Nadiche Atmavrutta Nibandh Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.
या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध मराठी | Nadiche Atmavrutta Nibandh Marathi
मी नदी आहे. डोंगराच्या कुशीत माझा जन्म झाला आहे. डोंगरातून प्रवास करताना मला खूप जंगलेही भेटतात, त्यामुळे माझे सौंदर्य आणखी वाढते.
मी कधीच एका जागी न थांबता नेहमी मी वाहत राहते कदाचित त्यामुळेच मला चंचल म्हटलं असेल.
👉ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी येथे क्लिक करा 👈
गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी इ. नावांनी प्रत्येकजण मला ओळखतो. माझ्या स्वच्छ पाण्यामुळे मी सर्व लोकांना माझ्याकडे आकर्षित करते.Nadiche Atmavrutta Nibandh Marathi
मी ज्या परिसरातून जाते तेथील माती, प्राणी, पक्षी सर्वांची तहान मी भागवते. माझे पाणी पिऊन सर्व प्राणी-पक्षी, मनुष्य आपली तहान भागवतात. माझ्या पाण्यामुळे झाडे झुडपे ते हिरवेगार होऊन जातात.
सतत वाहत राहणे आणि सर्वांना मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. अनेकदा माझ्या मार्गामध्ये अडथळे येतात परंतू मी माझ्या सर्व शक्तीनिशी ते पार करून पुढे जात असते.
नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध मराठी
लोकांनी त्यांच्या गरजेनुसार माझ्यावर इकडे तिकडे ये-जा करण्यासाठी पूलही बांधले आहेत.
कधी माझा प्रवाह वेगवान असतो तर कधी संथ असतो. पावसाच्या दिवसात माझे रूप फार भयंकर होते. माझ्या आजू-बाजूंच्या वसलेल्या गावांना, शहरांना पाणी देण्याची जबाबदारी माझ्यावर असते.
माझ्या पाण्याचा उपयोग करून मनुष्य आपली असंख्य कामे पूर्ण करतो. सुंदर जंगलातून, गावातून वाहत असताना थकलेल्या वाटसरूची तहान भागवताना मला खूप छान वाटते.
मी सगळ्यांच्या खूप उपयोगी पडते याचा मला खूप आनंद होतो. परंतू लोक माझ्या आत कचरा टाकून मला घाण करतात. असे केले तर माझे पाणी कसे स्वच्छ राहणार ?
वीज निर्मितीमध्येही माझी मदत होते. विजेशिवाय माणसाचे काम अशक्य आहे. उन्हाळ्यात पाऊस पडत नाही आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होते तेव्हा माझ्यावर अवलंबून असलेल्या लोकांची, प्राण्यांची साथ मी सोडत नाही.
नदीचे आत्मकथा निबंध मराठी | Nadiche atmakatha nibandh marathi
माझ्यासमोर अनेक अडथळे येतात, पण मी त्या अडथळ्यांचा सामना करून वाहत राहते.
👉ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी येथे क्लिक करा 👈
माझ्या पाण्याने केवळ मानवच आपली तहान भागवत नाहीत तर शेती करण्यासाठी लोक माझा वापर करतात व शेतात पिके घेतात.
नेहमी सर्वांच्या उपयोगी पडूनही माझ्या पात्रात कोणी कचरा टाकला तर मला वाईट वाटते तरीही मी सदैव मानवसेवेत वाहत राहीन.(नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी)
माझ्यासारख्या अनेक नद्या प्रदूषित होत आहेत. माझ्या पाण्यात अनेक जलचर प्राणी राहतात. अति जलप्रदूषण झाले तर त्या जलचर प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. मनुष्य प्राणी माझे असे पाणी पितात, त्यामुळे त्यांची तब्येत बिघडते, हे पाहून मला खूप वाईट वाटते.
मी इतकी उपयुक्त असूनही कारखान्यांचे दूषित पाणी, कचरा आणि प्लास्टिक हे माझ्यात टाकले जाते त्यामुळे माझे पाणी दूषित होत आहे.
लोकांच्या मदतीसाठी, देशाच्या हितासाठी मी माझे सर्वस्व अर्पण करण्यास सदैव तयार आहे. माझी एक विनंती आहे की माझे स्वच्छ पाणी दूषित करू नका आणि मला स्वच्छ ठेवण्यात मदत करा.
तर मित्रांनो तुम्हाला “नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी | Nadiche Atmavrutta Nibandh Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.
या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
धन्यवाद