maza avadta sant nibandh in marathi नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून माझा आवडता संत निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.
भारत ही संतांची भूमी आहे. आपल्या देशाला संतांची पुरातन परंपरा लाभलेली आहे. संतांच्या पावनस्पर्शाने आपली भूमी पवित्र झाली आहे.
आपल्या देशात संतांना गुरू मानण्याची परंपरा आहे. संतांनी जनजागृतीचे महत्वाचे काम केले. संतांनी आपल्या ज्ञानातून व आपल्या शिकवणीतून एकताची भावना निर्माण केली व एकता का महत्वाची आहे याचे महत्वही सर्वाना समजावून सांगितले.
आपल्या देशातील महान संतांनी लोकांना सदाचाराची शिकवण दिली.
आम्ही या लेखातून विद्यार्थ्यांना सरावासाठी काही मुद्दे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही या ब्लॉगच्या मदतीने विद्यार्थ्यांना निबंध उपलब्ध करून देत आहोत.
आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

माझा आवडता संत निबंध मराठी
जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपले
तोची साधू ओळखावा ।। देव तेथे चि जाणावा.
संत एकनाथ, संत तुकाराम, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, संत गोरा कुंभार असे अनेक संत आपल्या देशात होऊन गेले.
आपल्याला मानवतेची शिकवण देणारे संत म्हणजे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज यांना माणुसकीची जाणीव होती.
आपल्याला संघर्षमय जीवणातून स्वतःजवळ असेलेले शब्दधन व्यक्त करणारे संत तुकाराम महाराज हे माझे आवडते संत आहेत.
संत तुकाराम महाराज यांचा जन्म इ.स. १६०८ मध्ये देहू या गावी झाला. त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासात वेगवेगळ्या नोंदी आढळतात.
संत तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील वारकरी संत होते.
त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा व आईचे नाव कनकाई असे होत. तुकाराम महाराज यांना एक मोठा भाऊ व एक धाकटा भाऊ होता. मोठ्या भावाचे नाव सावजी व धाकट्या भावाचे नाव कान्होबा होते.
संत तुकाराम महाराज यांचा घरी वारी करण्याची परंपरा होती. ‘Maza avadta sant nibandh in marathi’
सर्वकाही ठीक चालले असताना त्यांच्या कुटुंबावर एकामागे एक अडचणी येऊ लागल्या. अनेक प्रापंचिक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
जीवनप्रवाह बदलवून टाकणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत होत्या.
वयाच्या १७-१८ वर्षीच तुकाराम महाराज यांचे आईवडील निर्वतले. त्याकाळी प्रचंड दुष्काळ पडला होता. लोकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्यांचा मोठा भाऊ काही दिवसातच घरदार सोडून निघून गेला. पाठोपाठ दुष्काळी परिस्थितीमध्ये त्यांचा मुलगाही गेला.
maza avadta sant nibandh in marathi
खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत होत्या त्यामुळे ते उदास राहू लागले. भयंकर दुष्काळाचा सामना त्यांना करावा लागत होता.
भयंकर दुष्काळी परिस्थितीमुळे घराची व लोकांची झालेली अवस्था पाहून त्यांचे संसारातील लक्ष कमी झाले व मनात विरक्ती दाटून आली.
अशा परिस्थितीत मध्ये त्यांनी ईश्वराची भक्ती करण्याकडे मन वळवले. श्रीविठ्ठल यांच्यावर असलेली आपली भक्ती त्यांनी कायम ठेवली. गावाजवळ असलेल्या डोंगरावर जाऊन ते उपासना करू लागले.
अनेक ग्रंथांचे वाचन व त्यांचा अभ्यास करण्यास त्यांनी सुरवात केली.“माझा आवडता संत निबंध मराठी”
अनेक अभंगांची रचना करून त्यांनी ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग लोकांना दाखवला. सतराव्या शतकात सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ संत तुकाराम महाराज यांनी रोवली .
