प्लास्टिक मुक्त भारत निबंध | Plastic mukt bharat nibandh marathi | प्लास्टिक निबंध

plastic mukt bharat nibandh marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण प्लास्टिक मुक्त भारत निबंध या विषयावर निबंध पाहणार आहोत.

आम्ही या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

प्लास्टिक मुक्त भारत निबंध | plastic mukt bharat nibandh marathi

 

पर्यावरणाशी नाते जोडा,
प्लास्टिकचा वापर कमी करा.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व इतर अन्य ठिकाणी प्लास्टिकचा वापर केला जातो. वेगवेगळ्या मार्गाने प्लास्टिक आपल्या वापरामध्ये येते.

आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांत प्लास्टिकचे ग्लास, प्लास्टिकच्या डिश अशा गोष्टींचा वापर करत असतो.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर वाढल्यामुळे त्यापासून निर्माण होणारा प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाणही वाढू लागले आहे.

👉शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध येथे क्लिक करा 👈

हा कचरा असाच वाढत जाऊ लागला तर प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणात अशीच वाढ होत जाईल. आपल्याला अनेक ठिकाणी प्लास्टिकचा वापर होताना दिसतो. पिण्याच्या पाण्याच्या बॉटल, प्लास्टिकच्या पिशव्या यांच्या वापराचे काही फायदे आहेत तसेच तोटेसुद्धा आहेत.

प्लास्टिक प्रदूषण ही एक जागतिक समस्या बनली आहे. प्लास्टिक वापराचे केवळ फायदेच आहेत का? प्लास्टिक वापराच्या फायद्यांपेक्षा त्याचे तोटे जास्त प्रमाणात आपल्याला सहन करावे लागत आहेत.

या कचऱ्यामुळे पर्यावरणा संबंधित अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे.”प्लास्टिक मुक्त भारत निबंध”

प्लास्टिक हा असा पदार्थ आहे जो भरपूर वर्ष निसर्गात पर्यावरणात राहतो त्यामुळे प्लास्टिक प्रदूषण पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवते. प्रदूषण ही आपल्यासमोर असलेली खूप मोठी समस्या आहे व प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले नाही तर पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचू सकते.

प्लास्टिक मुक्त भारत निबंध/ प्लास्टिक निबंध मराठी 

पाण्यामध्ये, जमिनीत प्लास्टिक विघटित होत नाही त्यामुळे प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणासाठी घातक ठरू शकतो.

प्लास्टिक वस्तूंच्या वापरामुळे काही गोष्टी सोप्या होतात परंतु प्रदूषणही तेवढेच होते कारण नैसर्गिकरित्या या पदार्थाचे विघटन होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो त्यामुळे पर्यावरणात राहिलेले हे प्लास्टिक मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्यासाठी घातक ठरू शकते. प्लास्टिक पर्यावरणामध्ये राहिल्यामुळे भूमी प्रदूषण तर होतेच. असे प्लास्टिक प्राण्यांने खाल्ल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

इतरत्र पसरलेला प्लास्टिक कचरा नाले, गटारे यामध्ये अडकल्यामुळे यांचे प्रवाह बंद होतात. प्लास्टिक मुक्त भारत माझी जबाबदारी समजून प्रत्येकाने प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्लास्टिक कचरा नदी नाले, ओढे यामध्ये मिसळल्यामुळे जलप्रदूषण होऊन अनेक जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.

👉शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध येथे क्लिक करा 👈

प्रदूषित पाणी पाण्यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण मानवी जीवनासाठी अतिशय घातक ठरू शकते. प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण समजून घेऊन ते प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दैनंदिन जीवनात काही गोष्टींचे पालन करून आपण प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यासाठी मदत करू शकतो. आपण प्लास्टिकचा अतिवापर टाळू शकतो.plastic bandi kalachi garaj nibandh in marathi

आपण एखादी वस्तू आणण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करू शकतो. कापडी पिशव्या पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकतात. वेगवेगळ्या कार्यक्रमात आपण प्लास्टिकचे ग्लास, प्लेट्स न वापरता त्याला पर्याय शोधून पुन्हा पुन्हा वापरता येतील अशा स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा.

प्लास्टिक प्रदूषण टाळण्यासाठी आपल्याला शक्य होईल तेवढा आपण प्लास्टिकचा पुनर्वापर केला पाहिजे.(plastic mukt bharat nibandh marathi)

प्लास्टिक नष्ट होण्यासाठी हजारो वर्षांच्या कालावधी लागतो त्यामुळे आपण त्याचा शक्य होईल तेवढा पुनर्वापर करून प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी करू शकतो. आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याचे ठरवले तर भरपूर प्रमाणात प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

आपल्या देशाला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी अनेक गोष्टी करता येतील. प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणप्रेमी मेहनत घेत आहेत. पर्यावरणाचा समतोल ढळू नये यासाठी आपल्याला प्रदूषण कमी करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

plastic mukt bharat nibandh marathi

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वप्रथम प्लास्टिकचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे. प्रदूषण कमी करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान, प्रदूषण, प्रदूषित पाणी पिल्यामुळे होणारे आजार यांबद्दल इतरांना माहिती दिली पाहिजे.

प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणाऱ्या नुकसाना बद्दल जनजागृती केली पाहिजे. प्रदूषण कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. आपण नियमांचे पालन करून व स्वतः प्रयत्न करून पर्यावरण स्वछ ठेवू शकतो. आपण कापडी, कागदी पिशव्यांचा वापर करून प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी मदत करू.

प्लास्टिकचा वाढत्या समस्येपासून दूर राहण्यासाठी स्वच्छ भारत आणि प्लास्टिक मुक्त भारत यासारखे अभियान यशस्वी करणे आवश्यक आहे. प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे मोठे नुकसान होत आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढीला प्रदूषणच्या समस्येपासून दूर ठेवायचे असेन तर आपल्याला आतापासून पाऊले उचलणे गरजेचे आहे.

आपला देश प्लास्टिकच्या समस्येपासून दूर ठेवायचा असेन तर स्वच्छ भारत आणि प्लास्टिक मुक्त भारत यांसारखे अभियान आपल्याला यशस्वी करावे लागतील.

आपण आतापासूनच योग्य ती पाऊले उचलली नाही तर भविष्यात मोटे संकट आपल्यासमोर उभे राहू शकते. प्रदूषण कमी करण्यासाठी शासन तर प्रयत्न करतच आहे त्याबरोबर आपण नियमांचे पालन करून व स्वतः प्रयत्न करून पर्यावरण स्वछ ठेवू.

प्लास्टिकचा वापर कमी करू

वातावरण आपलं स्वच्छ करु.

प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे मोठे नुकसान होत आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढीला प्रदूषणच्या समस्येपासून दूर ठेवायचे असेन तर आपल्याला आतापासून पाऊले उचलणे गरजेचे आहे.

प्लास्टिक हा असा पदार्थ आहे जो भरपूर वर्ष निसर्गात पर्यावरणात राहतो. जल प्रदूषण, हवा प्रदूषण, भूमी प्रदूषण अशा अनेक समस्यांना आपला देश तोंड देत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

👉पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

 

 

Leave a Comment

close button