मी अनुभवलेला लॉकडाऊन मराठी निबंध | mi anubhavlela lockdown marathi nibandh

mi anubhavlela lockdown marathi nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण मी अनुभवलेला लॉकडाऊन या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
mi anubhavlela lockdown marathi nibandh
mi anubhavlela lockdown marathi nibandh

मी अनुभवलेला लॉकडाऊन मराठी निबंध

 

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना आपल्याला दिसत आहे. कोरोना व्हायरस या संकटाशी आपण सर्वच लढा देत आहोत.

कोरोना विषाणूंची ही साखळी तोडण्यासाठी व कोरोनाचा व्हायरस चा सामना करण्यासाठी जगभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले.

आपल्या देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर हळू हळू रुग्ण संख्येत वाढ होताना दिसू लागली. कोरोनाची ही साखळी तोडणे व देशातील लोकांचे आरोग्य नीट राहण्यासाठी राज्यसरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.

देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ करण्यात यावा असे आवाहन केले.

आपल्या देशात २४ मार्च २०२० या दिवशी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. सुरुवातीचा लॉकडाऊन हा २१ दिवसांसाठी करण्यात आला होता.

कोरोनाचा वाढता धोका बघता हा लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आला. “mi anubhavlela lockdown marathi nibandh”

एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आपण आलो तर हा विषाणू अपल्यावरही आक्रमक करू शकतो. कोरोना विषाणूंचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात होत्या.

मनामध्ये अनेक प्रश्न घर करून बसले होते. हे संकट कधी टळणार? कोरोनामुळे कोणकोणत्या संकटांना आपल्याला सामोरे जावे लागेल? लॉकडाऊन कधी संपणार? असे अनेक प्रश्न मला पडलेले होते.

आजूबाजूला सर्वत्र एकच विषय कानावर पडत होता तो म्हणजे कोरोना. मनामध्ये थोडीशी भीती निर्माण झाली होती.

चीनच्या वुहान शहरापासून सुरु झालेला कोरोना व्हायरस जगातील अनेक देशांमध्ये पोहोचला होता. भारतात पण हा विषाणू येऊन पोहचला होता.

कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत होता. कोरोना व्हायरस आमच्या गावापर्यंत सुद्धा येऊन पोहचेल का? असे प्रश्न माझ्या मनात घोळू लागले.

माझ्या गावचे नाव_____ हे आहे. गावातील आम्ही सर्व जण लोकडाऊनचे पालन व्यवस्थितपणे करत होतो. गावातील शाळा, कॉलेज, बस, रेल्वे या सर्व गोष्टी बंद ठेवण्यात आले होते.

लॉकडाऊन च्या काळात मला अनेक गोष्टींचा अनुभव आला. अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. या कोरोना काळात घरात राहूनच आपण या संकटाशी सामना करू शकत होतो.

mi anubhavlela lockdown marathi nibandh

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर गावात अनेक उपाययोजना करण्यात आल्या. आम्ही सर्वजण या संकटाशी लढण्यासाठी सज्ज झालो.

सर्वप्रथम गावात निर्जंतुकीकरण फवारणी करून घेतली.

प्रत्येक कुटुंबातील लोकांनी आपल्या कामासाठी बाहेर गेलेल्या मुलांना, शाळेसाठी बाहेर असलेल्या आपल्या मुलाबाळांना संपर्क साधून काळजी घेण्यासाठी सांगितले.

सुरुवातीच्या काळात थोडीशी मज्जा केली परंतु हा वेळ अमूल्य आहे हे मला समजले.

हा निबंध सुद्धा जरूर वाचा – कोरोना काळातील शिक्षण 

लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे शाळासुद्धा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे भरपूर वेळ माझ्याजवळ उपलब्ध होता. या मिळालेल्या वेळचा योग्य वापर कसा करता येईल याचा विचार मी करू लागलो.

मला शाळेत जाणे शक्य न्हवते. शाळा बंद आहेत म्हणून शिक्षण घेणे थांबवून चालणार नाही हे माझ्या लक्षात आले.

मी या मिळालेल्या वेळेचा वापर मला अभ्यासात जे मुद्दे समजायला अडचण येत होती ते मुद्दे समजावून घेण्यात करू लागलो.

