maza avadta mahina shravan marathi nibandh नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून माझा आवडता श्रावण महिना मराठी निबंध मराठी मधून पाहणार आहोत.

Maza avadta mahina shravan marathi nibandh
आपला भारत देश हा संस्कृतीप्रधान देश आहे. आपल्या देशात सणांना विशेष महत्व दिले जाते.
श्रावण महिना म्हणजे सणांची उधळणच.
आपण आवडीने प्रत्येक सण साजरा करून आपली संस्कृती जपत असतो. श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा.
आपण वर्षभरात भरपूर सण साजरे करतो परंतु श्रावण महिन्यात भरपूर सणांचे एकत्रित संगम आपल्याला पाहायला मिळते.
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी उन पडे
श्रावण महिन्याचे इतके सुंदर वर्णन बालकवींनी आपल्या कवितेमध्ये केले आहे.
मला जर कोणी विचारले तुमचा आवडता महिना कोणता?
तर मी वेळ न लावता उत्तर देईल, माझा आवडता महिना श्रावण
श्रावण महिना म्हणजे जणू सणांची भली मोठी रांगच….
श्रावण महिन्यात संपूर्ण वातावरण अगदी प्रसन्न, हिरवेगार व उत्साहदायी असते.”maza avadta mahina shravan marathi nibandh”
उन्हातील पाऊस आणि पाऊसातील ऊन पाहिले की मन भरून जाते. श्रावण महिन्यामध्ये निसर्ग हिरवागार होऊन जातो. कधी अचानक पाऊस पडतो तर कधी अचानक ऊन पडते.
श्रावण महिन्यात रिमझिम पडणाऱ्या पाऊसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो. आकाशातून बरसणाऱ्या सरींमध्ये भिजून जावे असे वाटते.
मोरही श्रावण महिन्यात आनंदाने पिसारा फुलवून नृत्य करतात.
श्रावणातील या पडणाऱ्या पाऊसामुळे झाडे फुले, पिके नाहून निघतात व त्यामुळे ते हिरवेगार टवटवीत दिसतात.
रंगबेरंगी इंद्रधनुष्य पाहून तर मन अगदी प्रसन्न होऊन जाते.
श्रावण महिना हा सणांनी भरभरून वाहत असतो. भाविक मोठ्या उत्साहात हे सर्व सण साजरे करत असतात.
श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी या सणादिवशी शेतकऱ्यांच्या पिकांची रक्षा करणाऱ्या नागदेवतांची पूजा करण्याची परंपरा आहे.
माझा आवडता श्रावण महिना मराठी निबंध
शेतकरी ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो तो बैलपोळा हा सण याच श्रावण महिन्यात साजरा केला जातो.
श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, सत्यनारायण पूजा, गोकुळाष्टमी असे अनेक सण मोठ्या आनंदात साजरे केले जातात.
असा हा श्रावण महिना आपल्याला खूप आनंद देऊन जातो. आपण या सणांमुळे निसर्गाच्या खूप जवळ जातो.
बैलपोळा या सणामुळे मुक्या प्राण्यांविषयी आपल्या मनात प्रेम आणि आपुलकी वाढते.‘maza avadta mahina shravan marathi nibandh’
भाऊ आणि बहिणीच्या नात्याची आठवण करून देणारा रक्षाबंधन हा सण असे अनेक सण याच महिन्यात आपण साजरे करतो.
श्रावण महिन्यातील रिमझिम पाऊस, हिरवागार निसर्ग, वेगवेगळे सण, इंद्रधनुष्य आणि आजूबाजूचे प्रसन्न वातावरण या सर्व गोष्टींमुळे मला श्रावण महिना खूप आवडतो.
मित्रांनो, आम्ही आशा करतो की maza avadta mahina shravan marathi nibandh हा निबंध तुम्हाला नक्की आवडला असेल.
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.