Pahateche Saundary Nibandh Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.
या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध | Pahateche Saundary Nibandh Marathi
परीक्षा जवळ आली होती. परीक्षेला काही महिने राहिले होते. सकाळची वेळ अतिशय शांत, उत्साही आणि थंड असते त्यामुळे उद्यापासून मी अभ्यास करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे ठरवले.
ठरल्याप्रमाणे मी पहाटे लवकर उठलो. घरातील इतर लोक अजूनही झोपली होती. थोडासा व्यायाम करुन अभ्यासाला बसावे म्हणून म्हणून मी व्यायाम करण्यासाठी पाहटेच घराबाहेर पडलो.
पहाटेचे ते दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. पहाट होताच सगळीकडे पसरलेला अंधकार हळूहळू दूर होऊ लागला.
रस्त्यावर जास्त रहदारी पहायला मिळत न्हवती. काही लोक आळस झटकत व्यायाम करत होती. वातावरण शांत आणि प्रसन्न वाटत होते.
👉पावसाळ्यातील एक दिवस निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈
ताजी हवा माझ्या शरीरातील सर्व आळस काढून टाकत होती. शेजारच्या देवळामधे काकड आरती चालू होती.
काही चाहची दुकाने उघडली होती. वातावरण थोडे थंड असल्यामुळे लोकांनी कानटोपी, स्वेटर घातले होते. गरम गरम चहा घेत माणसं ताजीतवानी होत होती. तिथेच छान छान भक्तिगीते ऐकू येत होती. त्यामुळ खूप प्रसन्न वाटत होते.
पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध
वातावरण खूप छान होते. एक वेगळाच अनुभव मला मिळत होता. आजुबाजुला अनेजण उस्तहात व्यायाम करत होते. आरोग्याबाबत जागरूक लोक, जवळपास सर्व वयोगटातील लोक मॉर्निंग वॉक करताना मला पहायला मिळाले.
वाटेत लागलेल्या मैदानावर मुले पळण्याचा व्यायाम करीत होती.
त्यांच्याकडे पाहून आपणही रोज रोज असे व्यायामाला यायचे हे मनातल्या मनात ठरवले. पहाटेचा तो गार मंद वारा मला अनुभवता आला.
कमीत कमी वेळात पेपर देणारी मुले पहाटेच सर्वांना पेपर देत होती. काही शेतकरी शेतीची कामे करण्यासाठी शेताच्या दिशेने जात होती. त्यांच्यासोबत असणाऱ्या गुरांच्या गळ्यांतील घंटाचा आवाज ऐकू येत होता.
मी अनेक कवितांमध्ये पहाटेच केलेलं सुंदर वर्णन वाचले होते परंतु आज ते स्वतः समोर पहायला मिळत होते. निसर्गाची नवनवीन रूपे मी पाहिली.Pahateche Saundary Nibandh Marathi
इथून पुढे पहाटे लवकर उठून पहाटेचे सौंदर्य अनुभवायचे मी ठरवले. मनाला वेगळीच प्रसन्नता येत होती. हा अनुभव माझ्यासाठी नवा होता.
अंधाराचे जाळे फिटू लागले होते. हळूहळू सूर्य नारायण वर येऊ लागला. आता रस्ते नीट दिसू लागले होते.
सकाळी झाडांवर पक्षी किलबिलाट करताना पाहून मन आतून प्रसन्न होते. बहरलेली शेतं बघून जणू स्वर्गच अनुभवल्यासारखं वाटले.
Pahateche Saundary Nibandh Marathi
आजूबाजूचा हिरवागार निसर्ग आणि हळू हळू वर येणारा सूर्य हे दृश्य खूपच छान वाटत होते. हे रम्य दृश्य मला अनोखं होतं. निसर्गात केवढे सौंदर्य दडले आहे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो.
वेळ कसा गेला कळलेच नाही. अशा प्रसन्न वातावरणात काही काळ व्यतित करून मी अभ्यास करण्यासाठी घरी जाण्यासाठी निघालो.(पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध)
परत येताना शेजारच्या देवळात आरती सुरु होती. पहाटेचा हे सौंदर्य मे पहिल्यांदाच अनुभवले होते.
शरीराला आणि मनाला आनंद मिळवण्याच्या असेल तर आता इथून पुढे रोजच पहाटे व्यायम करण्यासाठी व पहाटेच सौंदर्य अनुभवायचे मी ठरवले होते.
तर मित्रांनो तुम्हाला “पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध | Pahateche Saundary Nibandh Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.
या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
धन्यवाद