माझे बाबा मराठी निबंध | maze baba nibandh in marathi

maze baba nibandh in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण माझे बाबा या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

आईवडील प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी आईवडील दिवसरात्र कष्ट करता असतात.

कितीही अडचणी आल्या तरीही आपले आईवडील आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाहीत.

आपण या निबंधामधून वडील कुटुंबासाठी किती कष्ट करतात, मुलांवर असलेले प्रेम, मुलांच्या शिक्षणासाठी आईवडील किती कष्ट करतात या गोष्टींचा विचार करणार आहोत.

चला तर मग निबंधाला सुरवात करूया,

maze baba nibabdh in marathi
             maze baba nibabdh in marathi

माझे बाबा मराठी निबंध

 

माझे आई वडील मला दोघेही आवडतात. आईबद्दल किती सांगितले तरीही ते कमीच. माझ्या आईसारखेच माझे बाबा सुद्धा माझी खूप काळजी घेतात.

मला आतापर्यंत ज्यांच्याकडून काही शिकायला मिळाले मी त्यांना माझे गुरू समजतो.

माझे बाबा माझे गुरू आहेत.”maze baba nibabdh in marathi”

माझ्या वडिलांचे नाव यशवंत आहे. मला बाबांना पप्पा म्हणायला खूप आवडते.

माझ्या आईप्रमाणेच माझे बाबासुद्धा मला खूप प्रिय आहेत.

मी माझ्या बाबांना पप्पा म्हणून बोलावतो. माझ्या वडिलांनी त्यांचे शिक्षण ……या गावी पूर्ण केले. माझे वडील मला शिक्षणाचे महत्व नेहमी सांगतात.

माझे बाबा मला ते शाळा शिकत असताना त्यांना आलेल्या अडचणी नेहमी सांगत असतात.

घरची परिस्थिती नाजूक असतानाही त्यांनी बी कॉम पर्यंतचे शिक्षण घेतले.

माझे बाबा अभ्यासातही मला नेहमी मदत करतात. मला अभ्यास करताना काही अडचण आली तर ते नेहमी मला मदत करतात. बाबांचे मराठी, इंग्रजी लेखन तर माझ्यापेक्षाही खूप छान आहे.

माझ्या वडिलांचा स्वभाव शांत आहे. मी लहान असताना मला नेहमी वाटायचे की त्यांचा स्वभाव कडक आहे. पण जेव्हा मला थोडे समजू लागले तेव्हा समजले की आपले वडील हे बाहेरून कितीही कडक आले तरीही ते आतून प्रेमळ आहेत.

हा निबंध सुद्धा जरूर वाचा – माझी आई मराठी निबंध

बाबांच्या मार्गदर्शनामुळे मी वाईट सवयीपासून नेहमी दूर राहिलो.

माझे बाबा खूप प्रेमळ, कष्टाळू आहेत. वडीलांना आधीपासून व्यवसायाची खूप आवड होती.

माझे बाबा व्यवसाय करून घरातल्या आम्हा सर्वांना नेहमी आनंदी ठेवतात. बाबा कधीही आम्हाला काही कमी पडू देत नाहीत.

Majhe baba nibandh in marathi

प्रामाणिकपणा काय असतो हे मला माझ्या बाबांकडूनच शिकायला मिळाले.

समाजात वावरत असताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात हे बाबांकडून मला खूप कमी वयात शिकायला मिळाले.

मी माझ्या मनातील सर्व गोष्टी जशा आईला सांगतो तसेच मी माझ्या बाबांनासुद्धा सांगतो.‘माझे बाबा मराठी निबंध’

माझे जिथे चुकते तिथे बाबा रागावतात व मार्गदर्शन सुद्धा करतात.

मी जेव्हा खेळात विजयी होऊन येतो तेव्हा बाबा पाठीवर शाबासकीची थाप द्यायला कधीच विसरत नाहीत.

मी लहानपणापासून पाहत आलो आहे.  माझे बाबा घरासाठी दिवसभर राबतात.

maze baba nibandh in marathi
            maze baba nibandh in marathi

My father eassy in marathi

बाबा स्वतःला कधीच नवनवीन कपडे , चप्पल या गोष्टी खूप कमी प्रमाणात घेत असतात परंतु मला कधीही काही कमी पडू दिले नाही.

दिवाळीत तर बाबा स्वतःला काही घेत नसत पण मला भरपूर फटाके, नवनवीन कपडे घेऊ येतात.

कितीही अडचणी संकटे अली तरीही बाबा त्या संकटांची झळ आमच्यापर्यंत पोहचू देत नाहीत.

एवढे कष्ट मेहनत करण्यामागे बाबांची एकच इच्छा ती म्हणजे मला चांगले जीवन मिळावे. त्यांना जी मेहनत करावी लागतीये ती मलाही करावी लागू नये.

माझे बाबा मला कारण नसताना मला कधीही रागावले नाही. मला रागावण्यामागेही कारण असायचे.

मी चांगले शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी नोकरीला लागावे असे त्यांना नेहमी वाटते.

मी आज जे काही आहे ते माझ्या आईवडिलांनमुळे. बाबांच्या अपार कष्टातुन मी शिक्षण घेऊन या स्पर्धात्मक जगात माझे अस्तित्व टिकवू शकलो.“majhe baba nibandh in marathi”

मला माझ्या वडिलांचा नेहमी अभिमान वाटतो. आयुष्यात एवढ्या अडचणी येऊनही बाबा कधीही डगमगले नाहीत.

आता बाबांची तब्बेत थोडी नाजूक असते. कष्ट करायची सवय असल्यामुळे ते घरी शांत बसत नाही. जमेल तसे ते व्यवसाय करतात व आजही घराला बाबांचा आधार असतो.

असे प्रेमळ, मेहनती आहेत माझे बाबा, मला त्यांच्यासाठी खूप काही करायचे आहेत.

आपले आई वडील हे आपल्या घराची शोभा आहेत. आईवडिलांची काळजी घेणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे काम आहे.

मी देवाला रोज प्रार्थना करतो की माझ्या बाबांना नेहमी आनंदी ठेव निरोगी ठेव.

तर मित्रांना तुम्हाला “maze baba nibandh in marathi” (माझे बाबा)हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ माझे बाबा या निबंधाबद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

2 thoughts on “माझे बाबा मराठी निबंध | maze baba nibandh in marathi”

Leave a Comment

close button