दूर कर हे संकट,
दयाळू पूर्ण कर माझी मनोकामना.
जाऊ दे हा कोरोना….
देवा प्लीज सुरु कर माझी शाळा.

कोरोना संकट कधी टळेल हे कोणी निश्चितपणे सांगू शकत नव्हते. “मी अनुभवलेला लॉकडाऊन मराठी निबंध”

टीव्ही वरील बातम्यांमधून मला कोरोना पासून सावध राहण्यासाठी आपण काय करू शकतो याची माहिती मिळत होती.

मी रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करू लागलो. त्यासाठी मी सकाळी लवकर उठण्याची सवय स्वतःला लावली. सकाळी लवकर उठून योगा करण्यास सुरुवात केली.

आम्ही घरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थांचा वापर जेवणात करू लागलो.

लॉकडाऊनचे नियम पाळत आम्ही सर्वजण नियमितपणे मास्क आणि सेनेटायझरचा वापर करू लागलो. नियमांचे पालन करत आम्ही “घरी राहा सुरक्षित राहा” हा मूलमंत्र पळाला.

अतिदक्षता म्हणून गावाच्या प्रवेशद्वारामध्ये सेनेटायझर कक्ष बांधले गेले होते.

कोरोना काळात गावातील अनुभवी लोकांच्या मदतीने या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो.

माझ्या गावातील अनुभवी लोक, पोलीस, डॉक्टर न थकता  मेहनत घेत होते. या सर्व लोकांच्या मेहनातीमुळेच आम्ही कोरोनाचा या संकटापासून लांब राहू शकलो.

मी शाळा सुरू होण्याची वाट पाहत होतो. मला शिक्षण घेत असताना खूप अडचणी येत होत्या.

लॉकडाऊन अनुभवताना मराठी निबंध

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात आला होता.

कोरणा काळात मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून शिक्षकांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले. झूम, गूगल मीट यांच्या मदतीने शिक्षक व आम्ही मुले संपर्क साधू लागलो.

लॉकडाऊनमध्ये मुलांना अभ्यासासाठी पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

आत्तापर्यंत गावामध्ये एकही कोरोना रुग्ण न्हवता. परंतु अचानक खळबळ उडाली. गावामध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याची बातमी आम्हाला समजली.

गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आम्हाला तर विश्वासच बसत न्हवता. आम्ही सर्वजण आणखी दक्षता घेऊ लागलो. ‘लॉकडाऊन अनुभवताना मराठी निबंध’

गावात कोरोनाबधित रुग्ण सापडल्याची वार्ता समजल्या समजल्या गावातील अनेक ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले.

गावातील घरोघरी आरोग्याकर्मचारी येऊन आरोग्यविषयक काही गोष्टींची खात्री करू लागले.

बोलताना ठराविक अंतर ठेवणे, गर्दी करू नये, मास्क वापरणे या गोष्टींचे पालन करण्यासाठी वारंवार सांगितले जात होते.

कोरोना काळात मी रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी वेळ दिला. घरी राहून अभ्यास करणे, वर्तमानपत्र वाचणे या गोष्टीना महत्व दिले.

lockdown anubhav tana marathi nibandh

बातम्या पाहिल्यामुळे मला देशभरात घडत असलेल्या घडामोडींची माहिती मिळत होती. लॉकडाऊनमध्ये आम्ही कुटुंबातील सर्वजण खूप वेळ एकत्र राहू शकलो.

लॉकडाऊन मध्ये मी भरपूर वाचन केले. लॉकडाऊनमध्ये मला खूप गोष्टींची जाणीव झाली. भरपूर लोकांना काम नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

मी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत करत वेळेचा योग्य वापर केला.

मी या लॉकडाऊनमध्ये आई वडिलांच्या आरोग्यविषयक अती दक्षता घेतली.

या लॉकडाऊनमध्ये मी शाळेपासून व शाळेतील माझ्या मित्रांपासून लांब राहिलो पण परिस्थिती पाहून पुन्हा एकदा शाळा उघडतील व मी माझ्या मित्रांना भेटेन.

तर मित्रांनो तुम्हाला “mi anubhavlela lockdown marathi nibandh” हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ या मी अनुभवलेला लॉकडाऊन
निबंधा संबंधीत काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment

close button