माझी अविस्मरणीय सहल निबंध मराठी | mazi sahal nibandh essay in marathi

mazi sahal nibandh essay in marathi  नमस्कार मित्रांनो आज आपण माझी अविस्मरणीय सहल या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत.

शालेय जीवनामध्ये प्रत्येकाला ओढ असते ती सहलीची. सहल म्हणजे शाळेतील मुलांसाठी आनंदाचा दिवस असतो.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करूया,

माझी अविस्मरणीय सहल निबंध मराठी

 

माझ्याप्रमाणेच प्रत्येक विध्यार्थी आतुरतेने वाट पाहत होता तो सहलीची.

मागच्या वर्षीची सहल अजूनही डोळ्यांसमोर आहे. शालेय सहलीचा आनंदच खूप मोठा असतो.

मागच्या वर्षी प्रमाणेच या वर्षीही शैक्षणिक सहलीचे नियोजन करण्यात आले. सरांनी सहलीच्या १० दिवस आधीच सहल आयोजित केल्याचे सांगितले. सर्व मुलांना खूप आनंद झाला.

दुसऱ्या दिवशी वर्गात प्रवेश करताच कानावर सहल या विषयावर चालू असलेल्या गप्पा ऐकू येऊ लागल्या. सर्वजण एकमेकांना सहलीबद्दल सांगू लागले होते.

दरवर्षी सहल नैसर्गिक ठिकाणी, मंदिरे, उद्याने अशा ठिकाणी काढली जात असे परंतु या वर्षी सहलीसाठी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक ठिकाणी घेऊन जाण्याचे आमच्या प्रधापकांनी ठरवले होते.

मुलांना आपल्या इतिहासाबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळावी या उद्देशाने आमच्या प्राध्यापकांनी सहलीसाठी ऐतिहासिक स्थानाची निवड केली होती.

ऐतिहासिक ठिकाण ऐकून आमच्या मनामध्ये खूप विचार सुरू झाले तेवढ्यात सरांनी सहलीचे ठिकाण सांगितले, यंदाच्या सहलीला आपण किल्ले सिंहगड ला भेट देणार आहोत.

aamchi avismarniya sahal marathi nibandh
aamchi avismarniya sahal marathi nibandh

सहलीच्या आधल्या दिवशी मी सर्व तयारी करून घेतली. आईनेही मला मदत केली.

उद्याचा दिवस कधी उजडतोय आणि मी किल्ले सिंहगड ला भेट देतोय असे झाले होते.“mazi sahal nibandh eassy in marathi”

सहलीचा दिवस उजाडला. सरांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी सहा वाजता आम्ही सर्व मुले शाळेच्या मैदानात पालकांसोबत एकत्रित जमा झालो. सहलीला जाण्यासाठी दोन मोठ्या बसचे नियोजन केले होते.

aamchi avismarniya sahal nibandh marathi

सरांनी काही नियम सांगितले. कोणत्या गोष्टीचे पालन केले पाहिजे हेही सरांनी खूप समजावून सांगितले. निघण्या अगोदर सरांनी हजेरी घेतली.

सकाळी साडे सहा च्या आसपास आमच्या बसने किल्ले सिंहगडच्या दिशेने प्रवास सुरु केला. थोड्या अंतरावर बस एका हॉटेल जवळ १० मिनिटांसाठी थांबवण्यात आली.

आम्ही सर्वांनी खाऊ घेतला आणि गाण्याच्या भेंड्या खेळत खेळत आमचा प्रवास सुरु झाला. खिडकीतून बाहेर बघण्याचा आनंद मी अनुभवत होतो. कधीही न पाहिलेला परिसर माझ्या डोळ्यात साठवत मी सहलीचा आनंद घेत होतो.

खूप वेळच्या प्रवसांनंतर आम्ही किल्ले सिंहगडाच्या पायथ्याशी आलो. बसमधून बाहेर उतरून किल्ले सिंहगडचे रूप पाहू लागलो.“amchi avismarniya sahal nibandh marathi 12th”

आईने मला लहानपणी खूप पराक्रमी योध्यांच्या कथा सांगितल्या होत्या. शाळेत सरांनी खूप वेळा तानाजी मालुसरे यांच्या धाडसाबद्दल, पराक्रमाबद्दल सांगितले होते. आज या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या.

बस मधून उतरल्यावर आम्हा सर्व विद्यार्थ्यांना सरांनी शिस्तीचे पालन करण्यास सांगितले आणि किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती दिली.

