2023 पर्यावरण संरक्षण निबंध मराठी | Paryavaran Rakshan Nibandh Marathi | पर्यावरण निबंध मराठी

Paryavaran Rakshan Nibandh Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात पर्यावरण संरक्षण निबंध मराठी हा निबंध महिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

पर्यावरण संरक्षण निबंध मराठी | Paryavaran Rakshan Nibandh Marathi

 

मानवाचा आणि सर्व सजीवांचा पर्यावरणाशी खूप जवळचा संबंध आहे. आपण सगळेच पर्यावरणाने वेढलेले आहोत. कोणत्याही सजीवाला जगण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक संसाधने आपल्याला पर्यावरणातून उपलब्ध आहेत.

पर्यावरणात हवा, पाणी, जमीन, झाडे, वनस्पती, सजीव प्राणी, मानव इत्यादींचा समावेश होतो. आपल्याला शुद्ध पाणी, शुद्ध हवा, शुद्ध अन्न, नैसर्गिक वनस्पती इत्यादी पर्यावरणातूनच मिळतात. पर्यावरणातील प्रत्येक गोष्टीचे संवर्धन करणे ही एक प्रत्येकाची जबाबदारी आहे.

👉भारतीय संविधान मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

आपल्या आजूबाजूला असलेली ही हिरवीगार झाडे निसर्गाची शोभा वाढवत असतात. या वृक्षांपासून आपल्याला नेहमी फायदाच होत असतो. आपल्या आजूबाजूला असलेले वृक्ष आपल्याला असंख्य गोष्टी प्रदान करतात.Paryavaran Rakshan Nibandh Marathi

वातावरणातील हवा स्वछ करण्यात वृक्ष खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. आपल्या आजूबाजूला असणारे वृक्ष पर्यावरण संतुलन राखण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. त्या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातून उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून आज आपण आनंदी जीवन जगत आहे.

आज पर्यावरण रक्षण ही काळाची गरज झाली आहे. पर्यावरणाचा समतोल हळूहळू बिघडत चालला आहे, ज्याचा मानवी जीवनावर वाईट परिणाम होत आहे. पर्यावरण संरक्षणाचा सर्व सजीवांच्या जीवनाशी आणि पृथ्वीवरील संपूर्ण नैसर्गिक वातावरणाशी जवळचा संबंध आहे.

पर्यावरण संरक्षण निबंध मराठी

प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे. प्रदूषणाचे खूप घातक परिणाम होतात. प्रदूषणामुळे आपण अनेक मानसिक व शारीरिक व्याधींनी ग्रस्त होतो.

वाढते उद्योग, वाहने, शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार असणारे काही प्रमुख घटक आहेत. दिवसेंदिवस वाढणारे उद्योग आणि वाहने यामुळे वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. वाहनांची वाढती संख्या त्यामुळे धुराचे प्रमाणही वाढत आहे. कारखाने, वाहने यांमधून निघणाऱ्या धुरामुळे वातावरण अत्यंत प्रदूषित होत आहे.

👉भारतीय संविधान मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

कचरा, उद्योग किंवा कारखान्यांतील कचरा इत्यादी कचरा कधीकधी नद्यामधे मिसळल्याने पाणी प्रदूषित होऊन त्यातून भयंकर रोगराई निर्माण होते. वाढते जलप्रदूषण पर्यावरणाला मारक ठरत आहे.(पर्यावरण संरक्षण निबंध मराठी)

जलप्रदूषण हे आज आपल्यासमोरील हे एक मोठे आव्हान आहे. वाहनांचे हॉर्न आणि लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण वाढते. पर्यावरण संतुलन व्यवस्थित राहिले तरच आपले जीवनही व्यवस्थित चालेल त्यासाठी आपल्याला प्रदूषण कमी करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

अलीकडच्या काळात जलप्रदूषण, वायुप्रदूषण, हवाप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या प्रकारच्या प्रदूषणामुळे पर्यावरण संतुलन बिघडत आहे. त्यासाठी पर्यावरण संरक्षण करणे गरजेचे आहे.

Paryavaran Rakshan Nibandh Marathi

प्रदूषणाची समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. प्रदूषण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याकडे लक्ष द्यावे लागेल.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. पर्यावरण रक्षणासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींचा कमीत कमी वापर करायला हवा.

पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला ही पृथ्वी प्रदूषणमुक्त करण्याकडेच लक्ष द्यावे लागेल. प्रदूषण नियंत्रणात आणले तरच आपले पर्यावरण सुरक्षित राहील.

वृक्षारोपण करणे, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, प्लास्टिकचा वापर थांबवणे हे आपल्या हिताचे आहे. आपल्याला पर्यावरणाच्या रक्षणाबाबत लोकांमध्ये जनजागृती करावी लागेल जेणेकरून लोकांनी अधिकाधिक वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण करावे.

आपल्या आजूबाजूला असलेल्या पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यासाठी १९७२ पासून ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.

नैसर्गिक पर्यावरण हा सजीवांसाठी अनमोल ठेवा आहे त्यामुळे प्रत्येक मानवाने आतापासूनच पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय झाले पाहिजे आणि त्याची आपण काळजी घेतली पाहिजे.

तर मित्रांनो तुम्हाला “पर्यावरण संरक्षण निबंध मराठी | Paryavaran Rakshan Nibandh Marathi ” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ पर्यावरण संरक्षण निबंध मराठी आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button