मी कोरोना बोलतोय निबंध मराठी | mi corona boltoy marathi nibandh | कोरोनाव्हायरस ची आत्मकथा

mi corona boltoy marathi nibandh: नमस्कार मित्रांनो आज आपण मी कोरोना बोलतोय निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

हा निबंध लिहीत असताना कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्या, अडचणी तसेच कोरोनाची लक्षणे कोणती? कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण काय प्रयत्न   करू शकतो? याची माहिती पाहणार आहोत.

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने निबंध उपलब्ध करून देत आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

मी कोरोना बोलतोय निबंध मराठी | mi corona boltoy marathi nibandh

 

मित्रांनो, माझ्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक नवनवीन समस्यांचा सामना जगभरातील सर्वांनाच करावा लागत आहे. सध्या संपूर्ण जग माझ्यामुळे त्रस्त व भयग्रस्त जीवन जगत आहे. मित्रांनो, तुम्ही मला ओळखले असेलच? होय मी कोरोना बोलतोय.

आज मी तुम्हाला माझा परिचय देतो व तसेच माझ्यापासून वाचण्याचे उपायही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. माझा परिचय देण्यापूर्वी मी सर्वांची मनापासून माफी मागतो कारण अनेक समस्यांचा सामना माझ्यामुळे तुम्हाला करावा लागत आहे.

👉मी कोण होणार निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

आज तुम्ही सर्वजण तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने माझ्याविरुद्ध लढा देत आहात. अनके लोकांना माझी लागण झाल्याने जागतिक आरोग्य संघटना WHO ने २०२० मध्ये मला जागतिक महामारी घोषित केले.

मी एक प्रकारचा विषाणू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मला कोविड-१९ (Covid-19)असे नाव दिले.  मी २०२९ मध्ये पहिल्यांदा चीनमध्ये आढळलो.

Co- Corona
Vi- Virus
D-  Disease

19-2019

को म्हणजे कोरोना
वि म्हणजे व्हायरस
ड म्हणजे डिसीज (आजार)

मित्रांनो, तुमच्या आनंदी जीवनामध्ये समस्या निर्माण करण्याची माझी इच्छा अजिबात नाही. तुम्ही कोरोना संक्रमित रुग्णाच्या जास्त संपर्कात आला तर मी तुम्हालाही होऊ शकतो त्यामुळे सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करणे हाच उत्तम उपाय आहे. सर्वत्र मला माझ्या विषयी चर्चा ऐकायला मिळत असते. आज संपूर्ण जगाला मी विळखा घातलेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मला ओळखतात.

मी संपूर्ण जगासाठी एक संकट बनलेलो आहे. माझ्यामुळे मानवी जीवन धोक्यात येऊ शकते त्यामुळे तुम्ही काही गोष्टींचे पालन केले तर तुम्हाला माझ्यापासून कोणताही त्रास होणार नाही.

mi corona boltoy marathi nibandh

अनेक कोरोना योद्धा तुम्हाला माझ्यापासून लांब ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. देशातील डॉक्टर तसेच पोलिस कर्मचारी त्याचबरोबर अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत.

माझा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक दिवस शाळा, देवालये तसेच अनेक गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्यात आली त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी निर्माण झाल्या. मुलांना शिक्षण घेण्यासाठी पर्यायी मार्ग वापरावे लागले.

👉मी कोण होणार निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

तुम्ही सर्वांनी नियमांचे पालन केले तर माझ्यापासून घाबरण्याचे कारण नाही. परंतु निष्काळजीपणा दाखवूनही चालणार नाही. माझा प्रादुर्भाव कमी करणे, मला नष्ट करणेही तुमच्याच हातात आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना एकजूटपणे कार्य करावे लागेल.

कोरोनाव्हायरस ची आत्मकथा मराठी निबंध | coronavirus chi atmakatha in marathi

 लक्षणे

 • न थांबणारा खोकला
 • ताप आणि थकवा
 • श्वास घेण्यास त्रास होणे
 • तोंडाची चव, गंध बदलणे

माझ्यापासून बचाव करण्याचे काही उपाय मी तुम्हाला सांगतो. मी सांगितलेल्या गोष्टींचे पालन तुम्ही केले तर तुम्हाला माझ्यापासून कोणत्याही समस्या होणार नाहीत.

 • घराबाहेर पडणे गरजेचे असेल तरच बाहेर जावे. विनाकारण घराबाहेर पडू नये.
 • हात वारंवार धुतले पाहिजेत.
 • मास्कचा वापर केला पाहिजे.
 • सॅनिटायझर चा वापर केला पाहिजे.
 • शक्य होईल तेवढे कोमट पाणी प्यावे.
 • सर्दी, खोकला, ताप जाणवत असेल तर त्वरीत दवाखान्यात जावे.
 • सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करावे.

या गोष्टींचे पालन केले तर निश्चित तुम्ही माझ्यापासून तुमचा बचाव करू शकता.

परंतू एकीकडे कोरोना योद्धे मेहनत घेताना मला पाहायला मिळतात तर एकीकडे काही नियमांचे पालन होताना मला दिसत नाही.

सरकार द्वारे सांगितल्या जाणाऱ्या नियमांचे पालन केले तर माझा प्रादुर्भाव कमी होईल. अनेक डॉक्टर तुम्हाला माझ्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सर्व नियमांचे पालन केले, योग्य प्रकारे मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टनसिंग पळाले तर माझ्यापासून तुम्हाला कसलीही भीती नाही.

माझ्यामुळे तुम्हाला खूप समस्या, अडचणींचा सामना करावा लागला त्याबद्दल मी संपूर्ण जगाची दिलगिरी व्यक्त करतो.

मित्रांनो, तुमच्याजवळ mi corona boltoy marathi nibandh | मी कोरोना बोलतोय निबंध मराठी  या निबंधा संबंधित काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा.

मित्रांनो तुम्हाला  मी कोरोना बोलतोय हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

 धन्यवाद

Leave a Comment

close button