सर्वात पहिल्यांदा आम्ही सर्वांनी मिळून काही घोषणा केल्या त्यामुळे सर्वांमध्ये उस्ताह आणि ऊर्जा निर्माण झाली. आम्ही सकाळी १० च्या आसपास गडभ्रमंती करण्यास सुरुवात केली. आमच्यासोबत आमचे सर होते. मनामध्ये उत्सुकता होती.

गडभ्रमंती करत असताना आमचे सर आम्हाला किल्ल्याचा इतिहास सांगत होते. सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा होते.

सरांनी आम्हाला किल्ल्याचे उंची सांगितले.

सिंहगड किल्ला समुद्रसपाटीपासून ४४०० फूट एवढा उंच आहे. आम्ही किल्ल्याच्या पुणे दरवाजातून प्रवेश केला. किल्ल्याचे प्रवेशद्वार अतिशय भक्कम होते.

त्यांनतर सरांनी आम्हाला दारुगोळा कोठार, टिळक बांगला, कोंढाणेश्वर मंदिर, देवटाके, छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी, सुभेदार तानाजींचे स्मारक ही सर्व ठिकाणे अगदी व्यवस्थितपणे दाखवली आणि त्याबद्दल माहितीसुद्धा सांगितली.

दुपारची वेळ झाली होती. आम्ही सर्वांनी घरून येताना जेवण आणले होते.

जेवण करण्यापूर्वी सरांनी सांगितले की ऐतिहासिक ठिकाणी कचरा करू नये. सरांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही सर्वांनी वर्तन केले.

आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी

एका झाडाच्या सावलीत आम्ही सर्वजण जेवायला बसलो. एकत्रितपणे जेवणाचा आनंद घेत जेवण पूर्ण झाले.
जेवण झाल्यानंतर आम्ही विनोद, गोष्टी, गाण्यांच्या भेंड्या, बौद्धिक खेळ या सर्व गोष्टी झाल्या.

आता ओढ होती ती एकाच गोष्टीची, ती म्हणजे पराक्रमी तानाजींनी सर केलेला अवघड कडा पाहण्याची.

आमचे सर आम्हाला तो कडा पाहण्यासाठी घेऊन गेले. सरांनी काळजीच्या उद्देशाने हा कडा आम्हाला लांबूनच दाखवला.‘आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी १२वी’

तानाजी मालुसरे यांनी सर केलेला तो अवघड कडा पाहून मी थोडा वेळ थक्कच झालो.

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आम्ही भेट दिलेल्या ठिकाणाची स्वछता करण्यास सुरुवात केली. जेवढे होईल तेवढी आम्ही स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला.

किल्ला पाहत असताना सरांनी आम्हाला इतिहासातील खूप गोष्टी सांगितल्या.

प्राचीन वास्तू आपल्या देशाची सुंदरता वाढवतात त्यांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे या गोष्टी सरांनी आम्हाला सांगितल्या.

mazi sahal nibandh eassy in marathi

भरपूर उशीर झाला होता म्हणून सर आम्हाला बसकडे घेऊन गेले .

सर्व मुले बसमध्ये आले आहेत का हे सरांनी तपासून घेतले. सायंकाळी ६.३०च्या आसपास आम्ही घरी निघण्यासाठी निघालो.

खूप साऱ्या गोष्टी पहायच्या राहून गेल्या.

सर्व गोष्टी मनामध्ये साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि काही तासांच्या प्रवसानंतर आमची बस शाळेच्या मैदानात पोहचली.

सर्वांचे आईवडील काळजीने वाट पाहत उभे होते.

सरांनी पुन्हा एकदा हजेरी घेतली व मग आम्ही घरी गेलो.
अशी आमची सहल खूप आनंदमय वातावरण पार पडली.

सहलीमध्ये आम्ही खूप मज्जा केली खूप साऱ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या म्हणून ही सहल माझ्यासाठी अविस्मरणीय सहल होती.

माझी सहल या निबंधाचे शीर्षक खालीलप्रमाणे सुद्धा असू शकतात,

१.आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी

२.आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी १२वी

३.आमची शालेय सहल निबंध

४.मी केलेली सहल निबंध मराठी

५.आमची सहल निबंध मराठी

६.आमची शैक्षणिक सहल निबंध मराठी

तर मित्रांना तुम्हाला “mazi sahal nibandh essay in marathiहा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ मराठी माझी अविस्मरणीय सहल या निबंधाबद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment

close button