पेट्रोल संपले तर मराठी निबंध | petrol sample tar marathi nibandh

petrol sample tar marathi nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण पेट्रोल संपले तर या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

मित्रांनो हा निबंध लिहीत असताना आपण पेट्रोल सारखे मर्यादित इंधन संपले तर आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतील, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, मनुष्याचे आरोग्य या गोष्टींचा विचार करणार आहोत.

पेट्रोल बचतीसाठी कोणते उपाय करू शकतो याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही या निबंधामधून केला आहे.

चला तर मग निबंधाला सुरवात करूया,

 

petrol sample tar marathi nibandh
           petrol sample tar marathi nibandh

 

पेट्रोल संपले तर मराठी निबंध

 

‘petrol sample tar marathi nibandh’:-उन्हाळ्याचे दिवस होते.  कामावर जात असताना गाडीतील पेट्रोल संपले. थोड्या अंतरावर एक पेट्रोल पंप होता.

मी गाडी ढकलत पेट्रोल त्या पंपा पर्यंत आलो. कडक उन्हामध्ये गाडी धकळल्यामुळे माझे अंग ओलेचिंब झाले होते.

माझ्या मनात एक विचार आला गाडीतील पेट्रोल संपले तर एवढा त्रास झाला मग पेट्रोल संपले तर काय होईल??

मनुष्याने गाड्यांचा शोध तर लावला पण त्यासाठी लागणारे पेट्रोल इंधनच संपले तर….

माझ्या मनात अनेक विचार घोळू लागले.

निसर्गाने आपल्याला भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये पाणी, शुद्ध हवा, सूर्यप्रकाश यासोबतच निसर्गाने कोळसा, खनिज तेल आणि इंधनेसुद्धा दिली आहेत.

निसर्गामध्ये हवा, पाणी व सूर्यप्रकाश ही संसाधने अमर्यादित प्रमाणात आहेत परंतु खनिजे कोळसा, पेट्रोल, डिझेल यांसारख्या इंधनाचे साठे मर्यादित प्रमाणात आहेत. आपण या इंधनाचा वापर काटकसरीने केला नाही तर हे संपत जाईल.

मनुष्य दैनंदिन जीवनामध्ये पेट्रोल हे इंधन खूप प्रमाणात वापर करतो. पेट्रोलमुळे आपल्या जीवनाला गती मिळाली आहे.

पेट्रोल सारख्या इंधनामुळे आपली भरपूर कामे सोपी झाली आहेत. “petrol sample tar marathi nibandh”

अलीकडच्या काळात वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. वाहनांमुळे आपली खूप कामे सोपी होतात. आताच्या या धावपळीच्या जगात सर्वाना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकर पोहचण्याची घाई असते.

कोणाला कामावर जायचे असते तर कोणाला शाळेत जायचे असते. अशा वेळी पेट्रोलवर चालण्याऱ्या गाड्यांचा आपल्याला उपयोग होतो.

बरीच वाहने ही पेट्रोल, डिझेल या इंधनावर अवलंबून असतात. वाहनांमुळे दळणवळण ही खूप सोपी झाली.

एका बाजूने वाहनांची संख्या वाढत आहे त्यामुळे पेट्रोलचा वापरही वाढत आहे.

हा निबंध सुद्धा जरूर वाचा- इंधन बचत निबंध मराठी

इंधनांचा जास्त प्रमाणात वापर होत असल्यामुळे इंधनांचे साठे कमी होत आहे. पेट्रोलच्या वाढत्या वापरामुळे काही वर्षांपूर्वी पेट्रोलचे दर कमी होते परंतु आता पेट्रोलचे दर वाढताना दिसत आहेत.

पेट्रोल संपले तर आपले जीवन अवघड होईल.

petrol sample tar marathi nibandh

पेट्रोल संपल्यामुळे गाड्या जागच्या जागी पुतळ्यासारख्या स्तब्ध होतील.

