{ प्लास्टिक मुक्त भारत } प्लास्टिक बंदी काळाची गरज निबंध मराठी | plastic bandi kalachi garaj nibandh in marathi

plastic bandi kalachi garaj nibandh in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण प्लास्टिक बंदी काळाची गरज या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

प्लास्टिकचा अतिवापर केल्यामुळे आपल्याला कोण कोणत्या प्रदूषण समस्यांना सामोरे जावे लागेल याची माहिती आपण या निबंधामधून जाणून घेणार आहोत

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

plastic bandi kalachi garaj nibandh in marathi
plastic bandi kalachi garaj nibandh in marathi

प्लास्टिक बंदी काळाची गरज निबंध मराठी

 

‘प्लास्टिक टाळा, प्रदूषण टाळा’ हा संदेश आपल्या सर्वांनाच माहीत आहे.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर भरपूर प्रमाणात होतो. भरपूर ठिकाणी प्लास्टिकचा वापर होताना आपल्याला दिसतो.

प्लास्टिक प्रदूषण ही आपल्यासमोर असलेली खूप मोठी समस्या आहे व यावर योग्य वेळी उपाययोजना केली गेली नाही तर ही समस्या पुढील काळात अतिशय भयावह होऊ शकते.

कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्लास्टिक आपल्या वापरात येतच राहते.

खूप साऱ्या जीवनावश्यक वस्तू प्लास्टिकच्या पॅकिंग मधून आणल्या जातात.plastic bandi kalachi garaj nibandh in marathi

प्लास्टिक वापराच्या फायद्यांपेक्षा तोटे जास्त प्रमाणात सहन करावे लागत आहेत. प्लास्टिक प्रदूषण हे आपल्या पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवत आहे.

प्लास्टिक हा असा पदार्थ आहे जो भरपूर वर्ष निसर्गात पर्यावरणात राहतो.

पाण्यात, जमिनीत प्लॅस्टिक विघटित होत नाही व हवा प्रदूषण, जल प्रदूषण, माती प्रदूषण अशा अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या करतो.

हा निबंध सुद्धा जरूर वाचा – इंधन बचत निबंध मराठी

पर्यावरणात राहिलेले हे प्लास्टिक मनुष्याच्या जीवनासाठी हानिकारक आहेच तसेच ते प्राणी, पक्षी, झाडेझुडपे, जलचर प्राणी यांच्यासाठी सुद्धा घातक आहे.

प्राणांनी असा कचरा खाल्लामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. हा प्लास्टिक कचरा नदी नाले, ओढे यामध्ये मिसळल्यामुळे जलप्रदूषण होऊन अनेक जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.

आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, कार्यक्रमात प्लास्टिकच्या डिश अशा गोष्टींचा वापर करतो.

प्लास्टिकच्या वस्तूंमुळे आपला त्रास थोडासा कमी होतो. परंतु हा प्लास्टिक कचरा कुठे जातो? कारण या प्लास्टिक कचऱ्याचे नैसर्गिकरित्या विघटन होण्यासाठी भरपूर वर्षाचा कालावधी लागतो.

प्लास्टिकचा कचरा पर्यावरणात राहिल्यामुळे भूमीप्रदूषण होते. या कचऱ्यामुळे सुपीक जमीन नापीक होण्यास सुरुवात होते.

प्लास्टिक प्रदूषण ही जागतिक समस्या बनली आहे.

आपण योग्य वेळी प्लास्टिक पासून होणारे नुकसान समजून घेऊन हे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

Plastic bandi kalachi garaj nibandh in marathi

आपल्याला हे प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी पर्याय शोधणे गरजेचे आहे.

आपल्या दैनंदिन वापरात प्लास्टिकचा वापर वाढल्यामुळे प्लास्टिक कचऱ्याचेही प्रमाण वाढले आहे आणि हे प्रमाण असेच वाढत राहिले तर प्लास्टिक प्रदूषण झपाट्याने वाढेल.

प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणा संबंधित अनेक समस्या आपल्यासमोर आहेत.

