पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध | Pani Adva Pani Jirva Nibandh

Pani Adva Pani Jirva Nibandh: नमस्कार मित्रांनो आज या लेखात पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध | Pani Adva Pani Jirva Nibandh

 

आपण एखादे छानसे छोटेसे रोप जमिनीत लावतो व त्याला रोज पाणी देतो तेव्हाच ते वाढते फुलते, बहरते व खूप सुंदर दिसायला लागते परंतु आपण त्या रोपाला पाणी दिलेच नाही तर ते सुंदर रोप सुकून जाते.

जसे वृक्षांचे आहे तसेच आपलेही आहे. सर्वांसाठीच पाणी हे फार महत्त्वाचे आहे. पाणी म्हणजे जीवन. जल हे सर्व सजीवांचे आधार आहे.

प्रत्येक गोष्टीत आपल्याला पाणी लागते. पाण्याशिवाय आपण जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. शेती हीच आपल्या देशाची ताकद आहे, पाणी नसेल तर यामध्ये खूप अडचणी निर्माण होतील.

पाणी हे पृथ्वीवरील जीवनासाठी सर्वात महत्वाचे आहे कारण आपल्याला पिण्यासाठी, स्वयंपाक करणे, आंघोळ करणे, कपडे धुणे, शेती इत्यादी कामात पाण्याची गरज असते.

👉वृक्ष संवर्धन ही काळाची गरज निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

सजीवांना जिवंत राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण हे पुरेशे व योग्य असावे लागते. पाणी हेच जीवन असे म्हटले जाते कारण पृथ्वीतलावर पिण्याच्या पाण्याचे प्रमाण हे फक्त ३ टक्के एवढे आहे.

जलप्रदूषण ही खूप मोठी समस्या आहे. प्रदुषित पाणी पिल्यामुळे पोटाचे विकार तसेच अनेक आजार आपल्याला होतात. अशुद्ध पाणी पिण्याचे आरोग्यावर होणारे परिणाम घातक आहेत.

पाण्याचे साठे हे मर्यादित आहेत त्यामुळे हे पाणी काटकसरीने व व्यवस्थित पद्धतीने वापरणे गरजेचे आहे. पाणी आहे तरच जीवन आहे.Pani Adva Pani Jirva Nibandh

अजूनही ठिकाणी पाणी आणण्यासाठी खूप दूर जावे लागते. अनेक ठिकाणी आपल्याला पाण्याची कमतरता पहायला मिळत असते. अनेक भागात दुष्काळी परिस्थितीला लोकांना तोंड द्यावे लागते.

आपण झाडांचे महत्व समजून घेऊन वृक्षारोपण करण्याकडे भर दिला पाहिजे. पर्यावरणाचे संतुलन नीट ठेवण्यासाठी झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे खूप गरजेचे आहे.

वाढते उद्योगीकरण, वाढती लोकसंख्या हे वृक्षांची संख्या कमी होणे, पाऊस कमी पडणे या समस्यांचे मूळ कारण आहे. आता भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील पाणीही कमी होत आहे. औद्योगिक क्षेत्रातही पाणी खूप महत्वाचे आहे. शेती, उद्योग धंदे सुरू ठेवण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे.(पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध)

अलीकडे वृक्षांची संख्या कमी होत आहे. जेवढे पाणी जमिनीत मुरायला हवे, तेवढे मुरत नाही.

पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवणे खूप गरजेचे आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हे आपल्या सर्वांसाठीच खूप गरजेचे आहे.

पावसाचे पाणी वाहून जाऊन न देता ते पाणी साठवू जमिनीत मुरायला हवे तेव्हा जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. आपल्याला प्रत्येक गावांमध्ये पाणी बचतीसाठी वेगवेगळे प्रकल्प राबवणे अतिशय गरजेचे आहे. पाणी अडवून ते पाणी जमिनीत जिरविणे चांगला मार्ग आहे.

पाण्याचे महत्त्व प्रत्येकाने जाणून घेऊन त्यादिशेने प्रयत्न केले पाहिजेत. काही भागात जास्त पाऊस पडतो तर काही भागात कमी पडतो. काही गोष्टींची काळजी घेत आपल्याला शक्य होईल तसे पाणी अडविण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.

आपण जर आतापासूनच पाणी बचत करण्यासाठी उपाय केले तर भविष्यात या समस्यावर खूप कमी करता येतील. पाण्याची बचत करण्यासाठी आपण आपल्या घरापासूनच करू शकतो. आपण सर्वांनी पाण्याचे महत्त्व समजून घेऊन पाणी  वाचविण्यासाठी सुरू केलेल्या मोहीमा लोकांपर्यंत पोहोचविल्या पाहिजेत.

पृथ्वीवरील जीवसृष्टीचा समतोल राखण्यासाठी विविध माध्यमातून पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. पाणी वाया न जाता ते शेतीसाठी व पिण्यासाठी कसे साठवता येईल याचा विचार आपण केला पाहिजे.

आपण वृक्षारोपणाचे महत्व सर्वाना सांगितले पाहिजे व भरपूर प्रमाणात झाडे लावली पाहिजेत. पाण्याचे संवर्धन करून आपल्या भावी पिढ्या आणि आपले भविष्य चांगले घडवू शकतो, यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू करू.

तर मित्रांनो तुम्हाला “पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध | Pani Adva Pani Jirva Nibandh” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध संबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button