निसर्ग माझा सोबती { गुरू } मराठी निबंध | nisarg maza sobati marathi nibandh

nisarg maza sobati marathi nibandh: नमस्कार मित्रांनो आज आपण निसर्ग माझा सोबती मराठी निबंध
या विषयावर निबंध मराठीमध्ये पाहणार आहोत.

निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो त्यामुळे निसर्गाचे महत्व समजून घेऊन त्याचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.

प्रदूषणामुळे निसर्गाला कशा प्रकारे हानी पोहचत आहे? निसर्गाचे संरक्षण आपण कशा प्रकारे करू शकतो ? याची माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

निसर्ग माझा सोबती मराठी निबंध | nisarg maza sobati marathi nibandh

 

आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनके गोष्टी निसर्गामधून मिळत असतात. निसर्ग आपल्याला अनेक प्रकारची फळे, फुले, हवा, पाणी अशा अनेक गोष्टी प्रदान करत असतो.

निसर्ग ही देवाने आपल्याला दिलेली सर्वात सुंदर देणगी आहे.
प्रत्येकाला निसर्गाच्या सानिध्यात वेळ व्यतित करायला आवडतो. निसर्ग आपल्याला कोणतीही अपेक्षा न करता खूप मदत करतो.

आपल्याला आवश्यक असणारा प्राणवायू, तहान भागवण्यासाठी पाणी, भूक  भागवण्यासाठी अन्न याच निसर्गातून मिळत असते.”nisarg maza sobati marathi nibandh”

👉वृक्षारोपण काळाची गरज निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

आपला बराच वेळ हा निसर्गाच्या सानिध्यात जातो. या निसर्गातून मनुष्याला जीवनावश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मिळत असतात. निसर्गाशिवाय आपले अस्तित्व टिकून राहणे अवघड आहे.

आपल्या आजूबाजूला असलेला सूर्य, चंद्र, नदी, झाडे, झुडपे, पशू-पक्षी ही सर्व सृष्टी म्हणजे निसर्ग.

निसर्गामुळे पृथ्वीवरील प्रत्येक जीव आनंदाने जगत आहे. आपल्या आजूबाजूला असणारी झाडे झुडपे, डोंगर, नदी यांचे एकत्रित संगम निसर्गात पाहायला मिळते.

निसर्ग माझा गुरु निबंध मराठी | nisarg maza guru marathi nibandh

आपण नशीबवान आहोत कारण आपल्याला निसर्गासारखा सोबती मिळाला आहे. निसर्गातील झाडे आपल्याला सावली देतात. छान छान पक्षी व त्यांचे छान आवाज आपल्या कानी पडतात.

अनेक साधुसंतांनी त्यांचे जीवन निसर्गाच्या सानिध्यात व्यतित केले.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे

पक्षीही सुस्वरे। आळविती।।

येणे सुख रुचे एकांताचा वास।

नाही गुणदोष। अंगी येत।।

संत तुकाराम महाराज यांनी अशा सुंदर शब्दात
निसर्गाशी नाते सांगितले आहे.

निसर्गतील सर्व गोष्टींचा आनंद आपण घेतला पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यात अनेक लेखक शांतपणे आपले लेखन करतात. कामातून वेळ काढून निसर्गामध्ये वेळ व्यतित करण्यास लोकांना आवडते.

निसर्ग आपल्याला निरोगी ठेवण्यातही मदत करतो. वेगवेगळ्या  प्रकारच्या आजारांवर निसर्गातील औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतींपासून औषधे उपलब्ध केली जातात.

निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही न काही शिकवत असते. निसर्गातील प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.(निसर्ग माझा गुरु निबंध मराठी)

निसर्गाचे सौंदर्य असेच टिकवून ठेवायचे असेल तर आपल्याला निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा वापर व्यवस्थित करावा लागेल.

nisarg maza mitra marathi nibandh/निसर्ग माझा मित्र मराठी निबंध

“nisarg maza mitra marathi nibandh”:- निसर्गाने आपल्याला असंख्य गोष्टी दिलेल्या आहेत. पृथ्वीवर आपले जीवन केवळ निसर्गामूळे शक्य आहे. निसर्गाचा समतोल व्यवस्थित राहणे गरजेचे आहे.

निसर्ग आपल्याला निस्वार्थपणे एवढ्या गोष्टी देतो तरीही निसर्गाचा ऱ्हास होताना आपल्याला पाहायला मिळतो.
अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात निसर्गाला हानी पोहचत आहे.

जलप्रदूषण, हवाप्रदूषण, वायुप्रदूषण अशा अनेक प्रदूषणांचा आपण सामना करत आहोत. हे प्रदूषण कमी करण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे.

👉वृक्षारोपण काळाची गरज निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

मनुष्यासोबतच निसर्गातील अनेक जीवांचे पशू पक्षांच्या जीवनालाही धोका निर्माण होऊ शकतो. निसर्गामूळे आपल्याला अनेक गोष्टी मिळतात त्यामुळे निसर्गाचे संवर्धन करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होताना दिसते. आपल्याला आजूबाजूला असणारे वृक्ष आपल्याला खूप गोष्टी देतात. ही झाडे वातावरणातील प्रदूषित हवा शुद्ध करण्याचे काम करत असतात.

आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू ही झाडे आपल्याला प्रदान करतात.(निसर्ग माझा मित्र निबंध मराठी)

आपल्याला नेहमी स्वछ व सुंदर निसर्गात राहायला आवडते त्यामुळे प्रदूषण होणार नाही याची काळजीही आपल्यालाच घ्यावी लागेल.

झाडे ही निसर्गाचा सर्वात महत्वाचा भाग आहेत. वृक्षांची संख्या कमी झाल्याने जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, आरोग्यविषयक समस्या, पाऊस कमी प्रमाणात पडणे अशा अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या राहू शकतात.

आपल्याला पिण्यासाठी स्वछ पाण्याची गरज असते. परंतु कचरा, कारखान्यांमधील विषारी पाणी नदीमध्ये मिसळल्याने जलप्रदूषण होते.

निसर्गाचे सौंदर्य असेच टिकवून ठेवणे, निसर्गाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पृथ्वीवरील सजीवांचे जीवन व्यवस्थित चालण्यासाठी निसर्गाचे संतुलन व्यवस्थित राहणे गरजेचे आहे.

२८ जुलै या दिवशी विश्व निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. आपण वृक्षारोपण यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे. आपण निसर्गाला काही देऊ शकत नसलो तर आपण निसर्गाचे संरक्षण तर नक्कीच करू शकतो.

आपल्या पुढील पिढीला स्वछ हवा, सुंदर निसर्ग मिळण्यासाठी आपल्याला आतापासून निसर्गाला हानी न पोहचवता निसर्गाची काळजी घेतली पाहिजे.“nisarg maza mitra marathi nibandh”

आपण जसे वागतो तसेच आपल्याला मिळते. आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गमधील अनेक गोष्टींचा उपयोग आपल्याला करता येईल.

काही महत्त्वाच्या गोष्टी-

 

  • वृक्षारोपण करण्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
  • जल प्रदूषण,ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
  • केरकचरा पाण्यामध्ये, इतरत्र न टाकता काचारापेटी मध्ये टाकावा.
  • प्लास्टिकचा वापर कमी करावा

तर मित्रांनो तुम्हाला निसर्ग माझा सोबती मराठी निबंध | nisarg maza sobati marathi nibandh हा निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ वरील निबंधासंबंधित काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा.

वरील nisarg maza sobati marathi nibandh निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

 धन्यवाद

Leave a Comment

close button