2023 मी सह्याद्री बोलतोय निबंध मराठी | Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi

Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi- नमस्कार मित्रांनो आज या लेखात “मी सह्याद्री बोलतोय निबंध मराठी” या विषयावर निबंध पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे की हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.

 

मी सह्याद्री बोलतोय निबंध मराठी | Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi

 

नमस्कार मिञांनो, ओळखलं का मला, होय तोच मी तुमचा लाडका सह्याद्री पर्वत. असे आश्चर्याने काय पाहताय हो मी सह्याद्रीच बोलतोय. हो… या महाराष्ट्राच्या महान इतिहासाचा मी एक साक्षीदार आहे.

अनेक संकटाचा सामना करत न डगमगता निरंतर महाराष्ट्र भूमीला सुरक्षित ठेवण्यासाठी आजही मी दिमाखात उभा आहे. मला इतिहासात स्थान मिळवून दिले ते माझ्या स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी. मावळ्यांच्या माझ्या दऱ्याखोऱ्यातील केलेल्या गनिमी काव्याला साक्ष देते स्वराज्य निर्मितीत माझेही योगदान देत एका समृद्ध काळाचा, विशाल स्वराज्याचा मी साक्षीदार बनलो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्याने स्थापन झालेले स्वराज्य मी याची देही याची डोळा पाहिले. पण स्वराज्याची स्वप्न जसे मराठी जनतेने पाहिले तसे मीही पाहिले होते. गनिमी काव्याचे युद्धतंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी कमीत कमी सैनिकांच्या सहाय्याने बलाढ्य अशा फौजांचा यशस्वीपणे सामना त्यांनी केला.”मी सह्याद्री बोलतोय निबंध मराठी”

👉मनोरंजनाची आधुनिक साधने निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

कान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर, बाजी पासलकर तसेच अनेक मावळे असे कितीतरी जिवास जीव देणाऱ्या शूरवीरांनी आपल्या जिवाची पर्वा न करता शिवरायांना साथ दिली. या वीरांनी माझे नाव इतिहासात नोंदवले.

“कणकण तिथला देत आहे साक्ष
माझ्या शिवबाच्या इतिहासाची ॥
आहेत उमटलेली पावले तेथे
आजही मावळ्यांच्या पराक्रमाची,
त्यांच्या शौर्याची ॥

ज्याप्रमाणे इन्द्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. माझ्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.

मी सह्याद्री बोलतोय निबंध मराठी

सह्याद्री महाराष्ट्र राज्याच्या भूगोलाचा एक अविभाज्य भाग. आजही महाराष्ट्र भूमीला सुरक्षित ठेवणारा मी तिच्या रक्षणार्थ झिजणारा मीच म्हणजे सह्याद्री. महाराष्ट्र मध्ये असलेल राजगड, रायगड, तोरणा, शिवनेरी हे सर्व तर माझ्या छत्रछायेखाली आहेत. या गडांमुळे माझ्या सुंदरतेत आणखीनच भर पडली. आपल्या देशातील खूप लोकांना माझ्या सानिध्यात राहायला खूप आवडते.

वेगवेगळ्या प्रकारची झाडे, सुंदर सुंदर पक्षी आणि प्राणी माझ्याच कुशीत मोठे झाले. लाखो प्रजाती आणि प्राणी माझ्यात एकत्र राहतात. मी सर्व मानव आणि प्राण्यांवर, पक्षांवर मुलासारखे प्रेम करतो. निसर्गाची या सृष्टीचे कित्येक गुपिते मी माझ्या उरात कित्येक वर्षापासून जपून ठेवले आहेत.(Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi)

माझे हिरवेगार असणे ही माझी ओळख आहे. हजारो जाती प्रजातीची वनस्पती प्राणी पक्षी, झाडे, वेली म्हणजेच माझे वैभव. पक्षांचा किलबिलाट सतत येथे घुमत आहे. माझ्यात अशा कित्येक वृक्षांच्या प्रजाती तर अख्या जगात कुठेही सापडत नाहीत. भीमा गोदावरी कावेरी कृष्णा कोयना तापी नर्मदा आजही माझ्या महाराष्ट्रात खेळाळून वाहत आहेत.

👉मनोरंजनाची आधुनिक साधने निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

पण मात्र तुम्ही माझे सारे वैभव लुटू पाहत आहे. पवित्र नद्यांना दूषित करत आहे. नद्यांमध्ये विविध प्रकारच्या घाणीचे साम्राज्य पसरवत आहेत. कचरा, उद्योग किंवा कारखान्यांतील कचरा इत्यादी कचरा कधीकधी नद्यामधे मिसळल्याने पाणी प्रदूषित होऊन त्यातून भयंकर रोगराई निर्माण होते. त्यामुळे मला दिवसेंदिवस अधिकच वेदना होत आहेत.

Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi

वृक्षांची संख्या कमी होत राहिली तर जागतिक तापमानवाढ, प्रदूषण अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तापमान वाढ झाल्यामुळे अनेक पक्ष्यांचे, प्राणाचे जीवन धोक्यात येऊ शकते. वृक्षतोड झाल्यामुळे जंगलांचे प्रमाण कमी झाले आहे व प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.

माझ्यात वाढणाऱ्या पशु पक्षांच्या वनस्पतींच्या कित्येक प्रजाती आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. माझी शान असलेले गड किल्ले आज खचून कोसळत आहेत. हे सारे थांबवणे तुमच्या हातात आहे.

पर्यावरणाचे संवर्धन होण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. अलीकडे वृक्षारोपणचे अनेक उपक्रम राबविले जातात मला याचा खूप अभिमान आहे.

मला असे लोक कधीच आवडत नाहीत ज्यांना लोकांना किंवा मला दुखवण्यात आनंद मिळतो. मी नेहमीच प्रत्येकाला एकच संदेश देतो की माझ्यावर प्रेम करा आणि माझ्यात जे काही आहे त्याने तुमचे जीवन आपोआप आनंदी होईल.

तर मित्रांनो तुम्हाला “मी सह्याद्री बोलतोय निबंध मराठी | Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi
हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ “मी सह्याद्री बोलतोय निबंध मराठी” सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button