मी सैनिक बोलतोय निबंध मराठी | Me sainik boltoy nibandh marathi | Sainikachi atmakatha nibandh in marathi | सैनिकाचे मनोगत

me sainik boltoy nibandh marathi नमस्कार मित्रांनो आज आपण मी सैनिक बोलतोय निबंध मराठी या विषयावर निबंध पाहणार आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

मी सैनिक बोलतोय निबंध मराठी | Me sainik boltoy nibandh marathi 

 

हो मी एक सैनिक बोलतोय. माझे नाव किरण आहे. लहानपणी प्रत्येकाला मोठे झाल्यावर काही ना काही बनून देशाची सेवा करायची असते.

आपल्या कार्यातून देशाच्या विकासासाठी हातभार लावायचा असतो. प्रत्येकाची स्वप्ने ही वेगळी असतात. कोणाला डॉक्टर बनायचे असते तर कोणाला शास्त्रज्ञ, कोणाला इंजिनिअर बनायचे असते तर कोणाला सैनिक.

👉पावसाळा निबंध १० ओळी येथे क्लिक करा👈

प्रत्येकजण आपली स्वप्न मनात ठेवून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत असतो. मलाही लहानपणापासून देशासाठी काहीतरी करायचे होते. ‘मी सैनिक बोलतोय निबंध मराठी’

शालेय जीवनापासून मला ही आवड निर्माण झाली. शाळेमध्ये असताना २६ जानेवारी व १५ ऑगस्ट या कार्यक्रमांना आमच्या गावातील सैनिक आम्हाला मार्गदर्शन करायचे.

सैनिकांनी त्यांच्या जीवनामध्ये घेतलेले कष्ट मेहनत व त्यांचे देशप्रेम पाहून मलाही त्यांच्यासारखे बनायचे होते. मलाही मोठे होऊन सैनिक बनायचे आहे हे ध्येय मनामध्ये ठरवले.

आमच्या गावातील गावकरी व आई वडील मला नेहमी माझ्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मदत करत असत. घरची परिस्थिती नाजूक होती.

आई वडिलांनी अशा नाजूक परिस्थितीमध्येही मला कधीच काही कमी पडू दिले नाही. आईवडिलांचे ते कष्ट माझ्या डोळ्यांसमोर नेहमी असायचे.

मला एक गोष्ट समजली होती, जर आपल्याला सैनिक बनायचे असेल तर खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल. शालेय जीवनातच मी सैनिक होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत याची माहिती मिळवली व सरावाला सुरुवात केली. शाळेचा अभ्यास करत करत मी अनेक मैदानी खेळही खेळू लागलो.

एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Sainikachi atmakatha nibandh marathi

मला लहानपणापासून धावण्याची अतिशय आवड होती. मला या धावण्याचा भरपूर उपयोग माझ्या पुढील जीवनामध्ये झाला.

मी खेडेगावात राहत असल्यामुळे आजूबाजूचे डोंगर, नद्या, झाडेझुडपे यांच्या मदतीने मी धावणे, उंच ठिकाणावर चढाई करणे, पोहणे अशा अनेक गोष्टी शिकून घेतल्या.

👉पावसाळा निबंध १० ओळी येथे क्लिक करा👈

परिस्थिती नाजूक असतानाही मला वडिलांनी गावाजवळील आर्मी ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रवेश मिळवून दिला. एका बाजूला मी शाळेचा अभ्यास करत होतो व दुसऱ्या बाजूला सैनिकाचे शिक्षण घेत होतो.“मी सैनिक बोलतोय निबंध मराठी”

ट्रेनिंग सेंटर मध्ये सरांनी मला पूर्णपणे सर्व गोष्टींची माहिती दिली. भरपूर गोष्टींची तयारी करून घेतली.

आपण घेत असलेल्या प्रयत्नांना कधी ना कधी यश हे मिळतेच. मी परीक्षांचा, मैदानातील परीक्षांचा सराव केला. कठीण परिश्रमानंतर मी सैन्यात भरती झालो.

मी सैन्यात भरती झालोय ही खबर आईवडिलांनी ऐकताच त्यांना खूप आनंद झाला होता. माझ्या प्रयत्नांना यश मिळाले होते आणि मलाही खूप आनंद झाला होता.

थोडाच दिवसात मला प्रशिक्षणासाठी जावे लागले. घरच्यांचा निरोप घेऊन मी माझ्या कार्यासाठी निघालो. सैन्यात भरती झाल्यानंतर माझे प्रशिक्षण सुरू झाले.

मला प्रशिक्षण घेताना खूप साऱ्या नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. मी पाहिलेल्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल सुरूच होती. जेव्हा मी प्रशिक्षण घेत होतो तेव्हा मला खूप सारे नवीन मित्रही भेटले.

प्रत्येकाकडून त्यांचे अनुभव ऐकायला मिळायचे व मी त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत होतो. प्रशिक्षणा  दरम्यान मी सर्व नियमांचे पालन केले. मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली होती व मला माझे काम करताना खूप आनंद होत होता.

घरापासून लांब आम्ही सैनिक एकमेकांना साथ देत देशसेवा करत होतो. एखादा सैनिक शहीद झाले आहे असे समजले तर कोणी जवळची व्यक्ती सोडून गेली असे वाटायचे.

सीमेवर देशाची सेवा करत असताना घरचीही खूप आठवण येत असते. आईवडिलांची तब्बेत ठीक असेल ना? ते काळजी घेत असतील ना असे अनेक प्रश्न मनामध्ये येत असतात.

मनामध्ये कुटुंबाचा कितीही विचार आला किंवा आठवण आली तरीही मी माझे कर्तव्य करत राहिलो. अहोरात्र जागून मी सीमेची राखण करत राहिलो.

मी सैनिक बोलतोय निबंध मराठी

मला माझ्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागला. सैनिकांचे जीवन सोपे नसते. त्या त्या परिस्थितीत त्या परिस्थितीला अनुसरून वागावे लागते.

कधी कडक उन्ह सहन करावे लागते तर कधी कडकडीत थंडीचा अनुभव घ्यावा लागतो. माझ्या या कार्यामुळे माझ्या देशातील नागरिक अतिशय आनंदी व सुखरूप आहेत हा विचार करून मला नेहमी आनंद मिळतो. सैनिकांचे जीवन हे खूप कठीण असते. आम्हाला नेहमी देशाच्या सेवेसाठी तत्पर राहावे लागते.(me sainik boltoy atmakatha in marathi)

मला व माझ्या साथीदारांना एका गोष्टीचा नेहमी आनंद होत असतो की आपल्यामुळे लोक सुरक्षित आहेत आणि हीच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

तर मित्रांनो तुम्हाला मी सैनिक बोलतोय निबंध मराठी | Me sainik boltoy nibandh marathi  हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ मी सैनिक बोलतोय निबंध मराठी निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

आजच्या या लेखा मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button