पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध | Pavsalyatil Ek Diwas Marathi Nibandh

Pavsalyatil Ek Diwas Marathi Nibandh: नमस्कार मित्रांनो आज या लेखात पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध | Pavsalyatil Ek Diwas Marathi Nibandh

 

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे.आपल्या भारत देशातील महत्त्वाच्या ऋतूंमधील पावसाळा हा ऋतू.

उन्हाळ्यातील कडक उन्ह सहन केल्यानंतर सर्वजण वाट पाहत असतात ती पाऊसाची.

पावसाळा ऋतू येताना अनेक सण व आनंद सोबत घेऊन येतो. शेतीसाठी पाऊसाची महत्व खूप आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी पावसाळ्याचे दिवस खूप महत्त्वाचे असतात.

👉माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी येथे क्लिक करा👈

पावसात वातावरण सुंदर होऊन जाते. झाडे हिरवीगार होऊन जातात. नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे असते.

मलाही पावसाला ऋतू खूप आवडतो. माझ्या आयुष्यातही पावसाळ्यातील एक अविस्मरणीय दिवस आहे. तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही.

त्या दिवशी मी शाळेत जाण्यासाठी तयार होत असताना घरा बाहेर येऊन पाहिले तर थोड्या वेळेसाठी सूर्यदेव प्रकट झाला आणि लगेच ढगांच्या आड कुठे दिसेनासा झाला. आकाशात काळे ढग जमा झाले होते.

पावसाला सरूवात होण्याआधीच मी सर्व आवरून मित्रांसोबत शाळेत जाण्यासाठी निघालो.

शाळेत जात असतानाच पावसाने थोडी थोडी सुरुवात केली होती. शाळा घरापासून लांब असल्याने आम्ही थोडे लवकरच निघालो व नीट शाळेत पोहचलो.”पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध”

प्रार्थना झाल्यानंतर आम्ही सर्वजण आपापल्या वर्गामध्ये गेलो. काही वेळानंतर ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि पावसाला सुरूवात झाली.

पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध

हळू हळू पाऊस वाढू लागला. पावसामुळे आजूबाजूला अंधार पसरला. पावसाचा वेग खूप असल्यामुळे शिक्षकांना शिकवणेही थांबवावे लागेल. त्यावेळी पाऊसाचे ते रूप पाहून थोडीशी भीतीही वाटली.

शाळेच्या मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होत. इतरांप्राणेच आम्हीही कागदी होड्या बनवल्या आणि पावसाच्या पाण्यात सोडल्या.

👉माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी येथे क्लिक करा👈

पाऊसाचा वेग कमी झाल्यानंतर आम्हाला शाळेतून लवकरच घरी सोडण्यात आले. मुलांना हळूहळू शाळेच्या गेटमधून बाहेर काढण्यात आले.

शाळेतून घरी नीट जावे यासाठी शिक्षकांनी काही महत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. आम्ही पटकन गेटच्या बाहेर पडलो व घरच्या दिशेने मी निघालो.

सर्व रस्ते पाण्याने तुडुंब भरून गेले होते. सगळीकडे पाणीच पाणी साचले होते.Pavsalyatil Ek Diwas Marathi Nibandh

तेवढ्यात जोरात जोरात पाऊस सुरू झाला आजूबाजूला थांबण्यासाठी काही दिसत न्हवते. छत्री नसल्यामुळे आम्ही सर्वजण भिजलो.

शेजारीच असलेल्या एका झाडाखाली उभे राहिलो पण पाऊस जास्त असल्याने तिथेही भिजलो त्यामुळे आम्ही तसेच थोडे पुढे जाण्याचे ठरवेल व आम्ही वाटेत एका मोठ्या दुकानाच्या छताखाली उभे राहिलो. आमच्यासारखे इतर काही लोकही पावसापासून वाचण्यासाठी तिथे उभे होते.

Pavsalyatil Ek Diwas Marathi Nibandh

पाऊस थांबला नव्हता पण कमी झाला होता. मला आधीपासूनच पावसात भिजायला आवडत असल्यामुळे आम्ही पावसात खूप मजा केली. माझ्या आनंदाला सीमा नव्हती.

पावसाचे थेंब थोडे हलके पडू लागले. ओला झाल्यामुळे थंडीही वाजू लागली होती. रस्ते पाण्याने भरले होते. लोक एक एक करून आपापल्या घारकडे जाऊ लागले.

पक्षांचे छान छान आवाज कानावर पडत होते. घरी जाताना रस्ते पाण्याने भरलेले दिसले. आकाशात तयार झालेल्या इंद्रधनुष्याकडे पाहून मी आनंदी झालो.

सर्वत्र चिखल झालेला होता.  सर्व वातावरण थंड झाले होते. आकाशात उडणारे पक्षी जणू ढगांचे आभार मानत होते.

पाऊसाचा वेग थोडा कमी झाल्यानंतर आम्ही तशाच अवस्थेमध्ये आपापल्या घरी पोहोचलो.

👉पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Leave a Comment

close button