प्रदूषण एक समस्या मराठी निबंध | Pradushan Ek Samasya Nibandh Marathi | प्रदूषण निबंध मराठी

Pradushan Ek Samasya Nibandh Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात प्रदूषण एक समस्या मराठी निबंध या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध | Pradushan Ek Samasya Nibandh Marathi | प्रदूषण निबंध मराठी

 

प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे. प्रदूषणाचे खूप घातक परिणाम होतात. आजकाल सर्व देश या समस्येकडे लक्ष देत आहेत. प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आता प्रदूषण कमी करण्याचा सर्वच देश प्रयत्न करत आहेत.

जगभरातील सर्वच लोक प्रदूषण समस्येमुळे त्रस्त आहेत.

वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात. प्रदूषणामुळे आपण अनेक मानसिक व शारीरिक व्याधींनी ग्रस्त होतो.

👉वृक्ष संवर्धन ही काळाची गरज निबंध मराठी येथे क्लिक करा 👈

जेव्हा काही हानिकारक घटक वातावरणात मिसळतात तेव्हा ते पर्यावरणाचा समतोल बिघडवतात. जेव्हा अनिष्ट घटक हवा, पाणी, माती इत्यादींमध्ये मिसळतात आणि ते घटक त्यांना इतके घाण करतात की त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, तेव्हा त्याला प्रदूषण म्हणतात.

आधुनिकीकरणामुळे एक समस्या निर्माण झाली आहे ज्याला प्रदूषणाची समस्या म्हणतात.Pradushan Ek Samasya Nibandh Marathi

प्रदूषणाचे प्रामुख्याने ४ प्रकार आहेत. यामध्ये जलप्रदूषण, वायू प्रदूषण, माती प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण यांचा समावेश होतो. याशिवाय, इतर प्रकारचे प्रदूषण देखील आहेत जे आजच्या काळात हळूहळू मानवजातीसाठी धोकादायक बनत आहेत.

वायू प्रदूषण म्‍हणजे हवेमध्‍ये घातक दूषित पदार्थांचे मिश्रण होणे. उद्योग आणि वाहनांमधून निघणाऱ्या हानिकारक धुरामुळे लोकांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो त्यामूळे वायू प्रदूषण हे सर्वात धोकादायक प्रदूषण मानले जाते.

उद्योग, वाहने, शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार असणारे काही प्रमुख घटक आहेत. दिवसेंदिवस वाढणारे उद्योग आणि वाहने यामुळे वायू प्रदूषणात वाढ झाली आहे.

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

वाहनांची वाढती संख्या त्यामुळे धुराचे प्रमाणही वाढत आहे. कारखाने, वाहने यांमधून निघणाऱ्या धुरामुळे वातावरण अत्यंत प्रदूषित होत आहे.

हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी आपण अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत. वायू प्रदुषण काही प्रमाणत कमी करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याकडे लक्ष द्यावे लागेल त्यामुळे वायू प्रदूषण सोबतच ध्वनी प्रदूषण नियंत्रित ठेवणयामधेही मदत होईल.

जलप्रदूषण हे आज आपल्यासमोरील हे एक मोठे आव्हान आहे. कचरा, उद्योग किंवा कारखान्यांतील कचरा इत्यादी कचरा कधीकधी नद्यामधे मिसळल्याने पाणी प्रदूषित होऊन त्यातून भयंकर रोगराई निर्माण होते.

अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण. पाणी आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. जलप्रदूषण हे केवळ मानवांसाठीच नव्‍हे तर इतर जीवांसाठीसुध्दा घातक आहे.

👉वृक्ष संवर्धन ही काळाची गरज निबंध मराठी येथे क्लिक करा 👈

जलप्रदूषणामुळे पोटाचे अनेक प्रकारचे आजार होतात. पाणी प्रदूषित होऊन त्यातून भयंकर रोगराई निर्माण होत असून त्यामुळे जनजीवन धोक्यात आले आहे.

कारखान्याचे पाणी तलाव, नदी इत्यादी मध्ये सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषण होते. कारखान्यांमधील कचरा नद्या, जलाशय, तलाव इत्यादींमध्ये टाकल्याने पाणी दूषित होते. असे खराब पाणी मानवी शरीरात पोहोचते आणि गंभीर आजारांना कारणीभूत ठरते.

कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा टाकाऊ वस्तू नद्या, तलाव यामध्ये न टाकता, कचरा पेटी किंवा योग्य ठिकाणी टाकावा म्हणजे जलप्रदूषण कमी होण्यास मदत होईल.(प्रदूषण एक समस्या मराठी निबंध)

Pradushan Ek Samasya Nibandh Marathi | प्रदूषण निबंध मराठी 

80 ते 120 डेसिबल पर्यंतच्या तीव्रतेचा ध्वनि किंवा आवाज आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

मोठा आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण. जास्‍त जोराच्या आवाजामुळे बहिरेपणा येतो. ध्वनी परदूषण मानवामध्ये श्रवणशक्ती कमी होण्याचे आणि मानसिक आजाराचे मूळ कारण बनत आहे.

वाहनांचे हॉर्न आणि लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण वाढते. ध्वनिप्रदूषणामुळे माणसाची चिडचिड वाढणे, डोकेदुखी सुरू होते. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनाचा हॉर्न गरजेशिवाय वाजवू नये आणि कार्यक्रमात, लग्नात वापरण्यात येणारा लाऊडस्पीकर कमी आवाजात ठेवावा.

प्रदूषणाची समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील.

यामध्ये मृदा प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, माती प्रदूषण, प्रकाश प्रदूषण, रेडिओधर्मी प्रदूषण इत्यादींचा समावेश होतो. प्रदूषणाचे परिणाम रोखण्यासाठी अनेक मोठी पावले उचलली असली तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर जे काही शक्य आहे ते केले पाहिजे.

आजूबाजूला झाडे-झाडे लावून पर्यावरण हिरवेगार ठेवावे. रासायनिक खतांच्‍या ऐवजी जैविक खतांचा वापर करणे, पॉलिथिनच्‍या ऐवजी कागदाचा वापर करण्‍याकडे कल ठेवावा लागेल.

प्रदूषण थांबवण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. प्रदूषणावर मात करण्यासाठी काही उपाय योजना करण्यात येऊ शकतात जेणे करून प्रदुषणाची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होइल.

आपल्या भावी पिढ्यांना स्वच्छ वातावरण द्यायचे असेल, तर आतापासूनच प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

तर मित्रांनो तुम्हाला “प्रदूषण एक समस्या मराठी निबंध | Pradushan Ek Samasya Nibandh Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ प्रदूषण एक समस्या मराठी निबंध आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button