निसर्ग आणि आम्ही निबंध मराठी | Nisarg Ani Amhi Nibandh Marathi

Nisarg Ani Amhi Nibandh Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात “निसर्ग आणि आम्ही निबंध मराठी” या विषयावर निबंध पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे की हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.

निसर्ग आणि आम्ही निबंध मराठी | Nisarg Ani Amhi Nibandh Marathi

 

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे

पक्षीही सुस्वरे। आळविती।।

येणे सुख रुचे एकांताचा वास।

नाही गुणदोष। अंगी येत।।

संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्व सांगताना अतिशय सुंदर असा अभंग मांडला आहे.

निसर्ग आणि माणूस यांच्यात खूप जवळचा संबंध आहे. दोघेही एकमेकांना पूरक आहेत. निसर्ग हा मानवाचा सोबती तर आहेच पण तो एक महान गुरुही आहे. निसर्गाने आपल्याला अनमोल देणगी दिली आहे. पाणी, हवा, जमीन, झाडे, जंगल, पर्वत, नद्या, सूर्य, चंद्र, आकाश, समुद्र या सर्व गोष्टी निसर्गाची देणगी आहेत.

वृक्ष आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचे अपेक्षा न ठेवता त्यांच्यापासून मिळणाऱ्या सर्व गोष्टी मनुष्याला प्रदान करतात. निसर्ग आणि मानवाची मैत्री हा एक अमूल्य वारसा आहे, जो जीवनात गोडीचा संचार करतो. अनेक ऋषीमुनींनी आपले आयुष्य निसर्गाच्या कुशीत घालवले.“निसर्ग आणि आम्ही निबंध मराठी”

वृक्ष आपले जिवलग मित्र आहेत. खरं तर आपणा सगळ्यांनाच निसर्गाची आवड आहे. माणसाने आजपर्यंत जे काही साध्य केले आहे ते निसर्गाकडून शिकूनच केले आहे. निसर्ग म्हणजे जे रम्य आणि भव्य त्याचे प्रत्ययकारी दर्शनच. लुकलुकणारे तारे मंत्रमुग्ध करणाऱ्या रात्रीची अनुभूती देतात. आपल्या निसर्गाला भरपूर नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे ज्याचा आपण कधीही आनंद घेऊ शकतो.

भारतीय स्वातंत्र्य लढा निबंध मराठी

निसर्गाच्या छायेत आपण सतत राहत असतो. निसर्गाकडूनच आपल्याला पिण्यासाठी पाणी, शुद्ध हवा, प्राणी, वनस्पती, झाडे-वनस्पती, चांगले अन्न आणि राहण्यासाठी घर मिळते. आपल्या जीवनात जेवढ्या पण आवश्यक गोष्टी आहेत त्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

निसर्ग आणि आम्ही निबंध मराठी

निसर्गाच्या सानिध्यात सकाळी लवकर चालणे आपल्याला निरोगी आणि मजबूत बनवते व अनेक घातक आजारांपासून दूर ठेवते. निसर्गाच्या सावलीतच माणूस स्वतःला आनंदी वाटू शकतो. निसर्ग हा खूप काळापासून कवी, लेखक आवडता विषय राहिला आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर निसर्गातील औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतींपासून औषधे उपलब्ध केली जातात. निसर्गाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो स्वतःच्या वस्तू वापरत नाही. जशी नदी स्वतःचे पाणी स्वतःच पीत नाही, झाडे स्वतःची फळे स्वतः खात नाहीत, फुले सर्व वातावरणात आपला सुगंध पसरवतात.

निसर्ग आपला शेवटपर्यंत सोबत पुरणारा सच्चा दोस्त आहे. निसर्ग हा आपल्याला कधीही हानी पोहचवत नाही तर याउलट आपले पालनपोषण करतो. आपण जर वृक्षरोपण केले वृक्षांचे योग्य पालनपोषण केले तर त्यांच्यापासून आपल्याला विविध गोष्टी प्राप्त होतात.

निसर्गाचे आणि आपले नाते अतूट आहे. वृक्षांना आपले मित्र म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही कारण, वृक्ष आपल्यासाठी खूप मदत करतात. निसर्गाचा समतोल ढासळू न देता निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतला पाहिजे.(Nisarg Ani Amhi Nibandh Marathi)

परंतु आपण हे विसरतो की आपल्यात आणि निसर्ग यांच्यातील नातेसंबंधात आपलीही काही जबाबदारी आहे. आपण भाग्यवान आहोत कारण आपल्याला निसर्गासारखा मित्र मिळाला आहे. पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कचरा, कारखान्यांमधील विषारी पाणी नदीमध्ये मिसळल्याने जलप्रदूषण होते.

वाहनांचे हॉर्न आणि लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण वाढते. दिवसेंदिवस वाढणारे उद्योग आणि वाहने यामुळे वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. जलप्रदूषणामुळे पोटाचे अनेक प्रकारचे आजार होतात. पाणी प्रदूषित होऊन त्यातून भयंकर रोगराई निर्माण होत असून त्यामुळे जनजीवन धोक्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढा निबंध मराठी

कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा टाकाऊ वस्तू नद्या, तलाव यामध्ये न टाकता, कचरा पेटी किंवा योग्य ठिकाणी टाकावा म्हणजे जलप्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

Nisarg Ani Amhi Nibandh Marathi

वाहनांची वाढती संख्या त्यामुळे धुराचे प्रमाणही वाढत आहे. कारखाने, वाहने यांमधून निघणाऱ्या धुरामुळे वातावरण अत्यंत प्रदूषित होत आहे. पाणी आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. जलप्रदूषण हे केवळ मानवांसाठीच नव्‍हे तर इतर जीवांसाठीसुध्दा घातक आहे. प्रदूषणासारख्या समस्यांना केवळ निसर्गच सामोरे जाऊ शकतो.

निसर्ग आपले आईप्रमाणे रक्षण करतो म्हणूनच निसर्गाचा गैरवापर करण्यापेक्षा आपण सर्वांनी त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे व निसर्गाचे रक्षण केले पाहिजे.

आधुनिक जीवनशैली जगत असताना आपण आपली नैसर्गिक मूल्ये जपली पाहिजेत. जेणेकरून आपण मानव आणि निसर्ग यांच्यातील मैत्रीचा समतोल कायम राखू. निसर्गाचे स्वरूप सुंदर ठेवण्याचा आणि त्याचा नाश रोखण्याचा आपला प्रयत्न असायला हवा.

वृक्षांचे महत्त्व इतरांना पटवून देण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा, वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन असे विविध उपक्रम घेऊन झाडाचे महत्व त्यांना सांगणे गरजेचे आहे.

स्वतःसाठी आणि पुढच्या पिढीसाठी या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून आपण त्याचा सहज आनंद घेऊ शकतो. आपली मदत आणि काळजी घेतल्याबद्दल आपण निसर्गाचे आभार मानले पाहिजेत

तर मित्रांनो तुम्हाला “निसर्ग आणि आम्ही निबंध मराठी | Nisarg Ani Amhi Nibandh Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ “निसर्ग आणि आम्ही निबंध मराठी“सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button