maze samvidhan maza abhiman nibandh marathi : नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात माझे संविधान माझा अभिमान या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.
आम्ही या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
माझे संविधान माझा अभिमान निबंध मराठी |
maze samvidhan maza abhiman nibandh marathi
देशाची प्रगती होण्यासाठी संविधान असणे गरजेचे असते. देशाच्या प्रगतीसाठी संविधान हे महत्वपूर्ण आहे. आपल्या भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ दिवशी स्वातंत्र मिळाले. आपला देश गुलामगिरीतून मुक्त झाला होता परंतु आपल्या देशाला आपले स्वतःचे संविधान न्हवते.
आपले संविधान नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत.
👉मी मोबाईल बोलतोय हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
आपल्या भारत देशाचे संविधान निर्माण करण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महत्वाची भूमिका होती. सर्वांना एकता, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांच्या तत्वांवर जोडणारे असे आपले भारतीय संविधान आहे.
संविधान निर्माण करण्यासाठी २९ ऑगस्ट १९४७ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली.
देशाच्या बांधणीसाठी संविधान खुप महत्वाचे असते. खूप मेहनतीनंतर आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी संविधान समितीला २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला.
संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. या पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २११ सदस्य उपस्थित होते.
सर्व सदस्यांच्या सहमतीने डॉ. राजेंद्रप्रसाद यांची अध्यक्षस्थानी तर आशुतोष मुखर्जी यांची ११ डिसेंबर रोजी उपाध्यक्ष स्थानी निवड करण्यात आली. आपल्या देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर अल्पकाळ या समितीने काम केले.
मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणुन मोठ्या आनंदात आणि उस्ताहात साजरा केला जातो.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.माझे संविधान माझा अभिमान निबंध मराठी
भारतीय संविधान मराठी निबंध | Samvidhan Nibandh Marathi
विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण सुसंस्कृत नागरीक होण्यासाठी संविधानामधील मूलतत्वांचा अंगिकार करुन त्याद्वारे आपल्या देशाच्या संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता तसेच संविधानाविषयी जागृती होण्यासाठी २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर,२०२१ या कालावधीमध्ये भारतीय संविधान दिनाच्या निमत्ताने माझे संविधान माझा अभिमान हा उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात येत आहे.
माझे संविधान माझा अभिमान यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यासाठी वेगवेगळे शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जावेत.
👉मी मोबाईल बोलतोय हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
शालेय स्तरावर या कालावधीमध्ये निबंध लेखन, काव्य लेखन, चित्रकला व वकृत्व स्पर्धा, घोषवाक्य अशा वेगवेगळया उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरूपात आयोजन करण्यात यावे.
भारतीय राज्यघटनेतील मूलतत्त्वांची व्याप्ती आणि सर्वसमावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.(maze samvidhan maza abhiman nibandh marathi)
घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे
देशाच्या विकास तसेच अनेक गोष्टींचा याच्याशी संबधित विचार संविधान निर्माण करताना केलेला आहे. भारतीय संविधानातील तत्वे, कर्तव्य, अधिकार हे आपल्या सर्वांसाठीच महत्वपूर्ण आहेत.
माझे संविधान माझा अभिमान निबंध मराठी
भारतीय संविधानाबाबत जनजागृती, माहिती होण्यासाठी व संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करण्यासाठी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो खुप आनंदात साजरा केला जातो.
आपल्या देशाची प्रगती विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या देशाचा संविधानाबद्दल माहिती होणे गरजेचे आहे.
आपला देश समृद्ध आणि विकसित करण्यासाठी संविधान खूप महत्वाचे आहे त्यासाठी शालेय जीवनापासूनच संविधानाचा परिचय होणे आवश्यक आहे.
आपल्या देशाच्या प्रगतीसाठी लहान मुलांना आपल्या संविधनाबद्दल अवगत करून दिले पाहिजे. आपल्या संविधानामधील नियमांचे आपण पालन केले तर आपला देश नवीन उंची गाठेल.
तर मित्रांनो तुम्हाला माझे संविधान माझा अभिमान हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ bhartiya samvidhan nibandh mahiti in marathi या संबंधित काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा.
वरील भारतीय संविधान दिवस या निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
धन्यवाद