प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण हे खूप प्रमाणात वाढले आहे व ते मानवी जीवनासाठी अतिशय घातक ठरू शकते.

प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणासाठी घातक ठरतो.

हे प्रदूषण कमी करण्यासाठी आपण प्लास्टिकचा वापर कमी प्रमाणात करू शकतो.plastic bandi kalachi garaj nibandh in marathi

मनुष्य सध्या अनेक प्रदूषणाचा सामना करत आहे. पर्यावरणाचा समतोल ढळू नये म्हणून पर्यावरणप्रेमी प्रयत्न करत आहेत. प्लास्टिक बंदी काळाची गरज निबंध मराठी

पर्यावरणाचा समतोल राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्लास्टिकचा अतिवापर टाळून पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.

आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याचे ठरवले तर भरपूर प्रमाणात प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

प्लास्टिक प्रदूषणापासून वाचण्यासाठी सर्वप्रथम प्लास्टिकच्या वापरापासून लांब राहिले पाहिजे. प्लास्टिक हे वापरासाठी अतिशय सोपे व स्वस्त आहे.”प्लास्टिक मुक्त भारत मराठी निबंध”

आपण काही सोपे सोपे उपाय करून सुद्धा प्लास्टिक प्रदूषणापासून वाचू शकतो.

आपण बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता घरगुती कापडी पिशव्यांचा वापर करू शकतो. कापडी पिशव्या पुन्हा पुन्हा आपण वापरू शकतो.

एखाद्या कार्यक्रमात आपण प्लास्टिक ग्लास, डिशचा वापर टाळून आपण स्टीलच्या भांड्याचा वापर करू शकतो कारण स्टीलची भांडी आपल्याला पुन्हा पुन्हा वापरात येतात.

प्लास्टिकच्या भरपूर गोष्टींमुळे आपल्याला खूप फायदा झाला. परंतु वाढती लोकसंख्या व प्लास्टिकचा वाढता वापर त्यामुळे भरपूर नुकसान होत आहे.

प्लास्टिक मुक्त भारत मराठी निबंध | plastic Mukt Bharat

प्लास्टिक नष्ट होण्यासाठी भरपूर वर्षांचा कालावधी लागतो.

आपण प्लास्टिकचा वापर करून ते फेकून न देता त्याचा पुनर्वापर केला तर भरपूर प्रमाणात प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी होईल.

आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढ्या वेळी आपण प्लास्टिकचा पुनर्वापर केला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी करून आपण प्लॅस्टिक कचरा कमी होण्यास मदत करू शकतो.

आपण स्वतः आपल्यापासून व आपल्या कुटुंबापासून प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे.

काही गोष्टींची सवय नसल्यामुळे सुरवातीला अडचणी येतील परंतु आपल्याला व आपल्या कुटुंबाला तसेच पुढच्या पिढीला प्लास्टिक प्रदूषण या संकटापासून वाचवायचे असेन तर  आतापासूनच आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील.

प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य नाही तर आपल्या त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणजे आपण प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे.

प्लॅस्टिकपासून होणारे दुष्परिणाम आपण इतरांना पटवून दिले पाहिजेत. प्लॅस्टिपासून होणाऱ्या नुकसनाबद्दल जनजागृती केली पाहिजे.

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी शासन अनेक उपाययोजना करत आहेत.

शासनाच्या नियमांचे आपण पालन केले तर प्लास्टिक प्रदूषणाचा वाढता स्तर कमी होईल.

हीच योग्य वेळ आहे प्लास्टिक प्रदूषण या संकटाचा सामना करून प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याची.

प्लास्टिकचा वापर कमी करू
वातावरण आपलं स्वच्छ करु.

तर मित्रांनो तुम्हाला “plastic bandi kalachi garaj nibandh in marathiहा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ प्लास्टिक बंदी काळाची गरज तर या निबंधा संबंधीत काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

2 thoughts on “{ प्लास्टिक मुक्त भारत } प्लास्टिक बंदी काळाची गरज निबंध मराठी | plastic bandi kalachi garaj nibandh in marathi”

Leave a Comment

close button