Mhatma Gandhi Marathi Nibandh Mahiti: नमस्कार मित्रांनो आज या लेखात महात्मा गांधी निबंध मराठी 1000 शब्द या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.
या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.
महात्मा गांधी निबंध मराठी 1000 शब्द | Mhatma Gandhi Marathi Nibandh Mahiti
आपल्या देशातील अनेकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान व्यक्तींपैकी एक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे एक महान पुरुष होते. महात्मा गांधींना राष्ट्रपिता तसेच बापू म्हणूनही ओळखले जाते.
महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८७९ गुजरात मध्ये असलेल्या पोरबंदर या शहरांमध्ये झाला. महात्मा गांधीजी यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा संपूर्ण देशभरात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो तर संपूर्ण जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (International Day of Non Voilence) म्हणून साजरा केला जातो.
गांधीजींनी भारत देशाला गुलामीतील मुक्त करण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते. गांधीजींनी नेहमीच अहिंसेचा मार्ग अवलंबला, लोकांनी अहिंसेचा मार्ग अवलंबावा अशी त्यांची अपेक्षा होती.
सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा उपयोग करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली.
👉माझे गाव मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
महात्मा गांधी यांना लोक प्रेमाने बापू असे म्हणत असत. सुभाषचंद्र बोस यांनी सन १९४४ मध्ये महात्मा गांधी यांना पहिल्यांदा राष्ट्रपिता असे संबोधले होते. ते एक समाजसुधारकही होते. त्यांनी जगभरातील अनेक महान नेत्यांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी हिंसा न करता लढण्यासाठी प्रभावित केले.
महात्मा गांधी निबंध मराठी 1000 शब्द
संपूर्ण जग त्यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखते. ते नेहमी पारंपरिक भारतीय पोशाख धोती आणि कापसापासून बनवलेली शाल घालायचे.
ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्यासाठी यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी अहिंसक प्रतिकाराचा वापर केला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.Mhatma Gandhi Marathi Nibandh Mahiti
देशावर स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महापुरुषांनी खूप मेहनत घेतली त्यांच्यापैकी एक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. महात्मा गांधीजी हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रमुख नेते होते. महात्मा गांधी यांच्या वडिलांचे नाव करमचंद होते तर आईचे नाव पुतळीबाई असे होते. त्यांच्या आजोबांचे नाव हे उत्तमचंद गांधी होते.
महात्मा गांधी यांच्यावर बालपणीच त्यांच्या आईने चांगले संस्कार लावले होते. त्यांचे वडील तत्कालीन काठेवाड प्रांतामधील पोरबंदर येथे दिवाण होते. ते पंधरा वर्षांच्या असताना इ. स. १८८५ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
महात्मा गांधी यांच्या वयाच्या १३ व्या वर्षी कस्तूरबा माखनजी कपाडिया यांच्याशी विवाह झाला. त्यांना “बा” असेही म्हटले जात असे. काही वर्षांनी मोहनदास आणि कस्तुरबा यांना चार मुले झाली. महात्मा गांधींच्या मुलांची नावे हरीलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास होती.
त्यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षणालाही खूप महत्त्व दिले. गांधीजींनी आयुष्यभर सामाजिक सुधारणेला प्रोत्साहन दिले आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Mhatma Gandhi Marathi Nibandh Mahiti
महात्मा गांधींच्या शिक्षणाने त्यांना जगातील महान व्यक्तींपैकी एक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते कठोर मेहनती होते शालेय शिक्षण पूर्ण करून ते इ. स. १८८८ मध्ये वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले शिक्षण घेत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या.
गांधीजींनी त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे दक्षिण आफ्रिकेत कायद्याचा अभ्यास केला. त्यांच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या ज्यातून त्यांना खूप काही शिकायला मिळाले.
गांधी जानेवारी १९१५ मध्ये आपल्या लोकांची सेवा करण्याच्या आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या महत्त्वाकांक्षेने भारतात परतले. गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अहिंसा आणि सत्याग्रह ही आपली प्रमुख शस्त्रे बनवली. भारतीय स्वातंत्र्यासाठी गांधीजींचे सर्वात मोठे योगदान आहे.
👉माझे गाव मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
आपल्या देशाला ही स्वतंत्र्य मिळावे ही महत्त्वकांक्षा घेऊन गांधीजी आपल्या देशात परतले होते. ९ ऑगस्ट १९४२ मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलन केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटांचा सहसाने सामना केला.
सुरुवातीच्या काळात महात्मा गांधीजींनी देशभरातील विविध भागात जाऊन अनेक गोष्टींची माहिती मिळवली. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत राहिले.
हे सर्व सहज शक्य नव्हते त्यांच्यासमोर अनेक आव्हाने उभे होती. सर्वजण एकत्रित आले तरच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल त्यासाठी गांधीजींनी सर्वांना एकोप्याचे महत्त्व सांगितले व देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वांना एकत्रित आणले.
महात्मा गांधींनी चंपारण चळवळ, खेडा चळवळ, खिलाफत चळवळ, नमक चळवळ आणि भारत छोडो आंदोलन यासह अनेक चळवळी केल्या. या आंदोलनांनी भारतातील ब्रिटीश साम्राज्याचा पाया हादरला आणि आपल्या देशातील लोकांना स्वातंत्र्य चळवळीत एकत्र केले.(महात्मा गांधी निबंध मराठी 1000 शब्द)
सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांचे पालन करून गांधीजींनी भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाला म्हणून त्यांनी अहिंसा व सत्याचा उपयोग केला. ३० जानेवारी १९४८ या दिवशी महात्मा गांधीजींचे निधन झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाची सेवा करण्यासाठी घालवले.
महात्मा गांधी निबंध मराठी 1000 शब्द
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींनी मोलाचे कार्य पार पाडले. महात्मा गांधी जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळांमध्ये भाषण स्पर्धा निबंध स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केले जातात.
राष्ट्रीय सण म्हणून गांधी जयंती देशभरात उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केलेच परंतु त्यासोबत स्वच्छतेलाही तेवढेच महत्त्व दिले.
महात्मा गांधीजी स्वच्छतेवर जास्त भर देत असत. आज स्वच्छ भारताची मोहीम महात्मा गांधींच्या नावाने चालवली जात आहे कारण ते खूप स्वच्छता प्रेमी होते आणि स्वच्छ्ता ठेवत असत.
आयुष्यात स्वच्छता का गरजेचे आहे हे वारंवार सांगत असत. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महात्मा गांधी जयंती निमित्ताने २ ऑक्टोंबर २०१४ साली स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.
महत्त्वाचे
- असहकार चळवळ
- खिलाफत चळवळ
- चंपारण्य सत्याग्रह
- खेडा सत्याग्रह अहमदाबाद येथील कामगार लढा
- सविनय कायदेभंग चळवळ
- भारत छोडो आंदोलन
- दांडी यात्रा व मीठ सत्याग्रह
अशा या महान स्वातंत्र्यता सैनिकाला कोटी कोटी नमन…
तर मित्रांनो तुम्हाला “महात्मा गांधी निबंध मराठी 1000 शब्द | Mhatma Gandhi Marathi Nibandh Mahiti” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ महात्मा गांधी निबंध मराठी 1000 शब्द सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.
या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
धन्यवाद
मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म कधी झाला?
मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर शहरात झाला.