एखादे वाक्य पूर्ण झाल्यावर जसा पूर्णविराम दिला जातो तसेच पेट्रोल संपले तर होऊ शकते.

पेट्रोल संपले तर अनेक व्यापार ठप्प होतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सुद्धा सोसावे लागू शकते.

आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी भरपूर अडचणी निर्माण होतील.

भरपूर लोकांचा उदरनिर्वाह हा गाडी चालवून मिळणाऱ्या पैशातून होतो. पेट्रोल संपले तर गाड्या बंद पडतील त्यामुळे बेरोजगारीला सुद्धा सामोरे जाऊ जगू शकते.

आजारी व्यक्तीला लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जाता येणार नाही. पेट्रोल संपले तर पेट्रोल पंप व त्या संबंधित सर्व व्यवसाय ठप्प होतील.

जी कामे कमी वेळात होतात त्या कामांसाठी जास्त वेळ लागेल. पेट्रोल संपल्यामुळे प्रवासासाठी आपल्याला बैलगाड्या, घोडागाडी यांचा वापर करावा लागेल त्यामुळे आपला वेळ जास्त जाईल.

जवळ कुठेतरी जायचे असेन तर आपल्याला सायकलचा वापर करावा लागेल.

परंतु नंतर मी माझ्या मनाला असेही विचारले की इंधन संपल्यामुळे फायदेही होऊ शकतात का?’पेट्रोल संपले तर मराठी निबंध’

मनुष्य खूप हुशार आहे. काही वर्षांपूर्वी गाड्यांचा शोध लागलेला न्हवता तेव्हाही माणूस जीवन जगत होताच परंतु ते जीवन सोपे होण्यासाठी मनुष्याने गाडीचा शोध लावला.

petrol sample tar essay in marathi

पेट्रोल संपले तर मनुष्य शांत बसणार नाही. काही न काही पर्यायी मार्ग तो नक्की सोधेन.

आपला देश आधीच अनेक प्रदूषण समस्यांसोबत लढत आहे. इंधन ज्वलनामुळे वातावरणात पसरणाऱ्या विषारी वायूंचे प्रमाण कमी होऊन हवा प्रदूषण कमी होईल.

शहरांमध्ये होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. गाड्यांच्या हॉर्नच्या आवाजाने होणारे ध्वनी प्रदूषण कमी होईल.

इंधनाचा वापर काटकसरीने केला तर सर्व गोष्टींचा समतोल व्यवस्थित राहू शकतो.

गाड्यांची संख्या वाढत असल्यामुळे आपण जेवढे होईल तेवढे इंधन बचत करणे गरजेचे आहे.

आपल्याला शक्य होईल तेवढे पायी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे इंधन बचत तर होईलच त्यासोबत आपले शारीरिक स्वस्थही नीट राहील.

पायी चालल्यामुळे शरीराचा व्यायाम पण होईल.’petrol sample tar essay in marathi’

आपण एखाद्या सिग्नलला थांबलो असेन तर गाडी बंद करावी त्यामुळे पेट्रोल वाया जाणार नाही. आपण आपल्या गाडीची वेळच्या वेळी काळजी घेतल्याने पेट्रोलची बचत होऊ शकते.

पेट्रोल तयार करणे हे आपल्या हातात नाही त्यामुळे आपल्या हातात असलेल्या गोष्टी म्हणजे पेट्रोलचा अतिवापर आपण टाळला पाहिजे.

पेट्रोल हे इंधन मर्यादित आहे त्यामुळे त्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे.

मित्रांनो तुम्ही या निबंधसाठी असेही शीर्षक देऊ शकता-

१)इंधन बचत निबंध मराठी

२)इंधन बचत काळाची गरज निबंध

३)जगातील पेट्रोल संपले तर निबंध

तर मित्रांनो तुम्हाला “petrol sample tar marathi nibandh” (पेट्रोल संपले तर)हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल nibandhmarathi@gmail.com

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment

close button