांमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग असणे महत्वाचे असते.
आपल्या देशाची लोकशाही बळकट व मतदानाची प्रक्रिया सोपी होण्यासाठी मतदार जागृती होणे होणे गरजेचे आहे. १८ वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या अधिकाराची माहिती मिळण्यासाठी मतदार जागृती करणे आवश्यक आहे.
विविध शैक्षणिक संस्था निबंध स्पर्धा, भाषणे रॅली काढून, घोषणा देऊन लोकांना मतदानाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात. मतदान जागृती खूप महत्वाची आहे.
मतदानाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शाळा, कॉलेज मध्ये मतदानाविषयी माहिती मिळण्यासाठी निबंधस्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, रॅली यांचे आयोगाने केले पाहिजे.
पुढील पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी मतदान करूया.
चला मतदान करूया…
Matadan janjagruti nibandh in marathi
तर मित्रांनो तुम्हाला “मतदान जनजागृती निबंध मराठी” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ matadan janjagruti nibandh in marathi निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.
आजच्या मतदान जनजागृती निबंध मराठी…. या लेखा मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
धन्यवाद