लहानपणापासूनच त्यांच्या कानावर कीर्तन, अभंग पडत होते. पुढे त्यांनी अनेक ग्रंथांचे वाचन केले. तुकाराम महाराजांना ईश्वरभक्तीचा मार्ग दिसला आणि त्यांचे जीवनच बदलून गेले.
संत तुकाराम महाराज हे निर्भीड संत होते. कीर्तने, प्रवचने करत असताना त्यांनी स्वतः अभंगांची रचना करण्यास सुरुवात केली. लोकांसमोर ते आपले आपले अभंग म्हणू लागले.
सर्वसामान्य लोकांनाही सहज उमजतील अशा रचना तुकाराम महाराजांनी केल्या.
संत तुकाराम महाराजांचे अभंग लोक खूप आवडीने ऐकत व विठ्ठलांचे नामस्मरण करत असत. विठ्ठलप्राप्तीसाठी त्यांनी विठ्ठलांच्या नामस्मरण करण्याचा मार्ग दाखवला.
माझा आवडता संत तुकाराम निबंध मराठी
त्यांचे अभंग सर्वजण आनंदाने ऐकू लागले. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. काही लोकांनी तुकाराम महाराजांना त्रास देण्यास सुरुवात केली.
काही लोकांनी त्यांचा छळ केला परंतु त्या गोष्टी सहन करत त्यांनी त्याचे कार्य न थांबवता अविरतपणे तसेच सुरू ठेवले.(maza avadta sant tukaram marathi nibandh)
समाजातील अनेक लोकांनी त्यांच्या कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्या सर्व अडचणींवर मात करत ते आपले कार्य करत राहिले.
संसार करत असताना येणाऱ्या अडचणींवर मात करत त्यात गुंतून न राहता लोकहीत कसे साधावे याचे ज्ञान त्यांनी सर्वांना दिले.
गरीब लोकांविषयी त्यांना खूप कळवळा होता. सर्वांनी आनंदी राहावे असेच त्यांना नेहमी वाटत असे.
तुकाराम महाराजांनी अनेक गोष्टींचा त्याग केला व आपले संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी अर्पण केले. त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
संत तुकाराम महाराजांनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी पाच हजार अभंग लिहिले.
समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचे कार्य संत तुकाराम महाराज यांनी आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून केले.
maza avadta sant tukaram marathi nibandh
तुकाराम महाराज यांनी वयक्तिक सुखांकडे लक्ष न देता लोककल्याणासाठी आपले जीवन वाहून दिले.
समाजातील चुकीच्या पंरपरा, प्रथा यांवर त्यांनी टीका केली. त्यांनी कीर्तनातून जनजागृती केली.
संत तुकाराम महाराज यांचे कार्य व कीर्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यंत पोहचली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी काही वस्तू तुकाराम महाराज यांच्यासाठी पाठवल्या होत्या परंतु त्यांनी त्या वस्तूंचा स्वीकार केला नाही.
त्यांना कोणत्याही गोष्टीचा लोभ न्हवता. त्यांनी त्यांचे सर्व आयुष्य लोकहितासाठी वाहून दिले होते. संत तुकाराम महाराज यांचे अभंग आजही उपकारक ठरतात.
संत तुकाराम महाराजांना “जगदगुरू” असे संबोधले जाते.
वारकरी संप्रदायाचा पाया संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. त्याचे कळस होण्याचा मान संत तुकाराम महाराजांना मिळाला.
तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले.
असे मानले जाते की लोकहिताचे कार्य करीत असताना
फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम अनंतात विलीन झाले आणि ते वैकुंठाला गेले.
तर मित्रांनो तुम्हाला “maza avadta sant nibandh in marathi” ( माझा आवडता संत निबंध मराठी )हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल- sankpal7729@gmail.com
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
हे निबंध सुद्धा जरूर वाचा –